शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०११

भीमाशंकर च्या पुण्य भूमीत, सह्याद्री च्या कुशीत,

भीमाशंकर च्या पुण्य भूमीत, सह्याद्री च्या कुशीत,
लेण्याद्री,शिवनेरी ओझर च्या शेजारी,
पुणे जिल्यात एका हुतात्म्याचे गाव आहे ,
गावचे नाव भले "महाळुंगे पडवळ" असु दे,पण ,
" महाराष्ट्र " राज्यात प्रसिद्ध ओळख आहे.
हुतात्मा बाबु गेनू सैद याच गावचे सुपुत्र आहेत ,
१२ डिसेंबर हुतात्मा बाबु गेनू यांचा पुण्यतिथि दिवस आहे .
गांधी टोपी या गावात प्रसिद्ध आहे ,,
.२० वाड्या वस्त्यांचा असा हा गाव आहे ,,.
५ दुध डेअरी ,८ केश कर्तनालय ,६ हुंडेकरी .
३ ट्रान्स पोर्ट ,३ मराठी शाळा ,२ सोसायटी .
ग्रामपंचायत,तलाठी कार्यालय ,बँक, गावात आहेत .
डिंभे कॅनॉल ने सारा गाव हिरवा गार दिसत आहे
मुंबईकर ,पुणेकर गावच्या महान व्यक्ति आहेत
गावची वेस,सभा मंडप,भली मोठी मंदिरे गावची शान आहे,
बाबु गेनू हायस्कूल आमची मान आहे.
बैल पोळा गावचा सन खास आहे ,
दत्त मंदीर,शिवाई मंदिर आमची आस आहे..
"दहितुले ची ’ मिसळ "लोखंडे "आवटे ,,ची भेळ . ,
"शिवाजी " वडापाव प्रसिद्ध आहे.
साहेब, दादा ,आण्णा यांचे आशीर्वाद आम्हास लाभले आहेत ,
म्हणूनच तर "महाळुंगे पडवळ" आमचा खास आहे..
यालाच २ रे नाव हुतात्मा बाबू गेनू नगर आहे ,
म्हणूनच आंबेगाव तालुक्यात महाळुंगे नंबर १ आहे ;
गर्व आहे मी "महाळुंगे कर" असल्याचा.
आमोल घायाळ

विलक्षण सुकुमार तेजात झळकला,

विलक्षण सुकुमार तेजात झळकला,
लाजेची लाली त्याच्या मुखड्यावरची
ठेवणीतला त्याचा इशारा ओळखला..!!

भुलवतो चंद्र शुक्ल-कृष्णाच्या कलेकलेने
नेहमीचाचं त्याचा हा संमोहनाचा डाव,
मनही मग उचंबळून त्याला भिडलं
धडधडणाऱ्या काळजाचा घेतला ठाव..!!

शेजारची अवखळ चांदणी खुदकन हसली
म्हणे माझ्या चंद्रावर हा देखील भाळला,
उत्तरलो मी तुझ्या मंगलमय प्रियकराने
कोजागिरीत पापाचा अंधार बघ जाळला..!!

तारकांच्या गुजगोष्टींनी कमाल तेव्हा केली
प्रकाशाच्या सोहळ्यात सखीची याद आली,
एकलेपणाची हुरहूर क्षणात मनी ह्या दाटली
रम्यतेची भावना तेव्हा आपसूक बाद झाली..!!

युगानुयुगे जगाच्या प्रेमाचा जो उद्घाता
खट्टू झालेलं माझं मन त्याने जाणलं,
प्रितीचं तेज माझ्या ओंजळीत ओतून
मी प्यायलेल्या चैतन्याने सुख भिनलं..!!

मनी जोपासलेल्या प्रीतीच्या चंद्राचा
अधिकचं खुलला रंग छान गव्हाळी,
चंद्राच्या इष्काचा अमृतप्याला रिचवून
माझ्या चंद्रकोरीला लाभली नव्हाळी..!!

म्हणुन सांगतो मित्रा, प्रेमात कधी पडू नकोस

म्हणुन सांगतो मित्रा, प्रेमात कधी पडू नकोस

ऐक सांगतो मित्रा, प्रेमात कधी पडू नकोस
पडलास जर एकदा, तर नशीबावर मात्र रडु नकोस

प्रेम म्हणजे विरह, प्रेम म्हणजे भ्रमवारा
मित्रांशी संबंध तुटणार, मैत्रीपासुन दुरावा
...
प्रेम म्हणजे दिवास्वप्ने, प्रेम म्हणजे जागरण
आपल्या आवडी-निवडीवर बदलाचे आक्रमण

म्हणुन सांगतो मित्रा, प्रेमात कधी पडू नकोस
पडलास जर एकदा, तर नशीबावर मात्र रडु नको..........

सोबतीला कुणी कधीचं जन्मभर राहत नाही

सोबतीला कुणी कधीचं जन्मभर राहत नाही
आपल्या वाटा चोखंदळ निवडायच्या आपण,
आशा कुणाची करण्यात वाया जात हे जीवन
चंदनाच्या शोधात हाती लागत राहत सरपण..!!

मला तर वाटत कोणी प्रेम करूच नये

तु मला भेटतेस रोजच स्वप्नामधे,

हुरळून जातो मी त्या एका स्पर्‍शामधे,

मधेच कधि जाग न यवी तु स्वप्नी अस्ताना

पहुडून जावे आपण दोघे चीम्ब ओल्या काळोखामधे....




मला तर वाटत कोणी प्रेम करूच नये
कारण प्रेम असताच न मिळण्या साठी..
आणि दु:ख देण्या साठी..

नदीकाठी माझं घर प्रत्येकाचा आरडा ओरडा आहे

नदीकाठी माझं घर
प्रत्येकाचा आरडा ओरडा आहे
कसं सांगू मी त्यांना,
माझा घसा किती कोरडा आहे


समजून घे तू फरक
स्वप्न आणि सत्यातला
तुझा आणि माझ्यातला
फक्त वास्तव असलेला.




आहे बरेच काही सांगायला मला
काळीज ठेव तूही ऐकायला मला!

ठेवून ओळ गेली माझ्या वहीत ती
(झाला उशीर थोडा वाचायला मला)

असतो कधी इथे मी, असतो कधी तिथे
जावे कुण्या दिशेने शोधायला मला?

का रात्र मी अमेची जागून काढली?
येणार चंद्र नव्हता भेटायला मला

भेटायला हवे ते, का भेटले कधी?
आले नको नको ते बिलगायला मला!

हलकेच हात मीही हातात घेतला
होतेच शब्द कोठे बोलायला मला?

एकदा कधी चुकतात माणसं

एकदा कधी चुकतात माणसं,
सारंच श्रेय हुकतात माणसं...

प्रेम करुन का प्रेम कधी मिळतं,
सावकाश हे शिकतात माणसं...

गंधासाठी दररोज कोवळ्या,
कितीक फुलांस विकतात माणसं

शतकानुशतके कुठलीशी आस,
जपून मनात थकतात माणसं...

जुनाट जखमा भरू लागल्या की,
नवीन सिगार फुकतात माणसं...

हरेक पाकळी गळुनिया जाते
अन अखेरीस सुकतात माणसं...

नको रे असं कडू बोलू 'शता'..
उगाचच किती दुखतात माणसं !!!

मूक अश्रू, ढाळणे, दिनरात ते- स्मरते मला

मूक अश्रू, ढाळणे, दिनरात ते- स्मरते मला
प्रेमवेड्या भावनांचे, पर्व ते- स्मरते मला

खेचता, अवचित मी पडदा तुझे ते लाजुनी,
ओढणीने चेहऱ्याला झाकणे-स्मरते मला.

तुजसी मी बोलाविता, मज भेटण्या, येणे तुझे,
भर दुपारी, तेही अनवाणीच गे-स्मरते मला

विषय विरहाचा, कधी निघताच, रात्री भेटीच्या,
ते तुझे रडुनी, मलाही रडविणे-स्मरते मला.

लपुनी तु भेटायची, मजला सखे गे, ज्या स्थळी,
उलटली वर्षे परंतु, स्थान ते-स्मरता मला.

हा पाऊसही तुझ्यासारखाच कधीही बरसतो

हा पाऊसही तुझ्यासारखाच
कधीही बरसतो
जाताना मला न चुकता सारी
तुझी स्वप्ने देऊन जातो





सप्तपदी ही रोज चालते तुझ्या सवेते
शतजन्मीचे हो माझे नाते

हळव्या तुझिया करात देता
करांगुळी ही रुप गोजिरी
गोड शिरशिरी उरांत फुलता
स्पर्शाने जे मुग्ध बोलते

करकमळाच्या देठाभवती
झिम्मा खेळत प्रीत बिलवरी
दृष्ट लाजरी जरीकाठी ती
तुझ्या लोचने वळूनी बघते

आठवे पाऊल प्रीत मंदिरी
अर्धांगी मी सगुण साजिरी
मूर्त होता तुझ्या शरीरी
अद्वैताचे दैवत होते

आलो जरी मी स्वप्न रुपी जीवनात राहीन सदैव तव नयनांत

कधी कधी प्रवास
संपूच नये असं वाटतं
संपण्यासाठी प्रवास
असूच नये असं वाटतं



कादंबरी म्हणून उल्लेख करावा
त्याला सुरवात असावी पण शेवट नसावा..
प्रत्येक पानावर तुझ्या प्रेमाचे शब्द असावे
फक्त त्या शब्दांना पूर्णविराम नसावा...



तुझ्यासाठी जगताना
आणखी काही काय हवं होतं
तुझ्यासाठी मरताना
मात्र मरण माझ स्वस्त होतं



मी असताना केवळ
जगण्याची आशा कर
का जातेस दूर अशी
मजसाठी मरणावरही मात कर




तुझ्यासाठी जगताना
आणखी काही काय हवं होतं
तुझ्यासाठी मरताना
मात्र मरण माझ स्वस्त होतं



आलो जरी मी स्वप्न रुपी जीवनात
राहीन सदैव तव नयनांत
ठाव घेउनी हृदयाचा
तू पाहिलेलं स्वप्न आणेन सत्यात

नशीब जोरावर असतं म्हणून सोन्यासारखी माणसं लाभतात,

नशीब जोरावर असतं म्हणून
सोन्यासारखी माणसं लाभतात,
कमतरता आपल्या जीवनातल्या
त्यांच्याचं येण्याने जागतात..!!

भेटलीस आम्हास दैवयोगाने
बनू तुझ्या अंगणातील फुले,
जीवनात आणिक काय हवं
पदरात घे तुझी हि लेकरे..!!

मनास मिळतो आधार खरा
नाही जाणवत मायेची उणीव,
शब्दांच्या खेळात रमताना
आपलेपणाची दिलीस जाणीव..!!

नाही विसरणार कधीचं प्रेमाला
लाभलं जे ह्या फसव्या दुनियेत,
ताई बनून आलीस आमच्यात
आमचीचं झालीस शब्द किमयेत..!!

रुसवे-फुगवे, मस्ती-मजाक छान
गप्पा-गोष्टी समजुतीची अशी जाण,
गरज लागायची आधाराची जेव्हा
जाणवून दिलंस सत्याचं भान..!!

तुझी साथ ताई हवी आहे कायम
आयुष्याच्या ह्या खडतर प्रवासात,
दोन शब्द प्रेमाचे पाहिजेत मला
सहभागी होण्या सुख दु:खात..!!

खूप प्रेम केले मी तिच्यावर

खूप प्रेम केले मी तिच्यावर

खूप प्रेम केले मी तिच्यावर
पण तिला कळलेच नाही
बरोबर, प्रेम आंधले असतेना
म्हणूनच कदाचित.

ती म्हणाली होती एकदा
की तुझ्याशिवाय जगू शकत नाही
पण तरी ती सोडून गेली
अरे विसरली असेल कदाचित.

खरे प्रेम करणे म्हणजे काय असते
मला माहीतच नाही, मी केल ते की
तिने केल ते? तिने केल तेच
असेल कदाचित.

ती जात होती मला सोडून
मी नाही आडवल,कारण ती खुश
होती म्हणून, कळले असेल का
तिला कदाचित?

मी अजूनही गप्पच आहे
एकाच आशेवर,
येईल ती पुन्हा माझ्या आयुष्यात
कदाचित!!!!!!!!

समोर तु येताच... होतेस अशी स्तब्ध.

खरे जगणे हे असते विदुषकाचे...
दुसरयांच्या हास्यावर घास पोटी...
मनात दु:खाचे डोंगर तरी...
सदा हसूच असते ओठी..



रित्या माझ्या हृदया मध्ये..
ना हक्क तुझा सहवास...
राहतेस तू तिथे अशी..
जसा तूच माझा श्वास..



मी भिजलो पावसात की
त्या भिजलेल्या क्षणात तू...
आठवणींनी भरलेल्या आठवनींच्या
प्रत्येक कणा कणात तू...



रचून मी शब्द ओव्या...
शब्द बांध बांधले...
मी पुन्हा त्या शब्दांना...
या कवीतेत ओवीले..



समोर तु येताच...
होतेस अशी स्तब्ध...
तुझ्या प्रत्येक अबोल प्रश्नाला...
असतो मी ही निशब्द...

एक कहानी त्याची आणि तीची

एक कहानी त्याची आणि तीची

तो आणि ती दोघेही मनोरुग्ण.... एकाच इस्पीतळात ......
इस्पीतळात ज्या दिवसा पासून भेटले होते तेव्हा पासूनचं
त्यांच्यात एक बंध निर्माण झाला होता.... सार्‍यांना त्याचे अप्रूप वाटे...
सारा दिवस ते सोबतचं असायचे... एकमेकांशी कधीचं बोलत नसत...
निशब्द..... जणू त्यांचे मन एकचं होते म्हणून त्यांना शब्दांची गरज नसावी....
असेचं रोज सारखे आजही ते इस्पीतळाच्या आवारात मूकपणे फिरत होते...
चालता चालता ते स्वीमींग पुल पाशी आले... काय झाले कुणास ठावूक...
त्याने तीचा हात झटकला आणि पळत जाउन पाण्यात उडी मारली...
ना बाहेर यायसाठी धडपड्ला..... ना तरंगायसाठी हात पाय मारले
त्या पाण्याच्या तळाशी जावून स्थिरावला .... आत्महत्या करत असावा तो बहुतेक...
हे पाहून क्षणातच ती ने सुध्दा पाण्यात उडी मारली....
त्याची मान पकडून त्याला लागलीच बाहेर घेवून आली... त्याचा जीव वाचवला...
दूसर्‍या दिवशी डॉक्टर आले...हे सगळे पाहून...ऐकून....
त्यांनी तीला त्वरीत हॉस्पीटल मधून सुटी दण्याचे फर्मावले....
कारण आता ती बरी झाली होती.... तीचे मन स्थीर झाले होते ती विचार करु शकत होती...
डॉक्टरांनी तीला बोलावले आणि म्हणाले
" तुझ्यासाठी एक चांगली आणि एक वाईट बातमी आहे"
तीच्या चेहर्‍यावर तसेचं शांत भाव होते... डोक्टर पुढे म्हणाले
" चांगली बातमी ही की तुला Discharge देण्यात येत आहे कारण
काल तु जे केले त्यावरुन तु आता जबाबदार झाली आहे आणि
तु आपल्या प्रेमाच्या व्यक्तींची काळजी घेवू शकते. तुझी कालची कृती
वेड्या माणसाची असूच शकत नाही म्हणून तु आता बाहेरच्या जगात जाण्यासाठी मुक्त आहे...
वाईट बातमी अशी की.... तो काल तु ज्याला वाचवले... तो मेला
त्याने रात्री काल रात्री स्वतःला पंख्याला टांगून घेतले....."
हे सांगताना डॉक्टरांचे डोळे पाणावले ..... त्यांनी तीच्या कडे पाहीले...
ती अजूनही तशीच शांत होती......मग म्हणाली
" त्याने स्वतःला नाही टंगून घेतले... तो ओला झाला होता ना
म्हणून लवकर वाळावा यासाठी मी त्याला
पंख्याला टांगले......... मी घरी केव्हा जाउ शकते ?????
काय बोलावे डॉक्टरांना कळेनासे झाले .....!!!! डॉक्टरांकडे तीच्या प्रश्नाचे उत्तर नव्हते...

तू खुदकन हसलीस कि.... सारे जीवन गालात हसते.

तुझ्या मिठीत येण्यास
आतुर हा जीव
हतबल हे हात
करी मनाची कीव



मी आहे थोडा वेगळा...
शब्दात रमून जाणारा...
तुझ्या आठवणींना ...
शब्दात जोडणारा.



कोजागिरीचा चंद्र कसा...
तुझ्या पुढे झुकतोय....
माझ्या या चांदणी समोर...
तो हि दोन क्षण मागतोय...



चेहरा तुझा ग....
जसा चंद्र पौर्णिमेचा ....
रुसतेस कधी कधी तू...
तो दिवस अमावाशेचा...


ओठांची किमया खरी..
ओठांनाच कळते...
ओठांवर ओठ टेकवताच...
ओठ ही थर थर कापते..


तू रुसलीस कि....
नशीब माझे रुसते...
तू खुदकन हसलीस कि....
सारे जीवन गालात हसते.




भिरभिरत्या पाखराचे ...
सुंदर पंख जाळीदार ....
पंखात बळ एवढे....
कि व्यापून जाईल आकाश सारं