सोमवार, २६ सप्टेंबर, २०११

मोबाईलची लावणी----- ----

मोबाईलची लावणी----- ----

सिमकार्ड नवे,ड्युएल हवे
राया जरा तुमीच इचार करा
माझा मोबाईल रिचार्ज करा!!धृ.!!

त्यात फोटूची सोय तर हवी
ब्याटरी बी पावरबाज नवी
लई गाणी रिकार्ड व्हावी
कानी कर्णे लावून ऐकावी
हातात घेऊन ऐटीत त्याला झोकबाज कव्हर करा !!१!!

कुठलेबी कार्ड चालेल
प्रीपेडची सुविधा असेल
राती मेसेज तुमचा येईल
माझा रिप्लाय लगी जाईल
रंग तांबडा,फोन देखणा न्यारा त्याचा नखरा !!२!!

त्याला कव्हर मी घालीन
नित हृदयाशी ठेवीन
तुम्हासंगे रोज बोलीन
असा फुलावानी झेलीन
हातात माझ्या देऊन त्याला हात हाती धरा!!३!!

बीअर फक्त बीअर नाही

बीअर फक्त बीअर नाही
तुझ्या माझ्या स्टोरी चा थ्रील्लर आहे
तू आलीस तेव्हा celebration
गेलीस तर परत हिनेच दिला साथ माझा
आणि केले tension चे temporary stop function...

बीअर फक्त बीअर नाही
तुझ्या माझ्या स्टोरी चा थ्रील्लर आहे

तुझी हि सवत आहे असे तुला वाटायचे
पण खर तेच आहे हे राहिले तुला सांगायचे
तू नसताना हीच माझ्या सोबत असायची
तू असताना सुधा हि कधीच साथ नाही सोडायची
म्हणून दिला तुला सोडून पण नाही सोडू शकलो BEER.

मूल आई पेक्षा मोठ कस होईल

साथ स्वतःचीच जर असेलं स्वतःला
परक्या जगात आपलंही मग सहज निभवतं,
साथ दुसऱ्याची जर कधी बाळगली मनी
कालांतराने ते मागण साथीचही मन उबवतं..!!




डोळे मिटले की तू दिसतेस
डोळे उघडले की हे जग !
तुलाही मी दिसतो का ?
जरा डोळे मिटून बग......





सांत्वन म्हणजे दुखांच मूल. मूल आई पेक्षा मोठ कस होईल ?
मूल मोठ ह्वायला लागल कि आई आणखी मोठी व्ह्यायला लागते. म्हणून समजूत घालणार कुणी भेटलं म्हणजे हुंदके वाढतात.
हसता हसता माणूस एका क्षणात थांबू शकतो. दुखातली व्यक्ती रडण एका क्षणात विसरू शकत नाही.

तुझ माझ्यावर अन माझ तुझ्यावर प्रेम जडत आहे..

माझ्यातला ईश्वर कदाचित
पंगु झालेला दिसतोय
नाहीतर मी कशाला उगा
दगडांचे पाय धरतोय..?




तुला दूरून पाहताना....
डोळ्यातील अश्रूही मोहून जायचे...
त्यारात्री मग आकाशात..
चंद्र ऐवजी तुझेच रूप दिसायचे..




मनी भाव आज
अश्रू वाटे वाहतायत
होठ जरी असेल अबोल
डोळ्यांनी डाव साधलाय


खरच सांगतो त्या पाण्यामधे
माझ काळीज बुडत आहे
तुझ माझ्यावर अन
माझ तुझ्यावर प्रेम जडत आहे..

भूतकाळाचा पडदा वर्तमानाच्या डोळ्यांवर

खुललेली प्रीत सख्या
मना वेड लाऊनि जाते
रूप मेहंदीच घेऊन मग ती
......तुलाही रंगवून जाते !


भूतकाळाचा पडदा
वर्तमानाच्या डोळ्यांवर
भविष्य धडकले
आंधळ्या वर्तमानावर...



संध्याकाळ ती उतरली
तिन्हीसांजेच्या तळी
तळ्याकाठच्या झाडावरती
हुरहुरणारी एक कळी....
फुलू पाहते ती वेडी
नाजूक स्पर्शास आसुसली
खुडू नका हा जन्म माझा
फुल होण्यास तरसली...
उगवेल सकाळ ती
गंध फुलांचा दरवळेल
कोमेजलेल्या कळीला
जेव्हा जगण्याचे वरदान मिळेल..

श्वास तुझे असताना जगते मी

तुझ्या विचारात सख्या रमते मी

आठवोस तू पण जळते मी

श्वास तुझे असताना जगते मी

दिवस असो कि रात्र

कधी विसरते कधी आठवते तुला मी

खेळ हे प्रीतीचे खेळतोस तू

पण कधी जिंकते कधी हरते तुला मी..

प्रत्येक आठवणीत तूला स्थान पहीले..

तुझ्या मिलनाची..
साक्ष देतोय हा किनारा.
त्याच्या प्रत्येक लाटेवर..
आपल्या प्रितीचा शहारा..


तुझ्या त्या गोड आठवणी
मला स्वप्नातून तुझ्या जवळ आणतात....
तू माझ्या हृदयात अशी काही रुझली आहेस की
तो देव ही आपल्या प्रेमाचा साक्षी बनला आहे.


होऊनी वाळू मी किनारी असावे
स्पर्श करण्यास मला तू फेसाळून उठावे
कधी अंबरात मी कधी क्षितिजात राहावे
संध्येच्या रंगत तू मला पूर्णपणे रंगवावे..


प्रत्येक क्षणाला आठवण तूझी..
शांत मनात या लहर तुझी..
तरी का नाही झाली तू माझी..

प्रत्येक आठवणीत तूला स्थान पहीले..
का कुणास ठाऊक हे असे का घडले..
शहाण्या सारखा वागलो तरी तुझ्या वरच सारं अडले..

परक्या सारखं तुझ्याशी नाही वागता येत मला..
वारयासंगे उनाड त्या नाही वाहता येत मला..
रणांगनात या प्रेमाच्या नाही जिंकता आलं मला.

आपलं नात म्हणजे.. तो अथांग सागर अन किनारा..

मी गूंफली माळ...
माझ्या स्तब्द शब्दांची..
तुला ती कळली नाही...
विखूरळी ती माळ भावनांची..


आज वेळ माझ्या हाती असती,
कुंकू माझ्या नावाचे तुझ्या माथी असते..
का कुणास ठाऊक वेळेने हा दगा केला..
माझ्या जन्मा आधीच तुला जन्म दिला...




काल पुस्तक वाचताना...
त्या तुझं नाव वाचनात आलं...
थोडा वेळ स्तब्द होऊन त्याला पाहीलं..
हळूच ते पापण्यांनी भिजून गेलं..



झालं गेलं विसरुन जा..
प्रत्येक जण सांगत असतो..
तुझ्या पासून दुर जाण्याचा..
सल्ला प्रत्येक जण देत असतो..




माझ्या नावातचं सामावला..
तुझ्या नावाचा पसारा...
आपलं नात म्हणजे..
तो अथांग सागर अन किनारा..




मी तिथेन असेन..
त्या सागराच्या किनारयाशी..
तु मात्र जपुन ये..
नजर आहे तूझ्यावर सर्वांची..

एक क्षण पुरे तुझे रूप मनात साठवायला,

तुझ्या सोबत मला भिजायचयं..
या मुसळधार पावसात..
मिठीत माझ्या आलीस की..
मिसळून जातील श्वासात श्वास...


मिठीतली तू माझ्या..
नकळत माझी होऊन जातेस..
तो क्षण होतो धुंद...
अन हृदय एकमेकाला बिलगून जाते..



हृदयाला भिडले हृदय..
दोघे होतात गुंग...
मन मात्र एकटे...
पुढील विचारात दंग...



एक क्षण पुरे तुझे रूप मनात साठवायला,
मनातल्या मनात आठवून गालातल्या गालात हसायला.......
एक क्षण पुरे तुझा आवाज ऐकायला ,
कानातल्या कानात त्याची धून वाजायला......
एक क्षण पुरे तुझ्या डोळ्यांमध्ये पाहायला,
... त्यांच्यातला प्रेम माझ्या डोळ्यांत साठवायला.....
एक क्षण पुरे तुझ्यावर भरभरून प्रेम कराय्ला,
तुझ्या प्रेमासाठी क्षण क्षण तरसायला....

जय जिजाऊ ....

नको अता विझता दिवा,मज ज्योत पाहिजे
नभी छेदणारा वादळी असा झोत पाहिजे

माझ्याच पोटी मला एकदा माझी लेक होऊ दे
जगेन नीर्भई ,कशा सोबती गणगोत पाहिजे

अत्याचार ,अन्याय का म्हणून नशिबी घेऊ
नराधमी जगलात या,वाघिणीची जात पाहिजे

नवी उशा तूच हो तुझ्यातुनी,दाहीदिशा उजळूनी
जुन्यावरी कर मात तू,नवी कोरी बात पाहिजे

हो जिजाऊ,कधी झाशीची राणी,पाठी आई भवानी
दुष्ट मनसुब्याना जाळण्या,धग धगती वात पाहिजे

तुझ्या साठी आणलेला गजरा..

तुझ्या माझ्या प्रेमाचा..
बघ चोहीकडे पसरला सुगंध...
तू हसलीस गालात अन...
फुलून आला निशिगंध...



लगेल कधी अंगाला तुझ्या..
हळद माझ्या नावाची....
येता जाता हसत असते...
ती वाट तुझ्या गावाची..



तुझ्या साठी आणलेला गजरा..
फ़ुलला होता पाहून तुझा चेहरा हसरा...
तुझ्या येण्याची वाट पाहून जो...
सोडत होता जो प्राण बिचारा...

माझी सुट्टी.. ती धमाल तुझी

मीच मिचत्या डोळ्यांनी
हवासा तू वाघोबा करायची
मुरडलेल्या नाकाला तुझ्याच
तू छानस मुंगुस म्हणायची

छोटासा तो फ्रॉक नेसवून
त्या बाहुल्यांना वेणी करायची
इवल्या हातभर बांगड्या घालून
पडत-उठत घरभर फिरायची

माझी सुट्टी.. ती धमाल तुझी
पाठी बसून माझ्या मला घोडा म्हणायची
दमून दमून इवलासा जीव
बिलगून मला,तिथेच निजायची

आजी-आजोबांची लाडकी तू
ती अख्या चाळभर फिरायची
मंदिरातल्या बाप्पाला साखर देऊन
प्रार्थनेत आईस स्क्रीम मागायची

कार्टून बघायला वेळच वेळ तुला
अभ्यासाच्या नावाने दूर पळायची
जेवायचा तुला कंटाळा फार..
घाई ती आजीच्या तोंडून गोष्टी ऐकायची

घर म्हणजे आमचे तीच जणू ...
दिवसाची करंगळी ती हळूच सोडायची
इवल्याश्या श्वासांचा आराम तो
नाजूक पापण्यात आम्हाला घेऊन निजायची

कोमेजलेल्या तुझ्या आठवणींना..

तुझ्या माझ्या प्रेमाची साद...
देते ती संध्याकाळ ची वेळ...
तुझे खुदकन हसणे - रुसणे..
आणि तो जिवघेणा खेळ..




तूझी आठवण आली की..
मनाला सतावतो तो..
या चारोळीचा..
पहीला शब्द...



नकळत माझ्या ह्रदयाने...
तूझ्या हृदयाला घातलेली साद..
तूझ्या हि हृदयाने मग दिलेला...
तो प्रेमळ प्रतिसाद...



कोमेजलेल्या तुझ्या आठवणींना..
पुन्हा नव्याने बहर येऊ दे..
पुन्हा एकदा हृदयात माझ्या...
त्यांना कहर करू दे...


का बोलली ती अशी,
"एवढा नको रे वेडा होऊ मझ्यासाठी,
मी नही रे तुझ्यासाठी....."
आता कसं सांगु तिला की, "
हे जगणं फक्त तुझ्यासाठी...

येईल मी परतून तुझ्यासाठी सखे

तुज ते मिठीत येण
अन मज स्वतःलाच विसरून जाण
जणू परिमलचा सुवास तो सख्ये
हवेत दरवळून जाण



वळवाचा पाऊस हि
भिजवतो मनाला
तरी सख्ये दोष
तुज श्रावणसरीना



येईल मी परतून तुझ्यासाठी सखे
वाट बघ माझी पौर्णिमेच्या चांदण्यांत,
अवचित उभा राहील तुझ्या समोर
मग्न असशील जेव्हा प्राजक्ताच्या अंगणात..!!


काजळी भरलेलं डोळ्याची ती किनार
मखमली होटाची ती हुनर
मदमस्त तो तिचा बांधा
त्यांनीच केला आहे जगणायचा वांदा



आवडेल मला जाणून घ्यायला...
काय दडलंय तुझ्या मनात..
नाहीच जाणता आले तर..
सांगशील ना हक्काने कानात..

अळवाच्या पानावरचं पाणी होतं माझं प्रेम,

अळवाच्या पानावरचं पाणी होतं माझं प्रेम,
करत असूनही सांगता येत नव्हतं माझं प्रेम,
भावनेच्या ओघात वाहत चाललं होतं माझं प्रेम,
आठवानींच्या सागरात बुडत चाललं होतं माझं प्रेम,
पावसांच्या सरीत चिंब न्हालं होतं माझं प्रेम,
थंडीच्या गारव्यात गारठलं होतं माझं प्रेम,
तिच्या एकेका भेटीसाठी आसुसलं होतं माझं प्रेम,
गप्पा तिच्याशी मारताना रंगून जात होतं माझं प्रेम,
मनात कुठेतरी खोलवर दडलं होतं माझं प्रेम,
कललच नाही मला कसं जडलं माझं प्रेम,
वाटल होतं सांगुन टाकावं तिला माझं प्रेम,
तिच्या मनाला पटेल असं समजवावं माझं प्रेम,
सर्वांनी सांगितलं एकतर्फी प्रेम म्हणजे माझं प्रेम,
सांगितल्याविना तिला झुरतं राहिलं होतं माझं प्रेम,
मनातल्या मनात कुठवर लपवून ठेवावं माझं प्रेम,
माझ्याच मनात द्वंद्व निर्माण करत माझं प्रेम,
होकार-नकाराच्या वादलात सापडलं होतं माझं प्रेम,
निश्चय केलाच तिला सांगाव माझं प्रेम,
वर्षे गेली... सांगायची तयारी करायला माझं प्रेम,
शोधून मुहूर्तं सापडला, तिला सांगायला माझं प्रेम,
गाठलं रस्त्यातचं तिला, एकदा सांगायला माझं प्रेमथांबवलं तिनेच मला,
सांगण्यापुर्वीच माझं प्रेम,
हातातली पत्रिका पाहून गोथालं तिथेच माझं प्रेम,
सहकुटुम्ब, सहपरिवार लग्नाला अगत्य यायचं सांगुन गेलं माझं प्रेम.