तू असतोस सोबतीला, म्हणूनच सख्या ,असं करावंसं वाटत !
आधीच गुंतलेल्या
शब्दांना माझ्या
तुझ्यातच विरून
जावसं वाटतं !
तू असतोस सोबतीला.......
रात्रीचं चांदणं
चंद्राकडे मागून
दिवसाही सख्या
त्यांना उधळावसं वाटतं !
तू असतोस सोबतीला ......
आभाळातून काळ्या
पावसाला चोरून
इंद्रधनुच्या रंगात
न्हावसं वाटतं
तू असतोस सोबतीला ..........
.
नजरेला माझ्या
उडायला सांगून
मनात तुझ्या रे
डोकावंसं वाटतं
तू असतोस सोबतीला ............
.
रात्रीला जागवणाऱ्या
डोळ्यातल्या स्वप्नांना
दिवसाही सख्या
बोलवावसं वाटतंय
तू असतोस सोबतीला, म्हणूनच सख्या, असं करावस वाटतंय !!!!!

रविवार, २३ ऑक्टोबर, २०११
कालच्या रातीला आवं भलतंच हो घडलं,
कालच्या रातीला आवं भलतंच हो घडलं,
कदी नव्ह ते दारात तिचं पाऊल पडलं..!!
लाजत मुरडत ठुमकत आली देखणी नार
नजर ठरना माझी आसं सोळा शिणगार..!!
आभाळातली अप्सराचं जणू परसन्न झाली,
मनातलं वळखून मला खेटून हो बसली..!!
मझ्याकडं बगून अशी हासली कल्लास,
आदीचं खुळा झालो मंग पुरता खल्लास..!!
हाळूचं कानात म्हटली मला "दिलाच्या दिलवरा",
तुमच्यासाटीचं केलाय बगा झ्याक ह्यो नखरा..!!
आवाज आयकून मोरपिसं काय अख्खा मोरचं फिरला,
पुढ्यात बसली ती जिच्यासाठी व्हता जीव झुरला..!!
नाजूक हाताची मिठी तिनं घातली जवा गळ्यात,
पिरतिचं पाखरू तवा धडपडू लागलं जाळ्यात..!!
मुका घ्याया तिचा केला म्या फुटक्या व्हटांचा चंबू,
रापकन हाणला तवाचं माझ्या आयन पेकाटात बांबू..!!
काय सांगू तऱ्हा राव...खरी नाय ती आली व्हती सपनात,
हात पिवळ करण्याचं कंदी यायचं आयसायबांच्या मनात..!!

मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफले टाकली नाही
मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफले टाकली नाही
मी शिक्षा करतील म्हणुनी, ती कधी उचलली नाही
भवताली दंगा चाले, तो शांतपणे बघताना,
कुणी हसता-खिदळताना, कुणी गाणी ही म्हणताना
मी निवांत वाचत बसलो, भूगोलाचे पुस्तक जेव्हा,
मज चिडवायाला देखील, पण कुणी डिवचले नाही
बेशिस्त वर्ग हा आहे, एकाहून वरचढ येथे
येताच परीक्षा जवळी, चोरुनी फाडती पाने
पण खिशात माझ्या कुठली, कॉपी वा चिट्ठी नाही
मी वळून पाहिले नाही, वा पाहू दिले नाही
धुतले न अजून मजला, मी खोडी न केली काही
निकालावर सजून दिसते, बाबांची लांबशी सही
मी मनात नाही भ्यालो, मी कुणास नाही भ्यालो
मी घरात सुद्धा माझ्या, कधी दंगा केला नाही

कधी तरी विचार करतो
चुकलेला तो क्षण
आज हि चुकवतोय
प्रेत्यक कथा .......आसवाच्या
शब्दात मांडतोय
आम्ही तिरडी वर पडाव
लोकांनी चार असाव गाळाव
त्या असावच देन म्हणून
दहा दिवसांनी जेवणाचे बेत आखाव
फासावर लटकलेली पाहुनी
ती शय्या .. नक्कीच तो सुटला असेल
कि सुखाच्या शोधात तो असुनी
दुखाच्या गर्दीत तो विरला असेल
कधी तरी विचार करतो
व्यहारिक जगात मीच मारतो
देणे-घेणे लागू पडते सर्वना
तो मात्र जीव देण्यातच रमतो
अविरत चालण्याचा
प्रयास असा फसला
त्या वाटेवरच्या वळणावर
तिचा माझा हाथ अपुसकच सुटला
आज हि चुकवतोय
प्रेत्यक कथा .......आसवाच्या
शब्दात मांडतोय
आम्ही तिरडी वर पडाव
लोकांनी चार असाव गाळाव
त्या असावच देन म्हणून
दहा दिवसांनी जेवणाचे बेत आखाव
फासावर लटकलेली पाहुनी
ती शय्या .. नक्कीच तो सुटला असेल
कि सुखाच्या शोधात तो असुनी
दुखाच्या गर्दीत तो विरला असेल
कधी तरी विचार करतो
व्यहारिक जगात मीच मारतो
देणे-घेणे लागू पडते सर्वना
तो मात्र जीव देण्यातच रमतो
अविरत चालण्याचा
प्रयास असा फसला
त्या वाटेवरच्या वळणावर
तिचा माझा हाथ अपुसकच सुटला
तुझ्या साठी वाहलेला प्रत्येक थेंब
तुझ्या साठी वाहलेला प्रत्येक थेंब....
मी जपून ठेवलाय मनाच्या गाभाऱ्यात...
हळूच येतो कधीकधी तो पापण्यांवर......
जेव्हा कधी आठवतो तुला एकांतात...
आनंदाचे डोहे फुटताना
अश्रूच्या सरीने वाहून यावे
नियती हा खेळ खेळताना
मी फ़क़्त मनन करावे
मी जपून ठेवलाय मनाच्या गाभाऱ्यात...
हळूच येतो कधीकधी तो पापण्यांवर......
जेव्हा कधी आठवतो तुला एकांतात...
आनंदाचे डोहे फुटताना
अश्रूच्या सरीने वाहून यावे
नियती हा खेळ खेळताना
मी फ़क़्त मनन करावे
चुकली दिशा तरीही
चुकली दिशा तरीही
चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे ;
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे .
मी चालतो अखंड चालायचे म्हणून ;
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे .
डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे ;
हे शीड तोडले की अनुकुल सर्व वारे .
मग्रूर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा ;
विझले तिथेच सारे ते मागचे इशारे .
चुकली दिशा तरीही आकश एक आहे ,
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्या रे .
आशा तशी निराशा , हे श्रेय सावधांचे ;
बेसावधास कैसे डसणार हे निखारे..
चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे ;
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे .
मी चालतो अखंड चालायचे म्हणून ;
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे .
डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे ;
हे शीड तोडले की अनुकुल सर्व वारे .
मग्रूर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा ;
विझले तिथेच सारे ते मागचे इशारे .
चुकली दिशा तरीही आकश एक आहे ,
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्या रे .
आशा तशी निराशा , हे श्रेय सावधांचे ;
बेसावधास कैसे डसणार हे निखारे..
माकड हसले त्याच क्षणाला,
माकड हसले त्याच क्षणाला,
माकड मेले; माणूस झाला,
पर दु:खाने रडला प्राणी
देव प्रकटला त्याच ठिकाणी
माकड मेले; माणूस झाला,
पर दु:खाने रडला प्राणी
देव प्रकटला त्याच ठिकाणी
आयुष्यातील ८ मोल्यवान क्षण....!!
आयुष्यातील ८ मोल्यवान क्षण....!!!!
आयुष्यातील ८ मोल्यवान क्षण....!!!!
१)आपला पहिला पगार आपल्या आई वडिलांना देणे...!!!
२)आपल्या प्रेमाचा विचार डोळ्यात पाणी आणून करने...!!!
३)जुने फोटो बघून आठवणीत रमून हसणे...!!!
४)हसत खेळत आणि भावूक गप्पा मित्रासोबत मारणे...!!!
५)ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीचा हात प्रेमाने हातात घेवून चालणे...!!!!
६)जे आपली मनापासून काळजी करतात त्यांच्या कडून एक प्रेमळ मिठी मिळवणे...!!!
७)आपल्या पहिल्या मुलाच्या अथवा मुलीच्या कपाळावर चुंबन घेणे जेंव्हा त्याचा जन्म होतो...!!!
८)असा क्षण जेंव्हा कोणी तरी आपल्याला मिठीत घेते आणि आपल्याला अश्रू आवरत नाही....!!!!
हे सर्व मोल्यवान क्षण आयुष्यातून कधीच जावू नका देवू....!!!
!नेहमी सांभाळून ठेवा हृदयाच्या कोपऱ्यात कुठे तरी हे क्षण

काही शब्द येतात ओठातून ukhane
मनी असे ते स्वप्नी दिस ओठी मी हे आणू कसे
...माझी नववधू शब्दात मी हे सांगू कसे
निळे पाणी, निळे डोगर, हिरवे हिरवे रान,
.... चे नाव घेउन राखतो सर्वांचा मान
काही शब्द येतात ओठातून
काही येतात गळ्यातून
राणी चं नाव येतं मात्र थेट हृदयातून
भाजित भाजि पालक,
...माझि मालकिन अन् मि मालक !
*खोक्यात खोका टि वी चा खोका,
खोक्यात खोका टि वी चा खोका
.......माझी मांजर मि बोका..*
उमाचा महादेव आणि सितेचा राम
... आलि जीवनी आता आयुषयभर आराम
पुणे तेथे नाही काही उणे,
.... गेले गावाला तर घर होते सुणेसुणे
अंगावरच्या शेलारीला बांधुनी त्यांचा शेला,
....चे नाव घेण्यास आज शुभारंभ केला
मितालि बिल्डींग, तिसरा मजला, घर न - ११, घराला लावलि घंटी,
वर्षा माझी बबली आणि मी तिचा बंटी
पाच बोटातुन होते कलेची निर्मीती,
........ ची व माझी जडली प्रिती

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)