सोमवार, १ ऑगस्ट, २०११

तुझ्या विषयी बोलताना .........

असच “ Search” करता करता ........
तुला “Request” गेली ......
आज उद्या करता करता ........
तू “Add” झाली ......

तुझ्या विषयी बोलताना .........
खरच वेगळ “feel” होतंय ......
पण तुलाच ऐकायचं म्हणून .......
शब्द स्वताहून “Click” होतंय ......

तुझ्या डोळ्यांमध्ये लपली........
आहे आनंदाची डबी .......
ऐकल नाही तुला कधी .......
पण जाणवते मला गोड आवाजाची छबी .......

माझ्यासाठी सुंदर आहेस तू ......
हे सांगायचीच गरज नाही.........
बोलताना तुज्याशी माझा मीच रमून जातो.......
सतत राहव “Online “बाकी काहीच सुचत नाही .......

चेहरयावर तुज हास्य.......
माझ्यासाठी असाच राहो ......
या “वेगळ्या “ अश्या मित्रासाठी .....
हृदयात मात्र एक छोटीशी जागा ठेव ........

मलमली तारुण्य माझे

मलमली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसात माझ्या, तू जीवाला गुंतवावे..

लागुनि थंडी गुलाबी, शिरशिरी यावी अशी ही
राजसा माझ्यात तू अन् मी तुझ्यामाजी भिनावे..

कापर्‍या माझ्या तनूची तार झंकारुन जावी
रेशमी संगीत स्पर्शाचे, पुन्हा तू पेटवावे..

रे तुला बाहुत माझ्या, रुपगंधा जाग यावी
मी तुला जागे करावे, तू मला बिलगून जावे…

चारोळी

असं जाता जाता तुझं
मला परत वळून बघणं
तुला जाताना बघून
तुझी वाट बघत जगणं

जाणाऱ्याने जाता जाता
पाठी वळून हसू नये
हसत हसत जाता जाता
जीव घेऊन जाऊ नये

तू गेल्यावर वाट बघत
मी जगायला लागलो
तू वळून बघण्यावरही
कविता करायला लागलो

मला ठाऊक नाही माझं
तुझ्याबरोबर काय काय येतं
इतकंच ठाऊक मला की
तू जाताना सगळंच जातं

येताना समोर बघतेस
जाताना वळून बघतेस
परत यायचं असतं तरी
मला थोडंसं छळून बघतेस

प्रेमात पडल्यावर सगळेच
शहाणे वेड्यासारखं वागतात
खरे वेडे प्रेमात न पडल्यामुळे
स्वत:ला शहाणं म्हणू लागतात

खरच प्राण जाताना
तुझं वळून बघणं आठवेल
दोघात फारसा फरक नाही
हे तेव्हाच खरं जाणवेल

आठवणीत येऊन कोणीही
कोणाला रात्री जागवू नये
प्रेमात वेडेपणा केल्यामुळे
जगाने कोणावरही रागवू नये