रविवार, २४ जुलै, २०११

सगळे असून आज मी एकटा

सगळे असून आज मी एकटा
देवा सांग रे माझा अपराध,
तोडून नेताना माझ्या प्रेमाच्या माणसांना
मलाही घ्यायचं होतस ना उदरात..!!

सगळी सुख जरी दारी उभी अन
आनंद जल्लोषाचा माहोल पुरा,
जीवनाच्या ह्या प्रत्येक टप्प्यावर
तुमच्याविना मी कायम अधुरा..!!

मातीचा गोळा घडवत गेलात
घालून माया ममतेचं शिंपण,
दैवाचा फेरा भेदून गेला अकस्मात
दोन जीवांचं ह्या जीवासाठीचं कुंपण..!!

नियतीचा हा नियम मान्य पण निर्माण
करतो आयुष्याभरासाठीची निर्वात पोकळी,
आपल्या माणसांची जागा कुणी घेईल कि
जन्मभर राहणार ती अशीच मोकळी..!!

आतुरतेने प्रतीक्षा आता वाटत
कुणीतरी हक्काचं आपलं असं असावं,
खोट हसून जीव थकला आता
कधीतरी जरा खर खरंही हसावं..!!

आठवतेस तू...

न चुकता करावा तुला फोन
मग, उगाच तु चेष्टा करून बोलावं
बोलता-बोलता असाच वेळ निघून जावा...
याक्षणी आठवतेस तू...
फोन हाती घेतल्यावर बघावा
तु पाठवलेला जुनाच एखादा "मेसेज"
बघून मग असाच विचार करत बसावा...
याक्षणी आठवतेस तू...

एखाद्या दिवशी पहावी वाट
करशील तू फोन म्हणून, तुझं मात्र
वेळ नाही बोलू आपण नतंर...
याक्षणी आठवतेस तू...

तुझं नेहमीच खट्याळ बोलणं
माझं मात्र नेहमीच तुला रागवणं
पण तरीही तुझं शात बसणं...
याक्षणी आठवतेस तू...
तुझा नेहमीच माझ्याकडे हट्ट
माझं मात्र नेहमीच रूबाब दाखवणं
तरीही तुझा मझ्यावर विश्वास असणं...
याक्षणी आठवतेस तू...

मित्र म्हणून काय नाही केलस तू
माझं मत्र "मी असाच आहे"
पण तरीही सागण्याचा तूझा प्रयत्न असणं...
याक्षणी आठवतेस तू...
नेहमीच तूझं प्रेमानं बोलणं
माझं मात्र नेहमीच टोचून बोलणं
तरीही तू एकून घेण्याचं मोठेपण असणं...
याक्षणी आठवतेस तू...

डोळ्यातील अश्रूही थाबेना आज
रूसलेत तेही मझ्यावर
मिही अश्रुची चादर पाघंरणार मनावर...
याक्षणी आठवतेस तू...

"मैत्री आपली मनात जपलीस
कधी सावलीत, कधी ऊन्हात तापली
कधी फुलात, कधी काट्यात रूतली
तरीही तू ती मनात जपलीस..."
याक्षणी आठवतेस तू
...

थेंब अश्रुंचे दोन गालावर

थेंब अश्रुंचे दोन गालावरती..
कसे पुसायाचे राहून गेले..
लपविलेले दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..
.
.
सांगितले बरेच काही..
आनंदाश्रु अन काही बाही..
अर्थ सुकल्या आसवाचा परी
लावायचा तो लावून गेले..
.
लपविलेले जे दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..

पुसले डोळे.. हसून खोटे
चाचपले कितिक मुखवटे
मुखवट्याला चेहर्‍यावरती
चढवायाचे आज राहून गेले
.
लपविलेले जे दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..

हसून आता.. विसरून सारे
वावरते जणू.. उनाड वारे
हसताना पुन्हा भरले डोळे
पापणीतून अश्रु वाहून गेले
.
लपविलेले जे दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..
.
.
थेंब अश्रुंचे दोन गालावरती..
कसे पुसायाचे राहून गेले..
लपविलेले दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..

टीम टीम तारे आभाळी...

तुझं अस्तित्व अजूनही जाणवते मला..
तू दूर असलीस तरी तुझी आठवण खुणावते मला..
फरक कुठे पडला कि तू माझी नाहीस...
जाताना तू जे अश्रू गाळलेस तेच अजूनही सुखावतात मला..


टीम टीम तारे आभाळी...
चंद्रकोर शोभतेय भारी..
आता रात्र फार झाली..
चला जाऊन झोपा आपल्या घरी..

तुझी सोबत असताना

आठवते अजूनही तुझ्या
माझ्यातलं भांडण वादळी
मिठीत विसावताच पुन्हा
खुलणारी तुझी कळी
मन जेव्हा गुंतून जातं
नकळत आठवणीत
तुझ्या माझ्या नात्याचं
उलगडतं हळूच गुपित 


मावळतीचा सूर्यही
जेव्हा प्रेमरंगी रंगतो
नाद तुझ्या आठवांचा
हळूच कानी गुंजतो

काल काळजाशी तुझ्या
आठवणी भांडल्या
झोपताना कुशीवर
डोळ्यातून सांडल्या

तुझी सोबत असताना
मी शब्दच विसरतो
तुझ्या डोळ्यातले भाव
मी शब्दाविनाच वाचतो

शब्दाविना सखे तू
डोळ्यातून बोलतेस
आधी दूर जाऊन मग
आठवणीतून छेडतेस.

ऐलतीर अन पैलतीर
मध्ये आयुष्य चालले
ओढ जीवाला सतावे
वेड्या आशेला लागले

कसे संपावे मीपण
कसा मिळावा किनारा
वाहणाऱ्या या पाण्याला
दोन बाजूंचा आसरा

दोन टोके संसाराची
एक तू अन एक मी
साथ देऊ चालताना
संसारी मग काय कमी

तुझ्यावीण आयुष्य कठीण आहे मला
हे तू चांगल्याप्रकारे जाणतेस ...
तरी ही अशी तू दूर जावून
माझ्या मनाशी का ग खेळतेस ....


 कुणास ठाऊक का
आज मला चंद्र व्हावेसे वाटतेय..
ढगा आड लपून गपचूप...
तुला पाहावेसे वाटतेय..


पावसाने आज ...
कमालच केली.....
निसर्ग फुलवायला त्याने..
चक्क पगाराची मागणी केली..

अधीर मनातून बरसलेल्या..
त्या शब्दांकडे निरखून बघ.
अजून हि तुझ्या वाटेवर..
तुझ्या येण्याची प्रतीक्षा करताहेत बघ..













एका 'त्या'ची , एका 'ति'ची,

ही कथा आहे , एका 'त्या'ची , एका 'ति'ची,
आणि , हसरया , खेळत्या , ताज्या , टवटवीत गुलाबाची.

तो तिला पहायचा , आणि सारं जग विसरायचा,
ती सुद्धा त्याला पहायची , पण न पाहिल्यासारखं करायची.

बसमधल्या गर्दीत सुद्धा ती त्याला सहजपणे दिसायची,
बसमधल्या गर्दीत सुद्धा , ती , त्याला दिसेल , असंच बसायची.

कॉलेजमधल्या गलक्यामध्ये त्याला फक्त तिचाच आवाज ऐकू यायचा,
चोरट्या नजरेतून तिनं टिपलेल्या त्याच्या नजरेतल्या भावना तिला समजायच्या.

गर्दीतल्या प्रत्येकीच्या चेहऱ्याची जागा तिच्या चेहऱ्यानं घेतली,
ती नसतानाही तिथं , हळूच त्याच्याकडं बघून हसू लागली.

पुरे झालं मौनव्रत , बस्स झालं आता,
तिचाच विचार करून करून भणभणउ लागला माथा.

आणि एक दिवस त्यांना मनाशी पक्का निश्चय केला,
बागेतल्या गुलाबंपैकी एक गुलाब कमी झाला.

हातात गुलाब , मनात निश्चय , आणि छातीत ढोल बडवत तो निघाला,
पण , बंद पडली शब्दांची factory पाहताच समोर तिला.

' माझ्या हातातल्या गुलाबाचा अर्थ तिला उमजेल काय ?
शब्दांविना डोळेच तिला ह्याचा अर्थ समजावतील काय ? '

तिच्या डोळ्यांनी हेरला अर्थ त्याच्या डोळ्यांचा,
पण , शब्द बाहेर पडले , " गुलकंद छान होतो ह्याचा ! "

त्याचा अर्थ त्याला समजल्यावर शब्दही दचकले,
आजूबाजूचे सारे जग पोट धरून हसू लागले.

त्याच्याच शब्दांनी दगा दिला त्याला ,
हातातला गुलाब नाहीसा कधी झाला , समजलंच नाही त्याला.

तो आजही तिला गर्दीत शोधात राहतो,
असली तर दिसते , नसली तर पूर्वीप्रमाणे हळूच हसते

तो मान खाली घालून जातो , समोरून जाताना बागेच्या,
तो दिसताच गुलाब ओरडतात , " गुलकंद छान होतो आमचा ! "

हि कथा होती त्याची , तिची आणि ........
आणि एका हसऱ्या , खेळत्या , पण आता सुकलेल्या , तिच्या पुस्तकात जपून ठेवलेल्या , गुलाबाची ....

प्रेम का मैत्री.

प्रेम म्हणजे LOVE

L+O+V+E = 54

12+15+22+5 = 54

आणि मैत्री म्हणजे FRIENDSHIP

F+R+I+E+N+D+S+H+I+P = 108

6+18+9+5+14+4+9+8+9+16 = 108

काय बरोबर ना ..!

कळलं का काही.....!!

मैत्री ही

प्रेमाच्या दुप्पट असते...!

तुम्हाला काय आवडेल...........?

प्रेम का मैत्री...................???