शनिवार, २३ एप्रिल, २०११

एक दिवस विचारल तिला

सहज एक दिवस विचारल तिला
सखे मी तुला काय आणु ?
थोडीशी फुल,थोडेसे मोती
आणि चांदण आण ओंजळ्भरून

मनात म्हणालो स्वतालाच
प्रेम भलतच महाग असत
जमल तर वार्‍याची झुळुक
नाहीतर जाळणारी आग असत

ओंजळभरून फुल
एक दिवस तिला नेउन दिली
काय सांगू आनंदाने
सखी मझी हरकून गेली

आज फुल दिली
उद्या मोती देइल
ओंजळ्भरून चांदण
माझ्यासाठी घेउन येइल

शेवटी एक दिवस सांगितल तिला
चांदण तर खूप दूर आहे
मी तुला मोतीही देउ शकत नाही
तुझी एवढीशी इच्छा माझ्याकडून
पूर्ण होउ शकत नाही

क्षणभराच्या शांततेनंतर
सार आभाळ भरून आल
माझ चांदण माझ्या समोर
रीमझीम रीमझीम बरसून गेल

किती रे वेडा आहेस तू
प्रेम कधी काही मागत का?
प्रेमाला प्रेमाशिवाय
दुसर कधीकाही लागत का?

स्वतालाच विसरून स्वतालाच
प्रेम म्हणजे देण असत
आयुष्याला सुरात बांधेल
प्रेम अस गाण असत
मोती काय चांदण काय
प्रेम कधी कोणी मोजत का?
चंद्र समोर असताना
कोणी चांदण शोधत का???

सांग ना रे सख्या तू असा कसा

मनातले प्रेम चेह-यावर
दिसू देत नाहीस,
डोळ्यांनी बोलतोस पण
ओठांवर येऊ देत नाहीस,
तुझा हा प्रेमाचा खेळ मी ओळखू तरी कसा....!!
सांग ना रे सख्या तू असा कसा......???

फोनवर बरेच सांगतोस पण
प्रेमळ काहीच बोलत नाही
भेटीच्या तारखा ठरवतोस पण
भेटणे काही होतच नाही
आहेस माझा प्रियकर पण भासे जणू मित्र जसा....!!
सांग ना रे सख्या तू असा कसा......???

तुझ्यावर केलेली कविताही तू
वाचून नुसता हसतोस,
वाटतं काहीतरी बोलशील पण
"छान" बोलून गप्प बसतोस
प्रोफेशनल तुझं वागणं तू रोमांटिक होशीलच कसा...!!
सांग ना रे सख्या तू असा कसा......???

आजारी असली जरी मी तरी
तू एकदाच फोन करतोस,
त्यातही तब्येत विचारायची सोडून
काहीतरीच बडबडत बसतोस,
आहे जसा माझ्या मनातला राजा नाहीच मुळी तू तसा...!!
सांग ना रे सख्या तू असा कसा......???

रागावलीच मी तर
तुला मुळीच करमत नाही,
मझ्याशी बोलल्या शिवाय
तुलाही राहवत नाही,
समजून घेते मी तुला कारण मला हि तू आवडतोस असा
सांग ना रे सख्या तू असा कसा......???

एक असावा मित्र सख्खा

एक असावा मित्र सख्खा
तो नेहमी असावा जवळ
प्रत्येक अवघड,सोप्या गोष्टीला
असावा आपल्या सोबत ......

मधल्या सुट्टीत माझ्याकडे
पैसे नसले तरी स्वताच्या
कॅन्टीन च्या खात्यातून
वडा पाव,कटिंग पाजणारा
असावा एक मित्र सख्खा ......

शाळेतील तोंडी परीक्षेला वही
जरी नसली माझी कम्प्लीट
लगेच माझ्या नावाचे sticker
लाऊन बाईना देणारा
असावा एक मित्र सख्खा .....

परिक्षेच्या आधी मला अभ्यास
कर असे ओरडून-ओरडून सांगणारा...
मला जरी काही आले नाही,त स्वताचा
अभ्यास सोडून मला समजावणारा ....
असावा एक मित्र सख्खा .....

प्रत्येक रविवारी असावा सोबत
पिक्चर जाताना,नसले
पैसे दोघांकडे तरी करूया
काहीतरी setting असे
म्हणणार ....
असावा एक मित्र सख्खा ....

प्रत्येक सुटीच्या वेळी क्रिकेट
खेळताना १ली batting मला देणारा
out असलो तरी आणखी एक चान्स देणारा....
असावा एक मित्र सख्खा.......

एका सरड्याने इतके रंग बदलले

एका सरड्याने इतके रंग बदलले
की त्याला स्वत:चा खरा रंग कळेना
त्याने खूप विचार केला तरी
तो कसा होता ते
त्याला काही केल्या आठवेना

तो म्हणाला,
"मी आकाशाला निळा वाटतो
मी गवताला हिरवा वाटतो
मी सर्वांना त्यांच्यासारखाच वाटतो
मी खरा कसा ते, कोणाला कळतं
वेगळा आहे ते कोणाला कळतं"

मग त्याने एकच रंग ठेवायचं ठरवलं
एकाच रंगाला त्याचा खरा रंग मानलं

गवतावरच नाही तर
मातीवर पण तो रहायला लागला हिरवा
त्याला काही खोडकर मुलांनी
मातीवर ओळखलं परवा

त्याला या खऱ्या रंगाने
त्याचा वेगळेपणा दाखवला
आणि या खऱ्या रंगामुळे
त्या मुलांनी त्याला दगड मारून संपवला

सरडा मेला तरी
लोकांना जिवनाचा नियम कळावा
चार-चौघात गेल्यावर आपण
त्यांच्याप्रमाणे रंग बदलावा
कितीही वाईट वाटलं तरी
आपला खरा रंग लपवावा
कारण हे जग वेगळेपणाला घातक मानतं
आणि मग स्वत:च घातक बनून
आपल्याला आपला रंग बदलायला लावतं

हो मलाही आताच कळलय..


"हो मलाही आताच कळलय....

त्या गोड अबोलीला बेधुंद वाऱ्याने खुप खुप छळलय.



हो मीही आताच पाहिलय....

ते वेड कोकरू कुणाची तरी वाट पाहत माझ्यासारखाच एकट्यानेच उभ राहिलय.



हो आणि आताच त्या नाजुक कळीला त्या हिरव्या पानाने छेड़लय....

अरे आता तर त्या बिचारीला चोहिकडून द्रुष्ट काट्यानी घेरलय.



आणि तो पावसाचा थेंब तिला शोधत वाहून खुप खुप दमलाय....

बिचारा एकटाच संध्याकाळी किनाऱ्यावर तिचा चेहरा शोधत चंद्राकडे पहाण्यात रमलाय.



तिकडे ते गवताच पात पण स्वतः शीच एकट्यानेच बडबड करतय....

उन्हानी त्रासलेल एकट आता पावसाच्या दवबिंदुनी पोट गच्च भरतय.



काय बात आहे ? तो गुलाब पण एकट्यानेच गालातल्या गालात हसतोय....

आधी मुद्दाम कळीला खेटून छेडून आता खोट खोट रुसतोय.



अरे कुठेतरी वेड एक पाखरू एक कविता खुश होउन वाचतय....

हरवलय वेगळ्याच जगात,जस पावसामधे पंख खोलुन मोरासारख नाचतय.



अरे खरच....



तुमच्या ओळखीचा अक्षय आज थोडा वेगलाच वागतोय....

आलो आहे परत प्रत्येकाच्या कानात आज पुन्हा ओरडून सांगतोय...."

केलेस लग्न का तू

केलेस लग्न का तू? - एक "विजल"
.
आयुष्य आज माझे मोडीत काढले मी !
स्वर्गातुनी सुखाच्या पाऊल काढले मी !!

ती बोलते अशी की, मी कोण घोर पापी !
भाळूनिया दिवाळे माझेच काढले मी !!

तो हो तिचा नगीना, माझ्या गळ्यास फाशी !
फासातुनी कितीदा मानेस काढले मी!!

वैतागलो जिवाला, पण कीव येत नाही !
श्वासात वेदनेचे हुंकार काढले मी !!

"जाशी बळेचि तूही का बावळ्या हलाली !"
त्यांनी दिले इशारे, वेड्यात काढले मी !!

"केलेस लग्न का तू? नाही? नको करू रे!"
ती घोडचूक एक" - अनुमान काढले मी !!

हा 'जीत' चीत झाला झेलून रोज हल्ले !
माझ्यातल्या विजेत्यां बाहेर काढले मी !!

उत्तर नसतं प्रत्येक प्रश्नाला

उत्तर नसतं प्रत्येक प्रश्नाला...
हेच आहे का प्रेम
विचार तुझ्याच मना
नातं नाही कोणतच
तरिही का हा आपुलेपणा...

प्रश्न दोघानांही सारखाच
उत्तर दोघानांही हवे..
तुच सांग का ऎकमेकांची
सोबत दोघांनाही भावे..

मी ही विचारत आहे
हेच माझ्या मना
ऎकमेकांनवीना करमत नाही
का असा वेडेपणा?

उत्तर नसतं प्रत्येक प्रश्नाला
हेच असावे खरे
नाही तर मिठीत येऊनही तुझा
प्रश्न पुन्हा हाच का बरे ?????

--


मुलीच्या मनात

प्रत्येक मुलीच्या मनात
एक सुंदर स्वप्न असत
चांगला जोडीदार मिळावा
अस मागण असत

विचारून तर बघा तिला
तुझ मन काय म्हणत?
ओठांवरच्या शब्दांनीच सारी
अपेक्षा व्यक्त करत मुलीच मन ते
सैरावैरा धावत असत
कधी खेड तर कधी शहर
गाठत असत
कुणाला सुंदर ,कुणाला शिक्षित



कुणाला गोरी, कुणाला उंच
प्रत्येकाच मुलीविषयीच
वेगळच  मागण असत
तडजोडीची वेळ आली ,
की मुलिलाच पुढे सरकाव लागत
नविन कुटुंबात प्रवेश करतांना
नात्यांच भान ठेवाव लागत



समाज वेगवेगळ्या
प्रथा काढतच असत
ते पूर्ण करता करता
मात्र बापाच्या जिवाच रान होत
२२ वर्ष जपलेल धन हे
शेवटी परकयाला द्याव लागत
जिवापाड जपलेल्या तुकड्याला
स्वत:पासून तोडाव लागत 
येणारे लोक येउन जातात



खाणारे पिणारे मजा करून जातात
उरतात ते मुलीचे आई-बाप
जी दुसर्यांची ओझी वाहत असतात
कधी वाटत मुलगी होण पाप का?


आई-बापाला ही सजा का?
या रुढी परंपरा आशा कश्या?
मुलींच्या घरच्यांनीच पाळायच्या कश्या?

तुझं माझं नातच आभासांचं

कधी खूप खूप खोल वाटणारं,
थेट जाउन हृदयाला भिडणारं,
काळजाला हात घालणारं,
पण कधी क्षणात उथळ होणारं,
अनोळखी वाटणारं !

मग खरं काय असतं ?
ते खूप खोलवर घाव घालणारं,
हृदयाला साद घालणारं ?
का पाण्याची वाफ व्हावी
त्याप्रमाणे क्षणात उडून जाणारं ?

शेवटी आभासच सारे !
त्यात खरं काय आणि खोटं काय !

तुझं माझं नातच आभासांचं

शब्दांशिवायच भावना बोलणारं,
मुकेपणानेच एकमेकांना साद घालणारं,
हुरहुर लावणारं, धुंदी आणणारं,

पण कधी कधी हे मुकेपणसुद्धा बोलेनासं होतं
निशब्दता पण अनोळखी होते.

मग खरं काय असतं ?
ते मुकेपणातून प्रेम बरसणं ?
की ती अनोळखी निशब्दता ?

शेवटी आभासच सारे !
त्यात खरं काय आणि खोटं काय