पुरा रिता झाली पियुनिया मधुघट,
नाही आली ढेकर, नाही ओलावले ओठ,
मोगऱ्याच्या फुलाने भरला देऊळाचा गाभारा,
नाही सुवासाची लाट, नाही सुगंधाचा वारा,
चंद्राच्या शितलतेत नाहून निघाले जग,
तरी कुठे सापडेना एक श्वास निवांत,
गळा दाटे हुंदका , अश्रू वाहे झरझरा,
अंतरीच्या दरीत नाही मायेचा वारा,
ज्यात काही नसते त्यात शोधतो आम्ही,
कुबेराच्या तीजोरीतुन ही रिकामे परततो आम्ही ,
कोण्या एका भिखाऱ्याला सापडला हिरा,
फाटक्या त्याच्या झोळीत नाही त्याला हि थारा.............
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा