बुधवार, ३ ऑगस्ट, २०११

भान माझे हरवून गेलो..

हातात तुझा हात घेता,
भान माझे हरवून गेलो..
तुझ्या नक्षीदार मेहंदीच्या जाळीत,
मनाला नकळत गुंतवत गेलो ..!

चंद्र चांदण्यांचा सडा शिंपून..

चंद्र चांदण्यांचा सडा शिंपून..
सजवले आज अंगणा...
माणिक मोत्यात सजून आले...
तुझ्या साठीच रे साजना..


आजच्या पावसात..
चिंब भिजू वाटतेय..
अश्लेषा नक्षत्राने केलेली..
हि काही जादू वाटतेय..

प्रेम केलं की, शब्द ही सूचतात..

मी तुझ्याकडे पाहताना,
तू दुसरीकडेच पाहतेस..
मग साग ना उगीच कशाला,
माझ्या मनात येऊन राहतेस..!


नको येउस कधी फिरून माझ्या स्वप्नात,
मुक्त करून जा खुशाल सगळी मनाची बंधन,
समर्थ आहे मी माझ्या मनाचा घोट घ्यायला,
पण माजू देणार नाही कधीचं प्रेमाचं रणकंदन..!!


तुमच्या चारोळ्या पाहून,
मलाही एक चारोळी करावीशी वाटली..
काही चुकला तर माफ करा,
पण हि चारोळी कशी वाटली..!

प्रेम केलं की,
शब्द ही सूचतात..
ओठ नाही तर,
डोळे बोलतात..!



सुखालाही हवी असते..
साथ या दु:खाची..
आपण मात्र शोधायची असते..
दु:खातून वाट सुखाची..

तुला भेटायला म्हणून मी सये
खिडकीजवळ पाऊस बनून आलो
नकळत रोमांचित तुझ्या स्पर्शाने
हातावरून तुझ्या लगेच वाहून गेलो

सार्थक मानतो तारा जीव लुटायला..!!

नक्की चंद्रावरचं निखळ प्रेमचं भाग पाडतं ताऱ्याला तुटायला,
पण धरतीवरचा वेडा जीव मनोमनी आशा करतो त्याची फुटायला,
दोघांचीही आस्था शेवटी आकाशीच्या प्रेमाच्या भाबडेपणालाचं भुलते
इप्सित मिळत माणसाला अन सार्थक मानतो तारा जीव लुटायला..!!

माझ्या शिवाय तिला करमत नाही..!!

चारोळीच्या नशिबात,
"सुवर्ण" योग आहे..!
अमावस्ये नंतर,
पौर्णिमा आहे...!

होकार तिला देता येत नाही,
नकार तिला देता येत नाही..!
कितीही काहीही असले तरी,
माझ्या शिवाय तिला करमत नाही..!!


चार दिवस सासूचे
चार दिवस सूनेचे,
बाकीचे दिवस
घरातल्या पुरुषांचे!

आरशात पाह्यलं,
केसांची रूपेरी बट दिसली...
पुढ्च्याच महिन्यात लग्नाची
सिल्व्हर ज्युबिली आली..!

जखमांना ही बोलता आलं सये
खरंच खूप बर झालं असतं
किती घाव तिने केले गहिरे
जगासमोर तरी आलं असतं

पण..... मी तर एक तुटलेला तारा..!

सगळेच कसे
क्षणभर थांबलेले
जसे त्याना
दोरीनेच बांधलेले!
मैत्रीच्या वाटेवर
गावे खूप असतात
थांबून पाहूणचार घ्यावा
अशी थोडीच असतात!

शेवटी नशिबाचा काय दोष,
नियतीचा खेळ सारा..
सारे आभाळ माझेच होते,
पण..... मी तर एक तुटलेला तारा..!

पुन्हा आठवांचा थवा तुजकडे वळला जरासा

पुन्हा आठवांचा थवा तुजकडे वळला जरासा
पापण्यांच्या ओजळी तून अश्रु ढळला जरासा

.
मुक्या भावनांच्या कानी पडले शब्द काही
अर्थ वेदनांचा काही त्यांना कळला जरासा

.
अंतरास त्या न लागला ठाव दोन पावलांचा
"मार्ग"तो एकटा चालण्या माघारी वळला जरासा

.
हृदयात त्या बंधिस्त निजली सारी स्पंदने
ओठातील एक नाजूक शब्द जळला जरासा

स्मृतीत त्या अस्पष्ट आकृत्या दिसल्या क्षणिक
"नीलेश"नशिबाचा नकाशा आता मळला जरासा

खूप काही बोलायचय तिच्याशी,

गिरवतो अक्षरे कागदावर सये
ओठावरून जे माघारी फिरतात
दाद मिळते शब्दांना कधीतरी
तेव्हा अर्थ मिलनास झुरतात

हाटेच्या धुंद गारव्यात साथीला हे तळे,
लाजतो नभीचा चंद्र रूप पाहुनिया खुळे,
आरसपानी कशी तू त्याला पडलेलं कोड,
अप्सरेचा बाज कसा धरतीवर न कळे..!!

खूप काही बोलायचय तिच्याशी,
पण जीभच रेटत नाही..!
आग लागून सुद्धा आमचा
फटाकाच फुटत नाही..!!


एकच थेंब होता माझ्या डोळ्यात सये
मी म्हटलं का रे थांबलास एकटाच ?
तो म्हणाला पाठमोरी झाली रे ती वेडी
रूप साठवायचे आहे तिचे एका थेंबात ........

जीवन म्हणजे नक्की काय असतं ?

जीवन म्हणजे नक्की काय असतं ?
जीव न म्ह णजे
कुणाला माहित नसणारं
प्रत्येकाचं निरनिराळं
एक गोष्टीचं पुस्तक असतं

जन्म त्याची सुरुवात
मृत्यू त्याचा शेवट
दररोज त्याचं लिहितं एक पानं
कोणाच्या कधी मर्जीविना तर कधी मर्जीसहित

हार-जीत, राग-प्रेम यांना
असतं यात स्थान
सुख-दु:ख यांचे चढाव यात फार

हसायचं नसलं तरी हसावं लागतं
रडायला आलं तरी आवरावं लागतं

जीव न म्ह णजे
एक गोष्टीचं पुस्तक असतं
आव्हानं देऊन ते पूर्ण करायचं असतं
भातुकलीच्या डावासारखं
अर्धवट सोडायचं नसतं..........

तुझी नी माझी मैत्री एक गाठ असावी,

तुझी नी माझी मैत्री एक गाठ असावी,
कुठल्याही मतभेदाला तेथे वाट नसावी
मी आनंदात असताना हसू तुझे असावे,
तू दुःखात असताना आसू माझे असावे,
मी एकाकी असताना सोबत तुझी असावी,
तू मूक असताना शब्द माझे असावे.
Happy Friendship Day

खरं प्रेम म्हणजे

खरया प्रेमाची सुरूवातच तर नेमकी तेव्हां होते जेव्हां दोघं खरया अर्थाने जवळ येतात- मनाने, शरिराने! कायमचे..!!
खरं प्रेम म्हणजे दोघांनी प्रत्येक परिस्थितीला धैर्याने तोंड देणे.
खरं प्रेम म्हणजे दोघांचा एकमेकांवर विश्वास असणे.
खरं प्रेम म्हणजे दोघांची एकमेकांवर निष्ठा असणे.
खरं प्रेम म्हणजे दु:खात एकमेकांच्या सोबत असणे.
खरं प्रेम म्हणजे सुखात एकमेकांना आनंद देणे.
खरं प्रेम म्हणजे तडजोड करण्याची तयारी असणं.
खरं प्रेम म्हणजे एकमेकांच्या गुणांना जपणे.
खरं प्रेम म्हणजे दुखावलेली मने परत जोडणे.
खरं प्रेम म्हणजे भांडण करुन परत जवळ येणे.
खरं प्रेम म्हणजे एकही शब्द न उच्चारता भावना पोहोचणं.
खरं प्रेम म्हणजे डोळ्यात फक्त आनंदाश्रु असणं.
खरं प्रेम म्हणजे एकमेकानां सांभाळणे.
खरं प्रेम म्हणजे चुकत चुकत शहाणे होणे.
खरं प्रेम म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असणे.
खरं प्रेम म्हणजे प्रेमबरोबर प्रमाणिक असणे.
खरं प्रेम म्हणजे … तू अणि मी, कायम जवळ असणे..

जीवन म्हणजे नक्की काय असतं ?

जीवन म्हणजे नक्की काय असतं ?
जीव न म्ह णजे
कुणाला माहित नसणारं
प्रत्येकाचं निरनिराळं
एक गोष्टीचं पुस्तक असतं

जन्म त्याची सुरुवात
मृत्यू त्याचा शेवट
दररोज त्याचं लिहितं एक पानं
कोणाच्या कधी मर्जीविना तर कधी मर्जीसहित

हार-जीत, राग-प्रेम यांना
असतं यात स्थान
सुख-दु:ख यांचे चढाव यात फार

हसायचं नसलं तरी हसावं लागतं
रडायला आलं तरी आवरावं लागतं

जीव न म्ह णजे
एक गोष्टीचं पुस्तक असतं
आव्हानं देऊन ते पूर्ण करायचं असतं
भातुकलीच्या डावासारखं
अर्धवट सोडायचं नसतं..........

काळे मेघ दाटले, कितीक थेंब साठले,

सांग ना पावसाला या बघून तुला सये
आठवतेय का गं ती कागदाची होडी,
अजूनही तोच गारवा अन तोच पाऊस
ओसरली आहे फक्त नात्यातील गोडी

काळे मेघ दाटले, कितीक थेंब साठले,
सर्व झुगारून मोकळे, व्हावेसे मनी वाटले,
आला वारा ही रंगात, भोवरा संचारला अंगात,
झालो मी मुक्त वारू, हसलो वार्‍याच्या संगात

रात्रीचे हे निरभ्र आकाश..
माझ्या कडे काही मागतयं..
मी त्याला काय देणार..
माझंच तूझ्या प्रेमावर भागतयं

जीवनात जागा देशील का ?

वादल उठलय आयुष्यात,
जीवनात जागा देशील का ?
काहुर माजले मनात माज्या ,
मनास आधार देशील का... वाळवंटात फसलो आहे,
सावली तू होशील का एकटाच चालत आहे,
हात हातात घेशील का ..?????
नाव बनुनी फिरतो आहे समुद्रात,
किनारा तू होशील का,
दगदगीत आयुष्याच्या खरचटलय,
फुंकर तू घालशील का? थकलो आहे ताणाने ,
कुशीत एकवार घेशील का,
एकटाच चालत आहे,
हात हातात घेशील का ..?????

रात्री चंद्राला ही जागा सोडताना मी पाहिलंय

रात्री चंद्राला ही जागा
सोडताना मी पाहिलंय
काळीज त्याचे तुझ्या
रुपात अडकून राहिलंय


मिटल्या डोळ्यात अवचित दाटतं स्वप्न प्रेमाच्या मखमली जगाचं,
स्वप्नातही स्वप्न पडतं तुझ्यासोबतच्या मनी इच्छिलेल्या सुखाचं,
क्षणात सजतो हा कल्पनेचा मखर त्यात प्रतीष्टानी माणूस हक्काचं,
पण भानावरती येता आपसूक......मनोरंजन सारं कारण बनत दुःखाचं..!!

गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय...
गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप , मध्येच माघार घेऊ नकोस...!