गुरुवार, १४ जुलै, २०११

कधी कोनावर प्रेम केले असेल तर वाचुन बघाच

कधी कोनावर प्रेम केले असेल तर वाचुन बघाच

कधी कोनावर प्रेम केले असेल तर वाचुन बघाच......


"Half the truth is often the whole lie"


तुझ्या रुपात मन कैद माझे झाले.
तो कविता वाचत होता.
"गप रे" ति वैतगली होति.
जरा सिरीयस बन. २ वर्षे झालीत..
बाबा मागे लागलेत लग्नासाठी..

माझा हो कळव.. तो हसत म्हणाला..
अन काय कळवणार? तुला ना नोकरी,
ना काहि व्यवसाय. अरे लग्न म्हणजे गंमत नाहि.
अग गंमतच आहे. लग्न म्हणजे सहजिवन, प्रेम,
एकमेकात आडकण.लग्न म्हणजे संलग्न.

वेडा आहेस. अरे लग्न म्हणजे संसार,
म्हणजे घर, दुध, किराणा, मुल,लग्न म्हणजे पैसा..ति म्हणाली
हातात हात तुझा, अन तुझी साथ. पैसा येइल. येतो. तो म्हणाला
पैसा म्हणजे परसातल प्राजक्ताच झाड नाहि.
हालवल कि फुलांनी आंगण भरुन जात..तिन फटकारल..

अग पण, तो बोलायच्या आतच ति म्हणाली..
पैसा कि प्रेम हा वाद विवाद कालबाह्य आहे..
प्रेमाच्या जागी प्रेम आहे, अन पैसा त्याच्या जागि.
तु मल खुप आवडतोस.. पण तु मला विचार करुन निर्णय दे.
तिन अल्टिमेटम दिला..

1४ फेब्रुवारी चा दिवस होता आज खिशात पैसे होते.
दिवस तिच्या बरोबर मजेत घालवायचा होता.
त्यान तिला फोन केला.बर झाल, फोन केलास,
मला पण तुझ्याशी बोलायच आहे.ति म्हणाली.
नो प्रोब्लेम.. ताज मधे भेटु. काय?.. ति उडालीच.

ताज च्या थंडगार वातावरणात, ति सुखावलि होति.
मग काय ठरल?.तिन विषयाला हात घातला.
तो बोलतच नव्हता. मी थांबु शकत नाहि.
हि आपली शेवटची भेट.. तिच्या बोलण्याला धार होति..

तो आतुन तुटत चालला होता..प्लिज..
अरे प्लिज काय? सारच कठीण आहे.ति म्हणाली.
मी निघते? ..प्लीज थांब, मला एक संधी दे..तो म्हणाला.
तु फक्त एक वर्ष दे मला, तुल पाहिजे तेवढा पैसा देतो...तो म्हणाला.

ति खळखळुन हसली." वेडा रे"अरे पैसा म्हणजे?...
आय नो. त्यान वाक्य तोडल."किति पैसे लागतात संसाराला?
लाखो रुपये ति म्हणाली..ठीक आहे. एक डिल.तो म्हणाला.
आपण पुढच्या 1४ फेब्रुवारीला आपण इथच, ताज मधे,संध्याकाळी. ७ ला भेटु.
अन काय करु..तिन विचारल..
मी त्या दिवशी तुझ्या पायावर ७५ लाख रुपये ओतिल...तुला संसारा साठी.

त्या चित्रपटांत हिरो हिरॉइन ला नोटांनी अंघोळ घालतो तशी.अंघोळ घालीन...
तो हसत म्हणाला."मॅड आहेस." पण म्हणुनच तु मला आवडतो.ति..
पण वचन दे, वाट पहाशील म्हणुन.. तो म्हणाला.
ठिक आहे, पण ७५ रुपये तरी आणशील अस वाटत नाहि. ति हासली. .....
continue.....


ठिक आहे, पण ७५ रुपये तरी आणशील अस वाटत नाहि. ति हासली.

1४ फेब्रुवारी तो तिचि ६ वाज ल्या पासुनच वाट पहात होता.
तेच टेबल होत, मागच्या वर्षीच, ति ये‌इल? तो अस्वस्थ होता
७ वाजायला आले होते, अन तेवढ्यात ति आत येताना दिसली.
तिच्याशी नजरानजर होतच त्यान हात हलवला.
हाश हूश करत ति समोरच्या खुर्चीवर बसली.

कशी आहेस? फार गरम होत आहे. पहिल पाणी पिते.
म्हणत उठुन ति त्याच्या समोरच्या ग्लास घ्यायल वाकली.
ति वाकली असताना, त्याला ब्ला‌उज मधे लपवलेल्या मंगळसुत्रचा पदर दिसला.
अग मी मागवतो म्हणेपर्यंत तिन ग्लास तोंन्डाला लावला होता.

अरे फार पाणी पाणी झाल होत.. हं आता बोल.
काय बोलु? तुच सांग. तिच्याकड बघत तो म्हणाला.
मग काय? कुठे आहे ७५ लाख? ति हसत म्हणाली..
त्याचा चेहेरा पड्ला होता., नाहि जमल, तु म्हणालीच तेच खर.
७५ लाख काय ७५ रु जमले नाहि. पैसा मिळवण कठिण आहे..

जा‌उ देत, मला माहित होत, ति समजावणीच्या स्वरांत म्हणाली.
मला पण तसच वाटत होते. पण म्ह्टल तुला शब्द दिला होता...
तो बघत होता..अजुन काय? पडलेल्या चेहे~यानि तो म्हणाला.
सांगु ति म्हणालि.. अरे माझ लग्न झाल, घरचे मागे लगलेच होते.
तो बॅन्केत आहे, १ बेडरुमच घर आहे... तुझ अस.. ति म्हणाली. सॉरी..

तुझ खर आहे., तु ठीकच केल, माझ्याबरोबर.... वायाच गेल असत.
तो म्हणाला.. ठीक आहे. मी निघते, तुला आता अस भेटण बर नाहि
. निघते.. ति म्हणाली.. तो तिच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता..

तो बराच वेळ बसुन होता. सार संपल होत.
रुम च्या नोकरानि टॅक्सीत सामान भरल..
सर कुठे? टॅक्सी ड्रायव्हर ने विचारले.
सहारा एयर पोर्ट. ईंटर नॅशनल टर्मीनल.


टॅक्सी वेगात चालली होति,
गार हवेच्या सपक्यान डोक शांत होत होत.
विमान तळावर टॅक्सी थांबली,
त्यान ट्रॉलीत लगेज भरल.व भाड देवुन तो निघाला,

सर,टॅक्सी ड्रायव्हर ने हाक मारली,
सर, तुमची बॅग राहिली आहे,
त्यान टॅक्सी ड्रायव्हर कड बघितल, अन म्हणाला
बॅग तुला राहु देत, त्यात ७५ लाख रुपये आहेत.
नाहितरी, मला आता त्याचा काहिच उपयोग नाहि,
ड्रायव्हर बराच वेळ त्याच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता

कडु गोड आठवणीत तुझ्या साठव मला
मैत्रीचा हात हवा असल्यास आठव मला
माझ्या वाटेचा आनंद तुझ्याकडे ठेव
तुझ्याकडे काही दु:ख असतील तर पाठव मला.....
आधी विचार करा, मग कृती करा!!!

आकर्षण

आकर्षण

एक युवक अन एक युवती
दोघांची एकदा भेट झाली
एकमेकांच्या तरूण सौंदर्याला भाळली
तिच्या नाजूकपणाची त्याला छाप पडली
त्याच्या धाडसीपणाला ती मोहरली
प्रेम समजून आकर्षणात गुंतली
संसाराच्या स्वप्नात रंगू लागली
विवाहाच्या पिंजर्यात अडकली
एक दोन वर्ष मौजमजेत गेली
तो बाबा अन ती आईही झाली
जबाबदार्यांची ओझी पडली
विचार्-मतामध्ये चिर पडू लागली
अवगुणांची आता छाप पडू लागली
कर्तव्याची उणीव भासू लागली
"
माझेच खरे" ह्या शब्दाने उचल खाल्ली
एकमेकांची सोबत नकोशी झाली
घटस्पोटाची नोटीस दारात आली
त्याची तलवार बाळावर पडली
भितीची आसवे गालावर ओघळू लागली
माझे आई बाबा ही जाणिव त्यालाच राहीली
बाबा की आई आवडीची, निवड कोर्टाकडे गेली
आईची कुशी अन बाबांच्या खिश्याची निवड झाली
आई बाबांच्या प्रेमापासुन त्याची वाताहत झाली
आकर्षणाची जागा बाळाच्या कुपोषणाने घेतली

प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही

प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही

प्रेम म्हणजे काय,
हे कधी कुणाला कळलेच नाही
छोटे से कोड ते,
पण कधी कुणाला उलगडलच नाही...

का जीव होतो वेडा पिसा,
 जेव्हा येते तिची आठवण
हृदयात केलेली असते तिच्या,
 छोट्या छोट्या गोष्टींची साठवण...

मनाला तिच्या शिवाय
काही दुसरे सुचत नाही
पण तिच्या शिवाय दुसरा कुठला विचार करावा
असेही कधी वाटत नाही...

रात्री छानच असतात ...
तिच्या स्वप्नानी भरलेल्या
देऊन जातात उभारी ...
मनातल्या त्या प्रेमाच्या अंकुराला...

प्रेम कधी सफल होते तर कधी
होत नाही...
ते जीवनात कधीही सब कूछ नसत
पण तरीही हृदयाच्या  एका कोपर्‍यात
ते नेहमीच जपायाच असत...

प्रेमाचे हे कोड कदाचित
कधीच कुणाला उलगडणार नाही,
पण त्या साठी हे जग
प्रेम करायचे कधीहि थांबणार नाही...
प्रेम करायचे कधीहि थांबणार नाही...

ती समोरून आली तरीही शब्दाना बांध फुटत नाहि

ती समोरून आली तरीही शब्दाना बांध फुटत नाहि ,
विचारीन विचारीन म्हणतोय, पण धाडस होत नाहि ...

वर्षे लोटली तरी फ़क्त तिच्यावरच मरतोय ,
शप्पथ सांगतो फ़क्त तिचाच विचार करतोय ...
वही मागण्याशिवाय कधी बोललो नाहि ,
विचारीन विचारीन म्हणतोय, पण धाडस होत नाहि ...


माहित नाहि , ती मरते का नाहि माझ्यावर?
का तीच ह्रदय आहे ,फ़क्त एक "सजीव कलेवर" ?
चांदण्यात फिरण्याचा आनंद आम्हालाही मिळणार की नाहि ?
विचारीन विचारीन म्हणतोय, पण धाडस होत नाहि ...



Valentine Day ला बूके घ्यायला जातोय ,
खिशाचा विचार करून फुलावरच भागवतोय ,
या "गरिबाच प्रेम" ती स्वीकारणार की नाहि ?
विचारीन विचारीन म्हणतोय, पण धाडस होत नाहि ...



तिच्यासाठी घेतलेल फुल वहितच कोमेजतय ,
माझ काळीज मात्र तिचीच आस धरतय ...
कितीही ठरवून गेलो तरी , ह्रदय मात्र बोलत नाहि ,
विचारीन विचारीन म्हणतोय, पण धाडस होत नाहि ...


 वाटतय , तिच्याही वहित असेल एखाद फुल माझ्यासाठी ,
का आहे ही भोळी समज या वेड्या मनासाठी ?
आयुष्यातल पहिल - वहिल प्रेम मिळणार की नाहि ?
विचारीन विचारीन म्हणतोय, पण धाडस होत नाहि ...

कथा सुकलेल्या गुलाबाची ...

ही कथा आहे , एका 'त्या'ची , एका 'ति'ची,
आणि , हसरया , खेळत्या , ताज्या , टवटवीत गुलाबाची.

तो तिला पहायचा , आणि सारं जग विसरायचा,
ती सुद्धा त्याला पहायची , पण न पाहिल्यासारखं करायची.

बसमधल्या गर्दीत सुद्धा ती त्याला सहजपणे दिसायची,
बसमधल्या गर्दीत सुद्धा , ती , त्याला दिसेल , असंच बसायची.

कॉलेजमधल्या गलक्यामध्ये त्याला फक्त तिचाच आवाज ऐकू यायचा,
चोरट्या नजरेतून तिनं टिपलेल्या त्याच्या नजरेतल्या भावना तिला समजायच्या.

गर्दीतल्या प्रत्येकीच्या चेहऱ्याची जागा तिच्या चेहऱ्यानं घेतली,
ती नसतानाही तिथं , हळूच त्याच्याकडं बघून हसू लागली.

पुरे झालं मौनव्रत , बस्स झालं आता,
तिचाच विचार करून करून भणभणउ लागला माथा.

आणि एक दिवस त्यांना मनाशी पक्का निश्चय केला,
बागेतल्या गुलाबंपैकी एक गुलाब कमी झाला.

हातात गुलाब , मनात निश्चय , आणि छातीत ढोल बडवत तो निघाला,
पण , बंद पडली शब्दांची factory पाहताच समोर तिला.

' माझ्या हातातल्या गुलाबाचा अर्थ तिला उमजेल काय ?
शब्दांविना डोळेच तिला ह्याचा अर्थ समजावतील काय ? '

तिच्या डोळ्यांनी हेरला अर्थ त्याच्या डोळ्यांचा,
पण , शब्द बाहेर पडले , " गुलकंद छान होतो ह्याचा  ! "

त्याचा अर्थ त्याला समजल्यावर शब्दही दचकले,
आजूबाजूचे सारे जग पोट धरून हसू लागले.

त्याच्याच शब्दांनी दगा दिला त्याला ,
हातातला गुलाब नाहीसा कधी झाला , समजलंच नाही त्याला.

तो आजही तिला गर्दीत शोधात राहतो,
असली तर दिसते , नसली तर पूर्वीप्रमाणे हळूच हसते

तो मान खाली घालून जातो , समोरून जाताना बागेच्या,
तो दिसताच गुलाब ओरडतात , " गुलकंद छान होतो आमचा ! "

पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर

पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर
मेघ दाटून येतील उंन पोळून गेल्यावर
सरी धावून येतील रानं जळून गेल्यावर
सुखही परत येईल दु:खं छ्ळून गेल्यावर.
होतील मार्ग मोकळे वळणं टळून गेल्यावर
शब्द टोचतील मनाला ते बोलून गेल्यावर
भिजतील डोळे तुझे, माझे सुकून गेल्यावर
पुन्हां तु ही परत येशील मी दूर गेल्यावर.
झोप धावून येईल स्वप्नं जळून गेल्यावर
कळ्तील तुला चुका पण मी माफ़ केल्यावर
कळेल प्रेम तुला विरहात मन पिळून गेल्यावर
तुही धावून येशील मी राखेत मिळून गेल्यावर.
आठवण माझीही येईल मी विसरून गेल्यावर
पुन्हां तु शोधशील खुणा राखही उडून गेल्यावर
तुझ्याही डोळ्यात आसवे ओघळतील कधी
पण माझ्या कविता तुझ्यापुढे रडून गेल्यावर.

आयुष्यात पुढे सरकत राहा.......

आयुष्यात पुढे सरकत राहा.......

मित्र मित्र म्हणता म्हणता मैत्री होते
मैत्री मैत्री म्हणता म्हणता नाते जुळते
अशी अनेक म्हणता म्हणताना ती जुळतात
अनेकना त्यांतून असे ऋणानुबंध निर्माण होतात

हात हवा असतो प्रत्येकाला प्रत्येकाचा
साथ हवी असते प्रत्येकाला प्रत्येकाची
पण जेव्हा तो हात नकोसा होतो
तेव्हा नकोशी होते ती साथ त्या साथीदाराची

नाती जोडता जुळवता प्रेम जडते
साय्रा जगाला सोडून प्रीती ह्रुदयात दडते
तुटतात जेव्हाही नाती, ती जुळवणे होते कठिण
तुकडे होतात जेव्हा त्या ह्रुदयाचे, त्याला जोडणे होते कठिण

आत्मविश्वास असतो एकमेकांना एकमेकांवर
अनेकांना आपल्या आणि आपल्यांवर
जेव्हा उठतोतो विश्वास स्वत:च्याच आत्म्यावरूनच
नाही उरत कोणी आपले नाही उरत कोणी कोणाचे

आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात अनेकप्रसंग
अनुभवत असतो तो अनेक अनुभव येता जाता
अनेक वाईट असतात थोडेसे चांगले असतात
असाच काहीतरी म्हणे माणूस घडत असतो

खचू नका असे प्रसंग येता जाता
भय नामकराक्षसाला तारणारे
आत्मविश्वासाचे ब्रम्हास्त्र निर्माण करत राहा
आपल्या आयुष्याचा हिमालय असाच आत्मविश्वासाने चढत राहा..
आयुष्यात पुढे सरकत राहा.......
              .


--------------------------------------------------------
तुझी   नी   माझी  मैत्री  एक   गाठ   असावी,
कुठल्याही  मतभेदाला  तिथे  वाट   नसावी,
मी आनंदात असताना हास्य तुझे  असावेत,
तू   दुखात   असताना  अश्रु   माझे असावेत.

एकदा तरी आयुष्यात

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
जिला आपल्या मनातले सर्व काही सांगावे,
सांगता सांगता आयुष्य पूर्ण सरुन जावे,
आणि सर्तानाही आयुष्य पुन्हा पुन्हा जगावे...

१० :१५ ची CST लोकल....

१० :१५ ची CST लोकल....


ट्रेन सुटली ..धावता धावताच तो चढला .. धावत पळत.. कसा बसा गर्दीतून तो आत शिरला.. आत मध्ये येताच क्षणी त्याची नजर पुढच्या दरवाज्या जवळतो पूर्णपणे कावरा बावरा.. बहुतेक त्याची नजर तिलाच शोधात असावी.. बराच वेळ..त्याने पाहिलं .. पुढच्या दोन्ही दरवाज्यांजवळ येऊन पाहिलं.. त्याच्या नजरेत..एक भीती.. एक हुरहूर.. तिच्याबद्दलची काळजी.. दिसत होती.. त्याने गर्दीतून शेवटी वाट काढत पुढच्या दरवाज्याजवळ येऊन परत खात्री केली.. रुमाल काढून घाम पुसला..लगेच काहीतरी आठवल्यासारख त्याने ..आपला मोबाईल फोन बाहेर काढला.. मोबाईल मध्ये नंबर शोधून..लगेच फोन केला.. नुसताच हेलो हेलो ऐकू आलं ..तिकडून काहीच आवाज येत नसावा.. त्याने पुन्हा प्रयत्न केला.. पण मात्र नाईलाज.. शेवटी त्याने.. शांत राहण्याचा निर्णय घेतला..! पण..शांत राहून सुद्धा..तो इकडे तिकडे पाहत होता..कि ती कुठे बसली तर नाहीये ना..!
खर तर.. त्याची ही रोजची सवय झाली होती.. रोज स्टेशन वर त्याने तिची वाट पाहणे.. तिचे ट्रेन मध्ये चढणे..त्याचे तिला पाहणे.. रोजचा एकत्र ट्रेन मधला प्रवास..! गर्दीतून... त्याने तिला दिलेलं स्मितहास्य..अन त्यावर..तिने ही दिलेला प्रतिसाद.. असं दोघांच ..प्रेम वाढत गेलं.. प्रेमाच्या बंधनात दोघे अडकले.. जसा रोजचा प्रवास तसा आयुष्याचा प्रवास सुद्धा एकत्र करण्याचं त्यांनी ठरवलं .. पण नियतीला ते मान्य नव्हतं..घडू नये तसचं घडलं..

एके दिवशी अचानक....ट्रेन मध्ये आरडा ओरडा.... बायकांच्या किंकाळ्या.. माणसांची गडबड.. ट्रेन थांबवण्यासाठीची लोकांची धडपड.. सारे वातावरण भयानक.. "कोणी चैन खेचा चैन खेचा..मुलगी पडली " अश्या हाका. ट्रेन मधले लोकं उठून बाहेर पाहायला लागले.. ट्रेन थांबली.. पण ... ट्रेन थांबण्या आधीच ..सार संपलं होतं... तीच मुलगी ट्रेन मध्ये चढताना.. पाय घसरून पडली होती.. तिचे शरीर ट्रेन आणि प्लाटफोर्म मधल्या अंतरात अडकलं होतं.. काही समजण्याच्या आधीच.. तीच आयुष्य संपलं होतं.. त्याच्या नजरे समोर ती त्याला कायमची सोडून गेली होती.. सार निःश्ब्ध.. हृदयाचे ठोके चुकले...या परिस्थितीत काय करावं..त्याला काहीच कळत नव्हतं.. जमलेल्या लोकांनी आणि पोलिसांनी.. राहिलेल्या गोष्टींची जबाबदारी घेतली..पण त्याचं मन आतून पूर्णपणे ढासाळून गेलं होतंनुसतं स्तब्ध होऊन तो तिच्या कडे पाहत राहिला …. मगाशीच आल्या आल्या तिने मारलेल्या गप्पा.. त्यांनी एकत्र घालवलेले सारे क्षण आठवायला लागले... आपलं माणूस आपल्याला कायमचं सोडून गेल्यावर त्याची झालेली दयनीय अवस्था पाहून.. डोळ्यात आसवांनी आपोआप वाट धरली होती... आयुष्य हे किती क्षणभंगुर असतं.. ह्याचा अनुभव फार जवळून त्याला जाणवला.. त्याच जागी तो ..एकटाच रडत बसला. .

आज पण तो रोज तिची वाट पाहतो.. तिकडेच.. त्याचं जागी.. १०:१५ ची CST पकडतो.. लोकल मध्ये चढल्यावर...असाच काहीसा तिला तो रोज शोधत राहतो..अन...नंतर परत.. सार आठवून . भरगच्च डोळ्यांनी निस्तब्ध अश्रू गाळत शांत बसतो..

आयुष्य हे क्षणभंगुर आहे.. आपल्या वर प्रेम करणारे आपली काळजी करणारे बरेच लोकं असतात.. आपण नसण्याने त्यांच्या आयुष्यात काय घडू शकत याचा विचार करा.. घाई.. ऑफीस... सगळ्यांच्याच नशिबी असतं..पण जीवन हे अमूल्य असतं.. ह्याचा विचार करा..अन आजपासून..जपून प्रवास करा..