लगन सराई
बायको अन साई
मेंदी मुरेल...
सासरा अन सासूबाई
लायटावाली छत्री
घोडी,वाजंत्री
पेल कोणी.. बिन पेल
थंड दारू.. संत्री
फटाके रंगीत
सनई संगीत
अत्तर दरवळ ...
मंत्रावाला पंडित
नवरी -नवरदेव
भजे, बुंदी, शेव
अक्षद टाकून ....
पंगत सोडून बुफेत जेव
नवरीची बहिण
लिपस्टिक मैत्रीण
नजरा नजर ...
क्लिअर आपली लाईन
निघाची घाई
झाली बिदाई
मिशन-ए-लगीन
सुरु लगीन सराई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा