सोमवार, ८ ऑगस्ट, २०११

जय हिंद चा नारा ऐकताच.. अंगात रक्त सळसळते ..

तुला भेटायला येताना..
मुद्दाम उशिरा येतो..
तेव्हाच तर तुझ्या नाकावरचा..
खोटा राग मनभरुन पाहत येतो..


जय हिंद चा नारा ऐकताच..
अंगात रक्त सळसळते ..
जरी असलो अलग धर्माचे..
तरी बांधव आम्ही या भारताचे..


नसानसात घुमतेय..
देश प्रेमाची ज्वाला...
पण आई बोलते, चल झोप..
आता उशिर खुप झाला.


अळवावरच्या पानावर..
पावसाचा एक थेंब साठला..
दवबिंदू या नावाने..
त्याने नवा उच्चांक गाठला..

पौर्णिमेचा चंद्र एकदा.. उशिराने उगवला..

च्नद्राला हि जाणीव आहे त्या
चांदण्यांच्या अस्तित्वाची
म्हणूनच तर तो बिनधास्त असतो
जेव्हा रात्र असते अमावसेची

आज ही चांदनी..
अशी का लाजत आहे..
कि चंद्राच्या प्रेमात..
ति त्याच्या साठी सजत आहे..

वो कहते है की हम बेवफ़ा है..

वो कहते है की हम बेवफ़ा है..

असुदे

आई ने सांगितलेले आहे..

जो म्हणतो तोच असतो..


पौर्णिमेचा चंद्र एकदा..
उशिराने उगवला..
आकाशात ही म्हणे..
ट्राफीक मध्ये फसलेला..

सरींचा शालू नेसवशील का भरजारी?

येतील का दिवस पुन्हा..
जेव्हा होतीस तू आस पास..
कि नशीब पुन्हा दाखवेल..
"मृगजळा" परी भास..

सुखाला आधी लाथ मारा त्वरेने...
उठ मार्ग चला काढा निश्चयाने...
जागी गांडूळा सारखे न जगावे...
उरी बाजी तानाजीला स्मरावे ...



पाऊस बनून मला सख्या
भिजवशील ना रे कधीतरी
लपेटून त्या वार्याला हि सोबत
सरींचा शालू नेसवशील का भरजारी?

मी मी म्हण'नार्यांना लोलावणारी,
महाराष्ट्राची माती आहे..!
खंजीर हि घुसणार नाही अशी,
मराठ्यांची छाती आहे..!

रंगलेल्या मेहंदीने सख्या ,मला एक प्रश्न केला

जगात जर खरंच प्रेम नसतं
तर अख्खं जग मैत्रिमय असतं,
पण प्रेमाने तोंड पोळल्यावर मात्र
मन मैत्रीच्याचं शीतोष्ण धारेत रमत..!!


भरजरीचा शालीन काठपदर डोई
अखिल महाराष्ट्राची राजमाता जिजाऊ,
बाणेदारपणा ओतला रक्तात तिन्ही पिढ्यांच्या
मनी स्त्रीत्व बनलं तीनही नरवीरांची आऊ..!!



उशीने माझ्याकडे सख्या , तक्रार केलीय

तुझ्यामुळे म्हणे ,मी तिला विसरलीय

खरचं रे पण,तुझ्या हातांची जेंव्हापासून उशी मिळालीय

माझ्या डोळ्यांनी बघ झोपच विसरलीय !!!


ढोर मन माझं कुठल्याही भरातल्या पिकावर बसतं
सारासार विचार नाही त्याला सौंदर्याला भाळत ते बावळ,
आवरलं कितीदा हुसकलं बऱ्याचदा ह्या मोकाट ढोराला
वेसण असूनही संस्कारांची अर्ध्या हळकुंडाने ते पिवळ..!!

रंगलेल्या मेहंदीने सख्या ,मला एक प्रश्न केला

माझा रंग आवडतो कि ,तुझ्या प्रेमाचा तुला?

मी म्हंटल सखे,अग,ठावूक नाही का तुला?

त्याच्या आणि माझ्या प्रेमाचा तर ...रंग मिळालाय तुला !!!!!!!!!!!

साधारण समाजामध्ये
रात्र वैऱ्याची असते,
पण प्रेमात पडल्यावर मात्र
तिच्याचं आठवणींची असते..!!

ती कशीही असली तरी मला ती आवडते,

ती कशीही असली तरी मला ती आवडते,
कितीही मस्करी केली तरी सगळं काही विसरायला लावते,
तिच्या सहवासात राहावे सतत मला वाटते,
ती निघून गेली कि एक विषण्णता मनामध्ये दाटते,
असे जरी असले तरी तिला सांगायचे राहूनच जाते,
तिच्यावरचे प्रेम माझे मौन बाळगून तिच्या आठवणीत झुरत राहते,
कवी जरी मी असलो स्वैरछंदी,
तिला काव्यात उतरवणे मला कठीणच होऊन बसते....(स्वःरचित)

.ती म्हटली - ’ते आलेच ओघाओघाने...’

.ती म्हटली - ’ते आलेच ओघाओघाने...’
मी म्हटले - "तू कधी येणार ?-
- ओघाओघाने जाऊ दे
निदान एखादी बारीकशी धार ?"

...ती म्हटली - ’तुला काय ? आता खुश्शाल
झोपशील...’
मी म्हटले - " आमेन ! -
- अजून बरीच रात्र आहे शिलकीत...
मेणासारखा चटके खात
मेणबत्तीभोवतीच जमेन !!"

...ती म्हटली - ’कळतच नाही काय बोलतोस...
मी जातेच कशी !’
मी म्हटले - "ते आलेच ओघाओघाने...
आता रात्रीच्या मिठीत मी
आणि माझ्या मिठीत उशी !!".......

राधे, रंग तुझा गोरा सांग कशाने रापला?

राधे, रंग तुझा गोरा सांग कशाने रापला?
सावळ्याच्या मिठीमध्ये रंग सावळा लागला ?

राधे, कुंतल रेशमी..सैरभैर गं कशाने?
उधळले माधवानेकिंवा नुसत्या वारयाने?

राधे, नुरले कशाने तुज वस्त्रांचेही भान?
निळा प्रणय अथवा एका बेभानाचे ध्यान?

राधे, कासाविशी अशी.. तरी 'वेडी' कशी म्हणू ?
तुझ्या रुपाने पाहिली एक वेडीपिशी वेणू !

राधे, दृष्टीतून का ग घन सावळा थिजला?
इथे तुझ्या डोळा पाणी...तिथे मुरारी भिजला !!

डोळा पाणी.. जिणे उन्ह..इंद्रधनुचा सोहळा
पुसटले साती रंग...एक " श्रीरंग " उरला !!

"खरे प्रेम" अन "पैसा" या दोन पक्षात_

प्रत्येक हसणारया चेहरा..
विदुषकाचा असतो..
जो मनात दु:खांचा डोंगर रचून..
दुसरयांना हसवत असतो



तुझ्या माझ्या मैत्रीत..
हिच गोष्ट खास आहे..
तु रुसलीस कि मि तुला मनवावे..
मी रुसल्यावर मात्र तू अजुन चिडवावे..

"खरे प्रेम" अन "पैसा" या दोन पक्षात_

जोरदार निवडणुक लढवण्यात आली_

"पैसा" आला बिनविरोध निवडुन तर_

"खरे प्रेम" याची डिपाँझीटही जप्त झाली

" मैत्री दिनाच्या लाख-लाख शुभेच्छा "

तुमच्या-माझ्या मैत्रीचे अतूट असे नाते आहे ...
तुमचे माझ्याकडे आणि माझे तुमच्याकडे,
प्रेम आणि विश्वासाचे खाते आहे ..!
" मैत्री दिनाच्या लाख-लाख शुभेच्छा "

तुझ्या भावनांची किंमत शब्दामध्ये करू शकत नाही !

तुझ्या भावनांची किंमत शब्दामध्ये करू शकत नाही !
तुझ्या मैत्रीचे ऋण कधीच फेडू शकत नाही !!

तरी पण मी आज मैत्रीचे ऋण फेडायचे ठरवले !
मांडीवर डोके ठेऊन तुझ्या खूप रडायचे ठरवले !

आभाळ माझ्या भावनांच मनात खूप दाटलंय !
डोळ्यातलं पाणी माझ्या डोळ्यातच आटलय !

म्हणून म्हणतो आज मला मनभरून रडू दे !
फ्रेंडशिप डेच्या दिवशी तरी मैत्रीचे ऋण तरी फेडू दे !!

आयुष्यात स्वतःची एक,मैत्रीण असावी.

आयुष्यात स्वतःची एक,मैत्रीण असावी.
कुठलाही शिष्ठ पणा न करता,दिल खुलास असावी,
पळस पानी थेम्बा सारखी,ती नितळ असावी;
जी कायम अबोध बालका सारखी,हसत असावी,
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.
...
जिच्या सोबत संध्याकाळ,एक "स्पेशल" असावी,
पण ती स्वतःकायम,"सोशल"असावी;
मैत्री नात्यात "नथिंग ओफ़िशिअल "असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

जिची चाहूल एक, ऋतू पालवी सारखी असावी,
जिची सोबत श्रावण-सरी,ओली असावी,
जिच्या केस घसरणीत,पानगळ असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

जिच्या नाती,सर्व धागी अतूट असावी,
जिची हास्य खळखळ,बेछूट असावी;
जिची मन भावना,रेशीम कोमल असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

जिच्या वागण्यात,दाणगट पोट्टे-शाही असावी,
कायम माझ्या करिता,शिवी-गाळ असावी;
दोघां मध्ये एक,आगळीच फिल्मी-यारी असावी,
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

जिने माझी तोंडची सिगारेट,ओढून फुन्कावी,
कधी तोंडी पान-विड्याची,पिचकारी थुन्कावी,
हि सगळी हिम्मत,फक्त माझ्या पुरतीच असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

जी माझ्या संगतीस,कायम वेडी असावी,
जिला माझ्या क्षणांची,आतुर गोडी असावी;
माझ्या जोक्स ला कायम,पुरुषी हसावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

कायम जिने माझी कॉलर,धरूनच असावी,
माझे पसरले केस,ओढूनच असावी;
कधी लाडावून माझी,गळ-मानगूट फासावी,
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

कधी माझ्या न बोलण्याने,विव्हळ असावी,
माझ्या नजरीत ईशार्याला,चपळ असावी;
कुठेतरी या नात्या बद्दल,खूप हळवी असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

कुठे असेल ती,जरा लवकर गवसावी,
तिची प्रफुल्लीत बहर,लवकर बरसावी;
माझ्या शुभ्र आयुष्याला,तिचीच रंगत असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

मैत्री ला एक वृक्ष म्हणू ...मित्र सारे त्यावरली पाने फुले जणू

मैत्री ला एक वृक्ष म्हणू ...मित्र सारे त्यावरली पाने फुले जणू
फांद्यांचा आधार घेऊ ......उंच वाढू मैत्रीची उंची पाहू

एक फुल तू बन एक पान मी
एक फांदी हाताची एक फांदी सहवासाची
घट्ट रोऊ पाळे मुळे या धर्तीत
मित्र बनवू तिलाही , नसेल भीती उखळून पडण्याची

भूक लागली तर उन खाऊ
वादळाला येवू दे सोबतीला आपण नको भिऊ
मैत्रीचे बळ बघ सारे मिळून अजमाऊ
संकटे येतीलही बहु संकटाना तोंड देऊ

घरटी बांधतील पक्षी अनेक
घरटा त्यात आपल मैत्रीच एक
निवास त्यांचा चिलबिलाट सारा
सर्वांनी मिळून सांभाळू हा मैत्रीचा पसारा

हिरवी पालवी मैत्रीची ,फुलोर हा मित्रांचा
बहरून जायील वृक्ष हे इथे खेळ भावनाचा
गंध पसरू चारी दिशांनी ,
बंध एक निराळ्या भाषांनी

पाहतील वाटसरू मैत्रीचे हे वृक्ष डोळे भरुनी
सांगतील किसे कधी ..तर लहान मुलांना अपुली मैत्रीची कहाणी
अशीच फुलुदे .अशीच वाढू दे निरंतर बांधून मैत्री राहील
बुंधा मजबूत आहे विश्वासाचा हे वृक्ष असेच वाढत राहील

मैत्री दिनाच्या मन:पुर्वक शुभेच्छा !

मैत्री करू नका
दोन दिवस टिकणार्‍या
friendship band सारखी

मैत्री करू नका
उद्या पुसल्या जाणार्‍या
हातांवरील नावांसारखी

मैत्री करा प्रत्येकाला
तुमचा हेवा वाटेल अशी
मैत्री करा एकमेकांना
त्यांच्या सुख-दु:खांत साथ देईल अशी

मैत्री हे प्रेमापलिकडचे
एक अतूट जीवाभावाचे नाते आहे
ते जपतना इतरांना दुखावू नका
जगा आणि जगू द्या :) .....

मैत्री दिनाच्या मन:पुर्वक शुभेच्छा !

रडण्याचं नातं वात्सल्याशी जोडण्याऎवजी,


रडण्याचं नातं वात्सल्याशी जोडण्याऎवजी,
माणसं ते नातं दुर्बलतेशी जोडतात..
ती माणसं पाणी ओघळू देत नाहीत...


निरनिराळ्या लोकांच्या दृष्टीकोनातून आपण..
जर स्वत:ला पाहू शकलो तर..
आपल्याला खुप नवे मित्र आपल्यातच मिळतील..

रडण्याचं नातं वात्सल्याशी जोडण्याऎवजी,


रडण्याचं नातं वात्सल्याशी जोडण्याऎवजी,
माणसं ते नातं दुर्बलतेशी जोडतात..
ती माणसं पाणी ओघळू देत नाहीत...


निरनिराळ्या लोकांच्या दृष्टीकोनातून आपण..
जर स्वत:ला पाहू शकलो तर..
आपल्याला खुप नवे मित्र आपल्यातच मिळतील..

आणी हे माझ्या त्या मैत्रीनी साठी..

आणी हे माझ्या त्या मैत्रीनी साठी...
जिने मला.. सावरले..

तूझ्या शी कधी कशी..
गट्टी जमली कळलेच नाही..
माझ्या मनातील मैत्रीची जागा..
कधी भरली कळलेच नाही..
माझ्या प्रत्येक दु:खावर..
तुझ्या मैत्रीने घातलीस फूंकर..
मी आता मात्र मी कसे फेडू तुझे उपकार..

माझ्या एका मैत्रीनी साठी... जिने मला जीवन काय आहे हे शिकवले..



खरच एक मैत्रिण असावी..
मी हसलो हि ती पण हसावी..
माझ्या डोळ्यातले अश्रु..
तिच्या डोळ्यातून वाहावे..
माझ्या मित्रांची गणती होताच..
तिनेही सामोरे यावे..

क्षणभगुर सुखामागे धावू पाहतय

का हे श्वासांच हळव नात जुळू पाहतय?
मन या वेड्या भासातच
हरवून जाऊ पाहतय,
मृगजळमागेच का
बेभानपणे धावू पाहतय?
का हे श्वासांच हळव नात जुळू पाहतय?

क्षणभगुर सुखामागे धावू पाहतय
माझ्या एकटेपणाला, तुझ्या एकटेपणात
विरघळून जावस वाटतय
का हे श्वासांच हळव नात जुळू पाहतय?

दोनच पावल तुझ्यासोबत
चालावस वाटतय
आयुष्यभरासाठी या आठवणींना
मनात साठवून ठेवावस वाटतय
का हे श्वासांच हळव नात जुळू पाहतय?

कातरवेळी हे मन
अस्वस्थ का होतय?
गर्दीतही मला
एकट-एकट वाटतय?
का हे श्वासांच हळव नात जुळू पाहतय?

बंद पापण्या मागेही
का मला छळतस?
हा फक्त एक जीवघेणा भासच आहे
हेही मनाला जाणवतय
तरीही___
का हे श्वासांच हळव नात जुळू पाहतय...?...का...?

अंगात लालभडक डगला

अंगात लालभडक डगला
अन डोक्यावर काळी क्याप घालून
चोकातल्या कोपरयावर ती उभी असते
वाट पहात .......आनोळखी चेहर्यांची ........
प्रत्येकांच्या हाताकडे......खिशाकडे तिची सराईत नजर
ती बांधील नसते कुणाशी ......
काही क्षणांची तिची निष्ठां.......पण प्रमाणिक
स्वताहपुरती......
तिच्या पोटात साठलेल्या
अनेकांच्या भावना.......इछा...वासना....
सकाळी १० वाजता एकदा
अन सायंकाळी ५ वाजता एकदा
तिची डिलीवरी ........................
अन लगेच पुन्हा सुरु
तिचे सम्पर्क आभियान .................
ती उपाशी राहू शकत नाही
म्हणून तर ती
उभी असते चोकातल्या कोपरयावर
वाट पहात .........कुणीही चालते तिला
आगदी कुणीही i

कृपया सांगा कोण आहे ती??????????????

कसे सांगू तुला की काय वाटले मला

कसे सांगू तुला
की काय वाटले मला
तू डियर म्हटल्यावर .........

शक्य असते तर
टिपले असते भाव
तुझ्या डोळ्यात दाटलेले
मला डियर म्हणताना ............

शक्य असते तर
पाहीले असतेस तुही
माझ्या मनात उठलेले वादळ
तुला डियर म्हणताना ............

सकाळी चहात साखर टाकायला विसरले
मॉर्निंगवॉक चा रस्ता चुकले
दाराच्या चोकटिला टक्कर घेतली
इस्री चा चटका बसला
चौकात सिग्नल तोडला

क्लासमध्येही मन नव्हते थाऱ्यावर
सर म्हणाले,काय आज मूड नाही ?
कुणी सांगावे त्यांना
काय होते माणसाला
कुणी डियर म्हटल्यावर

जेवतानाही भिरभिरत होते मन
आई म्हणाली , हें काय आवलक्षण
कुणी सांगावे तिला
काय झाले मला
तू डियर म्हटल्यावर

कसे सांगू तुला
काय झाले मला
तू डियर म्हटल्यावर ..............

मनातलं असं काहीतरी...२०

मनातलं असं काहीतरी...२०
जेव्हा कधीतरी तसबीर तिची सामोरी येई....
आठवणींचे कोलाज अलगद हाक देई...
अंतरीचा किनारा तो अश्रूंना आपलासा होई..
स्पंदने स्वतःस वेगाने वेढून नेई...
उगाचच मग हुंदाकायाचे,
काळोखाने आपले पंख पसरावे,
केविलवाणे आपण अन आपेल प्रेम,
दोघेच प्रवासी, बाकी सारे मौन....
प्रेमाचे तरी काय चुकते?
ते नकळत आपल्याला उमगते,
शोक करुनी काय जगावे,
जगणे ते काय मरणाहुनी बत्तर...
प्रत्येक शब्द तिचा, श्वास तिचा,
कुपीतल्या अत्तराचा गंध जसा,
ये न पुन्हा...सांगावे परी तिला काय त्याचे,
तसबीर तिची अजूनच धूसर होत जाई...
तसबीर तिची अजूनच धूसर होत जाई

करितो कवित्व म्हणाल

करितो कवित्व म्हणाल हे कोणी
नव्हे माझी वाणी पदरची
माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार
मज विश्वम्बर बोलावितो

या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मोर नाचतोय पहा

या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मोर नाचतोय पहा
श्रावणातला हिरवा शालू काय दिसतोय आहा

साहियाद्रीने पांघरली आहे हिरवीगार शाल
धबधब्यांची सोनेरी नक्षी नागमोडी चाल

थेंब थेंब दावांचा टिपण्या पाने आसुसलेली
तांबडे फुटताच किरणांनी पहा कशी टिपली

धन्य झालो देवा तुझे पाहुनी ऐसे रूप
मातृभूमीचा चरणामधले इथेच कळते सुख

'तो' आणि 'ती' लग्नानंतरही तेच असतात,

लग्नाआधीचे 'तो' आणि 'ती' लग्नानंतरही तेच असतात, पण लग्नानंतर त्यांच्यातला संवाद बदलतो... कसा?... असा...

लग्नापूवीर्...

तो : हुश्श! किती वाट पाहात होतो मी या क्षणाची.

ती : मी जाऊ का निघून?

तो : छे गं! तसा विचारसुद्धा मनात आणू नकोस.

ती : तुझं प्रेम आहे माझ्यावर?

तो : अर्थातच!

ती : तू कधी माझी फसवणूक तर नाहीस ना केलेली?

तो : नो, नेव्हर! असा विचार तरी तुझ्या मनात कसा येतो?

ती : तू माझं चुंबन घेशील?

तो : हो तर.

ती : तू मला मारहाण करशील?

तो : अजिबात नाही. मी त्या प्रकारचा पुरुष नाही.

ती : मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकते का?

तो : हो.

लग्नानंतर...

लग्नानंतर काय होते हे जाणून घेण्यासाठी नवा संवाद लिहिण्याची गरज नाही... फक्त हाच संवाद खालून वर वाचत जा!

प्रेमात सर्व पडतातच का..?

पडल्यावर दुखापत होते हे माहीत असतानाही
प्रेमात सर्व पडतातच का..?
उठत का नाहीत..?

बागेत फुल उमलले नव्याने

कोंडलेल्या भावनांना वाचा कधी लाभेलं,
भारलेल्या आर्ततेला नाद कधी लाभेलं,
मनस्वी शापित ह्या काळाच्या गुलामाला
मुक्ततेचा मरगळलेला श्वास कधी लाभेलं..!!

मैत्री म्हणजे..
डबक्यातला चिखल..
बाहेरुन साधी असली तरी..
मनातून असते निखळ...

बागेत फुल उमलले नव्याने
गंधास दरवळन्या मिळाले बहाणे
नाजूक रूप ते असे डोलता तिथे
पहा फुलाला छेडले फुलपाखराने