मंगळवार, २ ऑगस्ट, २०११

नयनाच्या अथांग सागरात सये

प्रतिबिंब उमटले बघं नयनात सये
मिठीत कसे दोन जीव विसावले
दिसता मिलनाचा रम्य सोहळा
सूर्याने मावळून चंद्राला जागवले..

नयनाच्या अथांग सागरात सये
बघं भावनांची नाव दिसत आहे
मावळत सूर्य हळूच निरोप देत
सोनेरी रंग विखरून हसत आहे

नकळत भेटलीस तू सये
नयनात मग अश्रू साठले,
तुझ्यासामोरी सांडण्या पूर्वी
पावसानेच बघं मला गाठले.

तुझ्या माझ्या नात्यात..
आहेत असे बंध..
जसे फुलावे मोगऱ्याचे फुल..
अन दरवळावा सुगंध..


तुला समोर येताच..
मनात माझ्या भरुन गेलीस..
तु ही मग तुझ्या डोळ्यांनी,
मला ओवाळून गेलीस.

थेंबभर माझं मन,
तुझ्या साठी वाहून गेले..
तू मला विसरलीस..
पण तुला विसरायचे राहून गेले..

मैत्री म्हणजे सुंदर पहाट

मैत्री म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..
फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं
कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं
आठवडयातून ऊगवणारी रविवारची सकाळ
हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..
मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवा
अंगावर घ्यावा असा राघवशेला
एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला...
ऍकत रहावी अशी हरीची बासरी
अस्मानीची असावी जशी एक परी...
मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी
दु:खावरची हळुवार जादूची झप्पी
मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात
नेहमीकरता असणारी तुझीचं साथ.....
सोबत रहा तू फक्त.. इतकंचं एक मागणं आहे...
तू असल्यावर अवघं जीवन देखील गाणं आहे.

मैत्रीतले प्रेम....की प्रेमातली मैत्री

मैत्रीतले प्रेम....की प्रेमातली मैत्री

कधी न संपणारी
फक्त मैत्रीच असत्ते
मैत्रीमधले प्रेमही तसेच असते
कधीच न संपणारे

मैत्रीमध्ये हसवा रुसवा असतो
प्रेमात फक्त रुसवा अन फसवा असतो
मैत्री नाजूक धागा आणि अटूट बंधन
प्रेम कीतीही नाजूक पण टूटतेच कधीतरी

मैत्रीनेच प्रेमाला सुरूवात होते
ऐकल होते पण खरच आहे की..
माझ्या मैत्रीत प्रेम आहे...
पण माझ्या प्रेमात मैत्री कधीच नसणार...
फक्त प्रेम आणि फक्त प्रेमच असेल..

तुम्हाला कोणते प्रेम आवडते...
प्रेमात मैत्री असते मैत्रीनंतर प्रेम असते
मैत्रीपेक्षा जास्त प्रेम की प्रेमापेक्षा जास्त मैत्री?
मग तूम्ही काय मागाल... मैत्री की प्रेम ?

एक प्रवास मैत्रीचा

एक प्रवास मैत्रीचा
एक प्रवास मैत्रीचा
जश्या हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येवुन जावी
अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..

एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणार-या गारांचा
न बोलताही बरच काही सांगणारा
अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..

एक प्रवास शुन्याचा
जणु हीमालयाशी भिडण्याचा
शुन्यातुन नवे जग साकारणारा
अन नव्या निर्मितीची चाहुल देणारा..

एक प्रवास जगण्याचा
क्शणा क्शणाला माणुस घडवण्याचा
हसता हसता रडवणारा
अन रडवुन हळुच हसवणारा..

एक प्रवास प्रेमाचा
भुरभुरणार-या दोन जिवांचा
जिंकलो तर संसार मांडायचा
अन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या..

एक प्रवास प्रयत-नांचा
सुख़ दुख़ातील नाजुक क्शणांचा
अखंड घडवणार-या माणुसकीचा
अन नवी उमेद देणार-या घडींचा..

एक प्रवास..
तुमच्या आमच्या आवडीचा
साठवु म्हंटले तर साठवणींचा
आठवु म्हंटले तर आठवणींचा

कधी असंही जगाव लागत.

कधी असंही जगाव लागत.
खोट्या हस्याच्या पडद्याआड खरे दुःखलपवाव लागतं करतव्याच्या नावाखाली.
स्वताःला राबवाव लागतं इतराना आनंदी ठेवण्यासाठी डोळ्यातले
पाणी लपवाव लागतं तीवृ इच्छा असुन देखिल नाही म्हणावं लागतं
खुप प्रेम असून देखील नाही असं दाखवाव लागतं,

चिंब झाले ते कागद प्रेमाचे

स्वप्नांच्या त्या सागरात
पोहायला मी रोज जातो
परतताना नेहमी सोबत
विश्वासाचे मोती आणतो

काळंशार आभाळ चांदण्यासवे सये
अन रातराणीची दरवळ सुगंधाची
बघं मन वेडे आतुर भेटीस तुझ्या
जशी वाट पाहे चातक पावसाची

एकांताला पारखे दोन प्रेमी जीव
चंद्रात नि आपल्या प्रेमात काय फरक
दोघांमधून तिसरा कधीही न जाने
यालाच म्हणत असतील का गं नरक..!!


शब्दांनी ढाळली आसवे सये
चिंब झाले ते कागद प्रेमाचे
सूर साज चढविला आठवांनी
भिजले मन या खुळ्या पामराचे

जिवलग मिञ

या जगात वाट दाखवणारे
अनेकजण असतात,पण चालणारे आपण एकटेच असतो. पडल्यावर हसणारे अनेकजण असतात,
आणि मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलग मिञच असतात.....

लिहीन म्हणतोय तुझ्यावर.. गीत चंद्र ताऱ्यांचे..

पौर्णिमेच्या मागंपुढं चंद्राच्या ह्या कला,
तुझ्यासाठी सखे चंद्र कोरीचा हा झुला,
चांदण्यांच्या संगतीत चंद्रावरी झुले चंद्र,
अमावसेला मग राणी कवेत घेईल मी तुला..!!


तुला न पाहता..
तुझ्यावर रचले शब्द..
जर तुला पहिले तर..
माझे शब्दच होतील निशब्द..



लिहीन म्हणतोय तुझ्यावर..
गीत चंद्र ताऱ्यांचे..
चंद्राला हि मोहून टाकेल..
असे हे मोहक रूप तुझे सखे..


झरा जरी खळखळत असला..
तरी.. दऱ्या खोर्याचे सोसतो घाव..
तो जे जगतो त्याचेच..
तर जीवन असे नाव...

बर झाल प्रेमाच्या बंधनातुन मुक्त केलस

बर झाल प्रेमाच्या बंधनातुन मुक्त केलस,
अस बंधन जे कधी तुटनार नाही वाटत होत,
बर झाल परक मला केलस,
कारण डोळ्यातील अश्रुंचा भाव मज कळला,
आंधळ्या प्रेमाच्या विश्वाचा अर्थ मला वळला,
......वाटत होत आयुष्यात कुणाची साथ हवी
पण अशी साथ दिलीस की कोणाचा विचार देखील मनात येणार नाही,
मीच दु:खी नाहीय,
तुही रडतेस,
आता तुझे अश्रु पुसण्याचा अधिकार मी गमावलोय,
माझ्याच चुकीने मी तुला परका झालोय.