आयुष्यात स्वतःची एक,मैत्रीण असावी.
कुठलाही शिष्ठ पणा न करता,दिल खुलास असावी,
पळस पानी थेम्बा सारखी,ती नितळ असावी;
जी कायम अबोध बालका सारखी,हसत असावी,
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.
...
जिच्या सोबत संध्याकाळ,एक "स्पेशल" असावी,
पण ती स्वतःकायम,"सोशल"असावी;
मैत्री नात्यात "नथिंग ओफ़िशिअल "असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.
जिची चाहूल एक, ऋतू पालवी सारखी असावी,
जिची सोबत श्रावण-सरी,ओली असावी,
जिच्या केस घसरणीत,पानगळ असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.
जिच्या नाती,सर्व धागी अतूट असावी,
जिची हास्य खळखळ,बेछूट असावी;
जिची मन भावना,रेशीम कोमल असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.
जिच्या वागण्यात,दाणगट पोट्टे-शाही असावी,
कायम माझ्या करिता,शिवी-गाळ असावी;
दोघां मध्ये एक,आगळीच फिल्मी-यारी असावी,
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.
जिने माझी तोंडची सिगारेट,ओढून फुन्कावी,
कधी तोंडी पान-विड्याची,पिचकारी थुन्कावी,
हि सगळी हिम्मत,फक्त माझ्या पुरतीच असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.
जी माझ्या संगतीस,कायम वेडी असावी,
जिला माझ्या क्षणांची,आतुर गोडी असावी;
माझ्या जोक्स ला कायम,पुरुषी हसावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.
कायम जिने माझी कॉलर,धरूनच असावी,
माझे पसरले केस,ओढूनच असावी;
कधी लाडावून माझी,गळ-मानगूट फासावी,
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.
कधी माझ्या न बोलण्याने,विव्हळ असावी,
माझ्या नजरीत ईशार्याला,चपळ असावी;
कुठेतरी या नात्या बद्दल,खूप हळवी असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.
कुठे असेल ती,जरा लवकर गवसावी,
तिची प्रफुल्लीत बहर,लवकर बरसावी;
माझ्या शुभ्र आयुष्याला,तिचीच रंगत असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०११
मैत्री ला एक वृक्ष म्हणू ..
मैत्री ला एक वृक्ष म्हणू ...मित्र सारे त्यावरली पाने फुले जणू
फांद्यांचा आधार घेऊ ......उंच वाढू मैत्रीची उंची पाहू
एक फुल तू बन एक पान मी
एक फांदी हाताची एक फांदी सहवासाची
घट्ट रोऊ पाळे मुळे या धर्तीत
मित्र बनवू तिलाही , नसेल भीती उखळून पडण्याची
भूक लागली तर उन खाऊ
वादळाला येवू दे सोबतीला आपण नको भिऊ
मैत्रीचे बळ बघ सारे मिळून अजमाऊ
संकटे येतीलही बहु संकटाना तोंड देऊ
घरटी बांधतील पक्षी अनेक
घरटा त्यात आपल मैत्रीच एक
निवास त्यांचा चिलबिलाट सारा
सर्वांनी मिळून सांभाळू हा मैत्रीचा पसारा
हिरवी पालवी मैत्रीची ,फुलोर हा मित्रांचा
बहरून जायील वृक्ष हे इथे खेळ भावनाचा
गंध पसरू चारी दिशांनी ,
बंध एक निराळ्या भाषांनी
पाहतील वाटसरू मैत्रीचे हे वृक्ष डोळे भरुनी
सांगतील किसे कधी ..तर लहान मुलांना अपुली मैत्रीची कहाणी
अशीच फुलुदे .अशीच वाढू दे निरंतर बांधून मैत्री राहील
बुंधा मजबूत आहे विश्वासाचा हे वृक्ष असेच वाढत राहील
फांद्यांचा आधार घेऊ ......उंच वाढू मैत्रीची उंची पाहू
एक फुल तू बन एक पान मी
एक फांदी हाताची एक फांदी सहवासाची
घट्ट रोऊ पाळे मुळे या धर्तीत
मित्र बनवू तिलाही , नसेल भीती उखळून पडण्याची
भूक लागली तर उन खाऊ
वादळाला येवू दे सोबतीला आपण नको भिऊ
मैत्रीचे बळ बघ सारे मिळून अजमाऊ
संकटे येतीलही बहु संकटाना तोंड देऊ
घरटी बांधतील पक्षी अनेक
घरटा त्यात आपल मैत्रीच एक
निवास त्यांचा चिलबिलाट सारा
सर्वांनी मिळून सांभाळू हा मैत्रीचा पसारा
हिरवी पालवी मैत्रीची ,फुलोर हा मित्रांचा
बहरून जायील वृक्ष हे इथे खेळ भावनाचा
गंध पसरू चारी दिशांनी ,
बंध एक निराळ्या भाषांनी
पाहतील वाटसरू मैत्रीचे हे वृक्ष डोळे भरुनी
सांगतील किसे कधी ..तर लहान मुलांना अपुली मैत्रीची कहाणी
अशीच फुलुदे .अशीच वाढू दे निरंतर बांधून मैत्री राहील
बुंधा मजबूत आहे विश्वासाचा हे वृक्ष असेच वाढत राहील
आणी हे माझ्या त्या मैत्रीनी साठी... जिने मला.. सावरले..
आणी हे माझ्या त्या मैत्रीनी साठी...
जिने मला.. सावरले..
तूझ्या शी कधी कशी..
गट्टी जमली कळलेच नाही..
माझ्या मनातील मैत्रीची जागा..
कधी भरली कळलेच नाही..
माझ्या प्रत्येक दु:खावर..
तुझ्या मैत्रीने घातलीस फूंकर..
मी आता मात्र मी कसे फेडू तुझे उपकार..
जिने मला.. सावरले..
तूझ्या शी कधी कशी..
गट्टी जमली कळलेच नाही..
माझ्या मनातील मैत्रीची जागा..
कधी भरली कळलेच नाही..
माझ्या प्रत्येक दु:खावर..
तुझ्या मैत्रीने घातलीस फूंकर..
मी आता मात्र मी कसे फेडू तुझे उपकार..
खरच एक मैत्रिण असावी..
खरच एक मैत्रिण असावी..
मी हसलो हि ती पण हसावी..
माझ्या डोळ्यातले अश्रु..
तिच्या डोळ्यातून वाहावे..
माझ्या मित्रांची गणती होताच..
तिनेही सामोरे यावे..
मी हसलो हि ती पण हसावी..
माझ्या डोळ्यातले अश्रु..
तिच्या डोळ्यातून वाहावे..
माझ्या मित्रांची गणती होताच..
तिनेही सामोरे यावे..
त्या वाटेवरच्या वळणावर...
त्या वाटेवरच्या वळणावर...
त्या वाटेवरच्या वळणावर...
एकदा उभे राहून वाट पहा..
मी येणारया त्या रस्त्यावर..
एकदा डोळे रोखून उभी राहा..
असतील माझ्या डोळे..
अश्रुंनी भरलेले..
तुला पाहण्यासाठी..
नम्र अन आसूसलेले..
तुझ्या हाकेला..
कान माझे आतूर झाले..
तूला प्रेमाने पुकारायला..
ओठ माझे पुटपुटले..
पुन्हा त्या वळणावर..
येशील ना सखे..
पुन्हा तुझ्या बाहूत..
जकडून घेशील ना सखे..
तुझ्या भेटीची आता..
लागलीय मला आस..
तू खरचं आलीस..
की होत आहेत मला भास..
त्या वाटेवरच्या वळणावर...
एकदा उभे राहून वाट पहा..
मी येणारया त्या रस्त्यावर..
एकदा डोळे रोखून उभी राहा..
असतील माझ्या डोळे..
अश्रुंनी भरलेले..
तुला पाहण्यासाठी..
नम्र अन आसूसलेले..
तुझ्या हाकेला..
कान माझे आतूर झाले..
तूला प्रेमाने पुकारायला..
ओठ माझे पुटपुटले..
पुन्हा त्या वळणावर..
येशील ना सखे..
पुन्हा तुझ्या बाहूत..
जकडून घेशील ना सखे..
तुझ्या भेटीची आता..
लागलीय मला आस..
तू खरचं आलीस..
की होत आहेत मला भास..
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)