रविवार, ७ ऑगस्ट, २०११

खातेवही प्रेमाची....

खातेवही प्रेमाची....

अजब कारभार आहे या प्रेमाचा
हिशोब करायला दिवस कमी पडतात
यात लाख मोलाचे असतात म्हणे क्षण सारे
एकएक क्षण गमावता आयुष्य भर रडतात

दोन हृदयाचा व्यवहार सरळ सरळ असतो
भावनांचा पैसा डोळे मिटून लावतात
यात भल्या भल्यानचे खाते गहाळ झाले
तरी मुद्दलीचे स्वप्न उघड्या डोळ्यांनी पाहतात

हिर-रांझा लैला-मजनू हे मोठे ठेवीदार होते
आदर्श उसना यांचा घेवून भागीदारी करतात
जमा खर्च जिंदगीचा मिळविता मिळत नाही
नाव डूबित ग्राहकाचे(तिचे)प्रेमाच्या खातेवहीत लिहितात

दिले दान परत घेणे माझ्या स्वभावात नाही

जा दिले मन तुला कार तू त्याचे काहीही
दिले दान परत घेणे माझ्या स्वभावात नाही

तुला द्यावे मन आसे काही कारण नव्हते
एवढेच म्हणू आता तुझ्या नशिबात होते
पडे त्याचा हाती दिवा ज्याला दिसतच नाही
दिले दान परत घेणे माझ्या स्वभावात नाही जा.....................

*काय म्हणालात तुम्ही कधीच प्रेम केलं नाही?

प्रेम केलं नाही?
*काय म्हणालात तुम्ही
कधीच प्रेम केलं नाही?

अहो कशावर प्रेम कराव?
विचारता कोणी प्रेम कराव?
अस का घाबरता राव?
ते म्हणतात प्रेम कुठेही कराव!

कशासाठी प्रेम कराव?
सांगा प्रेमाशिवाय कस जगाव?
मी तर म्हणतो प्रेम केलं नाही ?
फार काही बिघडल नाही!

केल्या नाही चार कविता!
मारल्या नाहीत गुलुगुलु गप्पा?
घेतला नाही तिचा हातात हात
केला नाही धडधडणाऱ्या हृदयाने कधी घात?

प्रेम केल नाही म्हणून काही सुचलं नाही?
अहो लय नाही म्हणून काही लिहीलं नाही!
प्रेम केल नाही म्हणून काही अडल नाही!
आयुष्यात विशेष काही घडल नाही?

आता म्हणाल, वाचुनही काही समजल नाही!
खरच सांगतो प्रेम केलं नाही म्हणून काही बिघडलं नाही
काय म्हणता माझे लेखन आवडल नाही?
आता मान्य कराल का तुम्ही कधीच प्रेम केल नाही?

ती येणार होती, नाही आली......

ती येणार होती, नाही आली......

ती येणार होती, नाही आली......!
पण.............!
तिची आठवण मात्र येऊन गेली...!
शेवटी तिला भेटण्याची इच्छा मनीच राहून गेली...!
तरी पण ......!
भास झाला मनाला ..!
वाटल कि, ती आली...!
पण..............!
दार उघडून पाहतो तर काय....
त्या खट्याळ वारयानेच माझी मस्करी केली.............!
त्या खट्याळ वारयानेच माझी मस्करी केली.............!



--

खुभी नाही माझ्यात एवढी कि...!
कुणाच्या हृदयात ठाण मांडून जाईल..!
पण विसरणे सुद्धा अशक्य होईल..!
असे क्षण जे देऊन जाईल.......!

मला एकदा थेंब व्हायचयं..

मला एकदा थेंब व्हायचयं..
अन पाण्यात मिसळून जायचयं...
पाण्यात एकरूप होऊन..
स्वत:ला पाहायचयं..

मला एकदा थेंब व्हायचयं..
एकदा पावसा सोबत बरसायचयं..
पावसा सोबत बरसून..
श्रुष्टीला फूलवायचयं...

मला एकदा थेंब व्हायचयं..
तुझ्या डोळ्यांतून वाहायचयं..
तुझ्या मनातील दु:खांना..
आपलेसे करुन घ्यायचयं..

मला एकदा थेंब व्हायचयं..
तुझ्या गालावरुन ओरघळायचयं..
तुझ्या ओठावर येऊन मग..
तिथेच विरुन जायचयं..

वाचणार असेल कोणी तर चारोळ्या लिहिण्याला अर्थ आहे

वाचणार असेल कोणी तर
चारोळ्या लिहिण्याला अर्थ आहे
मिळणार नसेल प्रतिसाद
तर इथे लिहण व्यर्थ आहे


खूप अवघड असत ....................

कोणालातरी मनात ठेवण सोप असत
पण कोणाच्यातरी मनात बसन खूप अवघड असत
कोणासाठी जगन खूप सोप असत
पण कोणीतरी आपल्यासाठी जगन खूप अवघड असत

कोणीतरी आवडण सोप असत
पण कोणालातरी आपण मनापासून आवडन खूप अवघात असत
प्रेम तर खूप जणांवर बसत
पण कोणीतरी आपल्यावर प्रेम करण खूप अवघड असत

उजेडात कोणीही चालतो संगती
पण अंधारात कोणीतरी वाट दाखवण खूप अवघड असत .......

कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

बाकी काही नाही
हसता हसता डोळे अलगद भरुनही येतील
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता-जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवती भोवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
स्रुष्टीमध्ये दोनच जीव आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

मोबाईल वाजण्याआधीच तो वाजल्य़ासारखा वाटेल
जुनाच काढून एसएमएस वाचावासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुनं बिबरुनं जाण्यासारखं काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला सांभाळावे थोडे
सांगुन द्याव काळजीसारख बिलकुल काही नाही

"कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......"

चांगले मित्र मिळवायला फार मोठे भाग्य लागतं.

चांगले मित्र मिळवायला फार मोठे भाग्य लागतं.
तसंच भाग्य मला लाभलं असं मला वाटत असतं,
मित्र अनेक असतात, पण काही मोजकेच जीवनात येऊन जातात.
चांगल्या क्षणांची सांगडसुद्धा तेच घालून जातात.
भांडण झालं की थोडा वेळ त्यांच्यावर रुसायचं असतं.
कारण शेवटी त्यांच्यातच जाऊन मिसळायचं असतं.
प्रयत्न केला दूर जायचा तरी त्यांच्याच जवळ रडायचं असतं.
एकमेकांचं अश्रू झेलून, हसत पुढे जायचं असतं.
कोणाशी काही बिनसलं तेव्हाच मैत्रीचं खरं रुप पाहायचं असतं,
संकटकाळी एकमेकांचा हात घट्ट धरुन चालायचं असतं.
एखादं पाऊल डगमगलं तर ते पुन्हा वाटेवर आणायचं असतं.
चिमुकल्या गोष्टीने मैत्रीचे वैरात रुपांतर करायचं नसतं.
पण मैत्रीत हे एकच लक्षात ठेवायचं असतं.
विश्वास ज्याच्यावर टाकला त्याच्याशी प्रामाणिक रहायचं असतं.
ज्याच्याबरोबर हे घडत असतं त्याला फक्त मैत्री आणि मैत्री हेच नाव द्यायचं

दूर वाजते सनई तिला आभाळ पुरेना

अशी दुपारली वेळ, नभी भरलेल्या सरी
जीव घेत घेत माझा कोण उभे माझ्या दारी
किती जपून ठेवले गुज ओठावर आले
साऱ्य़ा सयीचे वऱ्हाड मेघा का रे बोलवले ?

दूर वाजते सनई तिला आभाळ पुरेना
मनातली हुरहुर जशी मनात मावेना
माझ्या मनात मांडव असा सहजी पडेना
आर्त मनाचे मनाचे जगभर सांगवेना

आता तरी दे ना दे ना मनातले आवताण
मनातल्या माणसाला येवो माझ्या देहभान
आता येथोनीच थांब नको मनभर होऊ
माझ्या कोशात मी बरा तिथे हाक नको देऊ

हाकेतुन तरी काय ? स्वर पाण्याचा पाण्याचा
तुझे आकाश पाण्याचे . .. माझा डोळाही पाण्याचा
इथे पाणी तिथे पाणी . .. एवढेच ना करणे
उन्हे पडल्यावरती पुन्हा भाजुन निघणे . . .

आता अंथरून वेळ पुन्हा पाय पसरीन
आणि कोसळता सरी आत आत पाझरीन. . .

अंगात मस्ती, दुसरं काय?

एका झाडावर पाच पक्षी बसलेले असतात.

तिथे एक शिकारी येतो आणि गोळी झाडतो.

एका पक्ष्याला गोळी लागते. तो खाली कोसळतो.
...
गोळीबाराने घाबरून तीन पक्षी उडून जातात.

एक पक्षी मात्र झाडावर तसाच बसून राहतो…

… का ?



अंगात मस्ती, दुसरं काय?

जीवाची दैना,

प्रीत ती क्षणिक तुझी
घेऊन येती सुखाच्या सरी..
नाचती मोरही माझ्या मनी
बहरी सारी प्रीत नगरी..

बधीर संवेदना,
मनस्वी यातना,
जीवाची दैना,
निरर्थक कल्पना,
मात्र..........तरीही
प्रेम केल्याशिवाय राहीना..!!


शेवटची हाक देतो मी तुला
मनापासून ऐक समजेल तुला
कळले नव्हते ते जाणवेल तुला
माझीही ओढ लागेल तुला..!

प्रेमपथावरंच माझ्या तुझंचं पाहिलं पाऊल,

आभासाच्या त्या आभाळाला बघ सये
आठवणींची टाचणी लागली नकळत
साठवले होते जे भेटीचे मोती कधी मी
पापण्यांच्या शिंपल्यातून आले ओघळत

तिने मनावर केलेली सये
जखम खूप खोल होती ,
पण सहवासाच्या क्षणाची
तिनेच दिलेली ओलं होती

प्रेमपथावरंच माझ्या तुझंचं पाहिलं पाऊल,
तहानलेली धरती मी तुझ्या वर्षावाची चाहूल,
तग धरुदेत प्रेमांकुर कर मायेने त्याचं रक्षण,
चांदव्याची वात......करीलं उभं आभाळ हे औक्षण..!!

शब्द हि मुके झाले
भावना हि बोथड झाल्या ..!
लागले इतके चटके कि,
संवेदना हि सुन्न झाल्या..!!