मंगळवार, १ नोव्हेंबर, २०११

स्वप्नात असतात ,पण डोळ्यात दिसतात

अनुभवलेल्या नसतात ,पण आपल्याच वाटतात
मनात असतात, पण समोर दिसतात
स्वप्नात असतात ,पण डोळ्यात दिसतात
कानात बोलतात ,पण डोळे लाजतात
पावसात भिजतात ,पण चिंब करतात
साथ देतात ,पण अदृश्य असतात
गाण्यात असतात ,पण शांत राहतात
ओठात असतात ,पण अबोल बोलतात
गंधात असतात ,पण श्वासात फुलतात
वाऱ्यात डोलतात ,पण स्वप्नात झूलतात
गर्दीत झोपतात ,पण एकट्यात जागतात
नावात नसतात ,पण गावात असतात
नात्यात नसतात ,पण भात्यात असतात

का बरं असं त्या ,कोड्यात टाकतात ?
कांही आठवणी अशा का असतात ?

गुलाबाची पाहून कळी..

गुलाबाची पाहून कळी..
तू त्याच्या सारखीच फुलून जातेस...
त्याच्या बदल्यात मग तू मला....
एक चुंबन देऊन जातेस....


लाजेने चूर होऊन तू..
माझ्या पासून दूर जायचीस....
दूर जात असलीस तरी.....
एकदा मागे वळून पहायचीस......

याच तुझ्या अदेवर ... झालो मी फिदा..

प्रेमाला तुझ्या मी...
हातावरी फोडा प्रमाणे जपतोय ....
तुला त्रास होऊन नये म्हणून.....
तुला पाहताना चोरा प्रमाणे वागतोय...



मी समोर येताच....
तू हळूच लाजतेस....
स्पर्श माझा होताच मग....
फुला सारखी फुलून जातेस...




वेड लावते मला..
हसून लाजणे तुझे......
गालावरच्या खळीतले ...
ते गोड हसणे तुझे....



याच तुझ्या अदेवर ...
झालो मी फिदा......
कुणालाही वेद लासेल..
अशी कातील तुझी अदा

मना बाहेरच्या स्मशानात

मना बाहेरच्या स्मशानात
जाळले मी प्रेमाचे प्रेत
अखात बसलो त्याच राखेत
नवीन दुःखांचे बेत....



पाहत बसतो मी क्षितिजावर
पक्षी उडत जाताना
परत येईल प्रेम तसेच
एक एक धागा तोडत जाताना...



तू फक्त हसलीस
तर शब्द फुले होतात
तुझ्या स्पर्शाने काटेही
बोथट होण्यास तरसतात...

दिवस होतात आठवडे, आठवडे महिने न महिने वर्ष,

दिवस होतात आठवडे, आठवडे महिने न महिने वर्ष,

पण काही आठवणींचा मात्र कधीच सुटत नाही स्पर्श...

आईनी गायलेली ती बेसूर अंगाई,

तिच्या कुशीत घेतलेला तो सुखाचा श्वास,

आजही कधीतरी होतो त्याचा आभास.

ओल्या मातीचा तो सुगंध,

पहिल्या पावसाचा आतुर आनंद.

शाळेत जाण्याची प्रचंड भीती,

एकदा मित्र मिळाले की परत न येण्याची विनंती.

उशिरा येणार्या बाबांची वाट पाहणं,

ते आले की त्यांना पळत जाऊन मिठी मारणं.

त्यांनी सांगितलेल्या रात्रीच्या गोष्टी

ऐकून परी राणीच्या जगात रमण.

ते लपाछापी चे डाव,

तो लपंडाव चा खेळ...

ह्या निमित्ताने होणारा ,

रोज मित्रांशी मेळ.

रोजचे तेच खेळ,

न त्यात खरचटलेले पाय...

ते नसते तर

लहानपण असत तरी काय.

अंधारात जायची अतोनात भीती,

अश्या वेळी धड धड्णारी छाती...

त्या मधून येणारा आजोबांचा हात,

तो प्रेमाचा स्पर्श करी त्या भीती वर पण मात.

खाण्याची नाटकं ,

आवडी निवडी अनेक...

त्या साठी आईनी करावे

पदार्थ कित्येक...

गरम गरम वरण भात.,

न त्यावर साजूक तूप,

आजी नी ते भरवलं की मात्र,

आपोआप भूक लागे खूप.

रोजची शाळा

न शाळे नंतर खायचे पेरू व दाणे..

त्या साठी घरून मिळणारे फक्त ४ आणे.

हिवाळ्याची सुट्टी,

त्यात दुपारचे पेप्सी न गोळा...

पत्त्यांचे डाव रचायला जमणारा मित्रांचा मेळा.

अजूनही आठवतात ते दिवस

न होऊन जाता मन अवाक

जणू कानावर ऐकू आलेली एक अलगद हाक.