आ- आवडता नेता
मो- मोल ज्याचे सर्वांसाठी
ल - लळा लावतो सर्वांला
असा हा आमोल

गुरुवार, २८ जुलै, २०११
" आकर्षण "
पाहताक्षणी एखादी व्यक्ति
आवडणं हे " आकर्षण " असतं
परत पहावसं वाटणं हा " मोह " असतो ,
त्या व्यक्तिच्या जवळून
जाण्याची इच्छा असणं ही
..." ओढ " असते ,
त्या व्यक्तिला जवळून जाणणं
हा " अनुभव " असतो
आणी त्या व्यक्तिला तिच्या
गुणदोषांसह स्विकारणं हेच
खरं " प्रेम " असतं ..!!
आवडणं हे " आकर्षण " असतं
परत पहावसं वाटणं हा " मोह " असतो ,
त्या व्यक्तिच्या जवळून
जाण्याची इच्छा असणं ही
..." ओढ " असते ,
त्या व्यक्तिला जवळून जाणणं
हा " अनुभव " असतो
आणी त्या व्यक्तिला तिच्या
गुणदोषांसह स्विकारणं हेच
खरं " प्रेम " असतं ..!!
प्रश्नच प्रश्न.. सैरभैर
पून्हा एकदा
आरोप प्रत्यारोप
रोख नेमका पण
प्रश्नच प्रश्न.. सैरभैर
तू हवासच.. गुन्हेगार लागतोच केस चालवताना
तूच नकोस.. सग्गळं तुझ्यामुळेच झालं
प्रचंड रोष अगदी जळजळणारा
अव्यक्त आकांत.. कानाठाळ्या बसवणारा...
..कित्ती काही मावतं नाही दोन डोळ्यात.. पूढे मात्र
थरथरत्या बंद ओठांवर एक ओघळ... अन.. गून्हा कबूल... पून्हा एकदा!!!
आरोप प्रत्यारोप
रोख नेमका पण
प्रश्नच प्रश्न.. सैरभैर
तू हवासच.. गुन्हेगार लागतोच केस चालवताना
तूच नकोस.. सग्गळं तुझ्यामुळेच झालं
प्रचंड रोष अगदी जळजळणारा
अव्यक्त आकांत.. कानाठाळ्या बसवणारा...
..कित्ती काही मावतं नाही दोन डोळ्यात.. पूढे मात्र
थरथरत्या बंद ओठांवर एक ओघळ... अन.. गून्हा कबूल... पून्हा एकदा!!!
काही केल्या प्रश्न सुटेना,
हे मेघ दाट दाटूनी आले
अन तसेच दाटूनी थकले,
बरसण्यास नव्हते कारण
तसे वारेही नव्हते सुटले.
कोरडी सौदामीनी कडाडली,
ती आली तशीच निघून गेली.
प्रश्नच पडला हा नभाला कि,
वेळ बरसण्याची का निघून गेली?
कुठेच काही पर्याय दिसेना
.काही केल्या प्रश्न सुटेना,
भरून येता जड झालेल्या..
तव घनांना दिशाच गवसेना.
आपुल्या हातून काही घडले,
वा नेमके कुठे काय चुकले?
आपल्या पावसालाच कि काय,
दुज्या कुठल्या पावसाने लुटले..!!
अन तसेच दाटूनी थकले,
बरसण्यास नव्हते कारण
तसे वारेही नव्हते सुटले.
कोरडी सौदामीनी कडाडली,
ती आली तशीच निघून गेली.
प्रश्नच पडला हा नभाला कि,
वेळ बरसण्याची का निघून गेली?
कुठेच काही पर्याय दिसेना
.काही केल्या प्रश्न सुटेना,
भरून येता जड झालेल्या..
तव घनांना दिशाच गवसेना.
आपुल्या हातून काही घडले,
वा नेमके कुठे काय चुकले?
आपल्या पावसालाच कि काय,
दुज्या कुठल्या पावसाने लुटले..!!
मी बोलत राहिलो हुरळून.
मी बोलत राहिलो हुरळून.. सांगत राहिलो,
"किती छान दिसतय सगळं ईथून
ते दूरवर पसरलेले डोंगर.. गर्द हिरवे आच्छादन
नुकतीच दवात न्हावून निघालेली पाने
त्या तळयाचं निळशार पाणी.. लाजरे तरंग त्यावर
मुक्तपणे आकाशात विहार करणारे पक्षी
सगळं कस मनमोहक.. आल्हाददायक..."
तु तेंव्हाच स्तब्ध निर्विकार स्वरात उत्तरलीस,
"किती ओसाड दिसतय आजूबाजूला,
दूरवर कोणीच कस नाहिये.. कुठेच..
पारदर्शकता कमी झालीये बघ पाण्याची.
पाऊसही जरा प्रमाणात पडायला हवा,
हे काय.. जिकडे तिकडे चिक चिक नुसती..
जरा पाय ठेवायला जागा नाही कुठेच.
ह्यालाच का निसर्ग निसर्ग म्हणून डोक्यावर घ्यायचं."
मी चित्राकडे बोट करत विचारलं,
"ईकडेच पहाते आहेस ना तु?"
तुझं स्वयंचलित उत्तर लगेच आलं,
"एवढं महागड तिकिट काढून आलो ना प्रदर्शनाला,
मग दुसरे कुठे बघणार मी? मोजमापच नाही कुठल्या गोष्टीला,
ना पावसाला, ना चित्राला, ना काढणार्याच्या वेळेला, ना तिकिटाला."
"किती छान दिसतय सगळं ईथून
ते दूरवर पसरलेले डोंगर.. गर्द हिरवे आच्छादन
नुकतीच दवात न्हावून निघालेली पाने
त्या तळयाचं निळशार पाणी.. लाजरे तरंग त्यावर
मुक्तपणे आकाशात विहार करणारे पक्षी
सगळं कस मनमोहक.. आल्हाददायक..."
तु तेंव्हाच स्तब्ध निर्विकार स्वरात उत्तरलीस,
"किती ओसाड दिसतय आजूबाजूला,
दूरवर कोणीच कस नाहिये.. कुठेच..
पारदर्शकता कमी झालीये बघ पाण्याची.
पाऊसही जरा प्रमाणात पडायला हवा,
हे काय.. जिकडे तिकडे चिक चिक नुसती..
जरा पाय ठेवायला जागा नाही कुठेच.
ह्यालाच का निसर्ग निसर्ग म्हणून डोक्यावर घ्यायचं."
मी चित्राकडे बोट करत विचारलं,
"ईकडेच पहाते आहेस ना तु?"
तुझं स्वयंचलित उत्तर लगेच आलं,
"एवढं महागड तिकिट काढून आलो ना प्रदर्शनाला,
मग दुसरे कुठे बघणार मी? मोजमापच नाही कुठल्या गोष्टीला,
ना पावसाला, ना चित्राला, ना काढणार्याच्या वेळेला, ना तिकिटाला."
सांग ना राधे तू रूसलीस का
सांग ना राधे तू रूसलीस का
मुख फिरवून गं बसलीस का
आभास झाला का मोहनाचा
चुकला का ठोका काळजाचा
तूझ्याच हाकेला ओ देईल गं
साद देवूनी पहा तो येईल गं
किती वाट पाहशील श्रीरंगाची
किती ओढ लागली नभरंगाची
तो जाहला असे कोठेसे दंग
सर्वास प्रिय असे त्याचा संग
तरी तयाची सानिका तूच गं
साद देवूनी पहा तो येईल गं
असेल खट्याळ हसू तव नयनी
बघेल जरी तो जाई मन मोहुनी
मनी कृष्णी नाव तुझेच राधे
झुरे ते तर तुझ्यासाठीच राधे
येई तो जवळ तूला घेईल गं
साद देवूनी पहा तो येईल गं
मुख फिरवून गं बसलीस का
आभास झाला का मोहनाचा
चुकला का ठोका काळजाचा
तूझ्याच हाकेला ओ देईल गं
साद देवूनी पहा तो येईल गं
किती वाट पाहशील श्रीरंगाची
किती ओढ लागली नभरंगाची
तो जाहला असे कोठेसे दंग
सर्वास प्रिय असे त्याचा संग
तरी तयाची सानिका तूच गं
साद देवूनी पहा तो येईल गं
असेल खट्याळ हसू तव नयनी
बघेल जरी तो जाई मन मोहुनी
मनी कृष्णी नाव तुझेच राधे
झुरे ते तर तुझ्यासाठीच राधे
येई तो जवळ तूला घेईल गं
साद देवूनी पहा तो येईल गं
सखे
तूझ्याच सारखे नटते, थटते
अन नभी चांदणे ते लखखते
परि वेड्यास कसे कळत नाही
त्यास तुझी सर कधी येत नाही
ह्या प्राजक्तानेही तसेच करावे
वेळी अवेळी असे गंधाळून जावे
त्यालाही न कसे एवढे उमजावे
तूज श्वासगंधाने तो भारून जाये
कधी अबोलीही असेच वागते
नाजूकतेला ती ही दाद मागते
पण ती तर नेहमी हेच सांगते
तूज स्पर्शाचे तिज अप्रूप वाटते
सृष्टीसुद्धा वेडावते सहवासात तूझ्या
मग मी तरी स्वतःस सावरणार कसे
सखे गंधाळून स्पर्शतेस मनास माझ्या
मी स्वतःस कुठवर व आवरणार कसे
अन नभी चांदणे ते लखखते
परि वेड्यास कसे कळत नाही
त्यास तुझी सर कधी येत नाही
ह्या प्राजक्तानेही तसेच करावे
वेळी अवेळी असे गंधाळून जावे
त्यालाही न कसे एवढे उमजावे
तूज श्वासगंधाने तो भारून जाये
कधी अबोलीही असेच वागते
नाजूकतेला ती ही दाद मागते
पण ती तर नेहमी हेच सांगते
तूज स्पर्शाचे तिज अप्रूप वाटते
सृष्टीसुद्धा वेडावते सहवासात तूझ्या
मग मी तरी स्वतःस सावरणार कसे
सखे गंधाळून स्पर्शतेस मनास माझ्या
मी स्वतःस कुठवर व आवरणार कसे
प्रेमात पडू शकतो कोणीही.
प्रेम... प्रेम ही नुसती संकल्पना नव्हे तर तेच जीवन आहे अर्थात ज्याने त्याच्या विशुद्ध स्वरूपाचा अनुभव घेतला ती कोणतीही व्यक्ती होकारवजा मान हलवून हे मान्य करून टाकेल. अता प्रेम म्हणजे काय हे असले प्रश्न मनात येणं सहाजिक आहे पण एक लक्षात ठेवून चाललं पाहिजे की जिथे बुद्धी हात टेकते तिथून तर प्रेम अनुभवण्याला सुरूवात होते. ते असं शब्दात वगैरे सांगणं म्हणजे तहान लागणे म्हणजे काय होतं हे अशास्त्रीय भाषेत समजावण्याइतकच अवघड आहे. हा तर फक्त अनुभूतीचा भाग! एखाद्या स्वप्नाच्या, ध्येयाच्या किंवा अगदी कश्याच्याही प्रेमात पडू शकतो कोणीही. आपापल्या भावविश्वावर अवलंबून आहे की कोणाला काय भिडतं. एक अनुभव मात्र नक्की नक्की येतो प्रेमात अन तो म्हणजे 'जगावेगळं काहीतरी गमवल्याशिवाय जगावेगळं काहीतरी मिळत नाही!'
आयुष्यावर बोलू कही
आता तुला सगळं जुनं
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?
मला आठवतं तुझ्या
गालावर पडणारी खळी...
तुला मात्र तुझं हसणं
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?
मला आठवतं तुझे
ते तिखट अश्रू...
तुला मात्र तुझं रडणं
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?
मला आठवतं आपण
एकदा पावसात भिजलो होतो...
तुला मात्र तो पाऊस
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?
मला आठवतं दिलं होतं
गुलाबाचं फ़ुल...
तुला मात्र त्याचा रंग
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?
मला आठवतं तु
एकदा रुसली होतीस...
तुला मात्र माझं रागवणं
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?
मला आठवतं आपण
खुप भाडायचो...
तुला मात्र माझं भाडंण
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?
आता तुला सगळं जुनं
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?
मला आठवतं तुझ्या
गालावर पडणारी खळी...
तुला मात्र तुझं हसणं
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?
मला आठवतं तुझे
ते तिखट अश्रू...
तुला मात्र तुझं रडणं
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?
मला आठवतं आपण
एकदा पावसात भिजलो होतो...
तुला मात्र तो पाऊस
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?
मला आठवतं दिलं होतं
गुलाबाचं फ़ुल...
तुला मात्र त्याचा रंग
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?
मला आठवतं तु
एकदा रुसली होतीस...
तुला मात्र माझं रागवणं
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?
मला आठवतं आपण
खुप भाडायचो...
तुला मात्र माझं भाडंण
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?
आता तुला सगळं जुनं
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?
आयुष्य हे एक रांगोळीच आहे..
प्रश्नांनी प्रश्नांना प्रश्न विचारले,
प्रश्नांनी प्रश्नातच उत्तर दिले,
प्रश्नांच्या या प्रश्नावलीने,
प्रश्नांचेच प्रश्नात रुपांतर झाले..
तुझ्या काळजाची धक धक,
मला पाहताच वाढते..
मी तुला भेटलो की,
माझ्या सोबतही असेच काही घडते..
तुझ्या रेशमी पदरात,
सुख आहे त्या चंद्र चांदण्यांचे,
सखे तुझ्या उश्याशीच तर..
मरण मला सुखाचे..
तुला कधीच कळाले नाही..
ते प्रेमाचे तीन शब्द..
तु फ़क्त बाजार मांडलास..
ज्या पुढे तु हि निशब्द...
आयुष्य हे एक रांगोळीच आहे..
त्यात कोणते रंग भरायचे हे आपणच ठरवायचे..
एखादा चुकीचा रंग भरला तर..
संपूर्ण रांगोळीची सुबकता निघून जाते..
माझे सर्वच प्रश्न..
तुला कोड्यात टाकतात..
त्यांची उत्तरे शोधताना..
तुला माझ्या जवळ आणतात..
खरच तुझ्या आठवनिंना
दुसरी कुठलीच तोड नाही ......
तुझ्या आठवण झऱ्यां इतकी
तर साखरही गोड नाही !!!
पाऊस यावा पण महापुरासारखा नको,
वारा यावा पण वादळासारखा नको,
आमची आठवण काढा पण
अमावस्या पोर्णिमेसारखी नको..!!
मनकवडी तू मनमोहिनी
केलीस माझ्या मनाशी समेट,
आहेस तू मनाने मनाला दिलेली
मनासारखी मनमोहक भेट..!!
एवढे कच्चे नव्हते ते बंध..
ज्यांनी आपल्या हृदयाला बांधले होते..
सहज कसे तुटून जातील..
त्यात आपले मर्मबंध गुंतले होते...
आता पुन्हा मला..
शून्यातून उभारावे लागेल..
त्यात तरी मला..
तुझी साथ लाभेल...?
ऋतू बदलत असले,
तरी दिवस तेच राहतात..
एकदा निघून गेले ऋतू,
पुन्हा येत असतात..
आमोल घायाळ
प्रश्नांनी प्रश्नातच उत्तर दिले,
प्रश्नांच्या या प्रश्नावलीने,
प्रश्नांचेच प्रश्नात रुपांतर झाले..
तुझ्या काळजाची धक धक,
मला पाहताच वाढते..
मी तुला भेटलो की,
माझ्या सोबतही असेच काही घडते..
तुझ्या रेशमी पदरात,
सुख आहे त्या चंद्र चांदण्यांचे,
सखे तुझ्या उश्याशीच तर..
मरण मला सुखाचे..
तुला कधीच कळाले नाही..
ते प्रेमाचे तीन शब्द..
तु फ़क्त बाजार मांडलास..
ज्या पुढे तु हि निशब्द...
आयुष्य हे एक रांगोळीच आहे..
त्यात कोणते रंग भरायचे हे आपणच ठरवायचे..
एखादा चुकीचा रंग भरला तर..
संपूर्ण रांगोळीची सुबकता निघून जाते..
माझे सर्वच प्रश्न..
तुला कोड्यात टाकतात..
त्यांची उत्तरे शोधताना..
तुला माझ्या जवळ आणतात..
खरच तुझ्या आठवनिंना
दुसरी कुठलीच तोड नाही ......
तुझ्या आठवण झऱ्यां इतकी
तर साखरही गोड नाही !!!
पाऊस यावा पण महापुरासारखा नको,
वारा यावा पण वादळासारखा नको,
आमची आठवण काढा पण
अमावस्या पोर्णिमेसारखी नको..!!
मनकवडी तू मनमोहिनी
केलीस माझ्या मनाशी समेट,
आहेस तू मनाने मनाला दिलेली
मनासारखी मनमोहक भेट..!!
एवढे कच्चे नव्हते ते बंध..
ज्यांनी आपल्या हृदयाला बांधले होते..
सहज कसे तुटून जातील..
त्यात आपले मर्मबंध गुंतले होते...
आता पुन्हा मला..
शून्यातून उभारावे लागेल..
त्यात तरी मला..
तुझी साथ लाभेल...?
ऋतू बदलत असले,
तरी दिवस तेच राहतात..
एकदा निघून गेले ऋतू,
पुन्हा येत असतात..
आमोल घायाळ
निखारे निखारे ते चहुऔर सारे
निखारे निखारे ते चहुऔर सारे
पापण्याचे उठतील ओले पहारे
हे सांग वणवे कुण्या मालकीचे
आकाश तू झाकले नागडेच तारे
का जाणता मोडले नदीस त्या
का रेखिले तू बंध मोडके किनारे
तळास त्या जीव तगमगता असा
स्पर्शता नीर ते जागतील शहारे
मोजता दिशांना चुकशील जरासा
धरता मुठीत त्यांना पळतील वारे
तेज पुंज ते विझले शितीजा वरती
प्रकाशास ठाव दिसेना पुसे अंधारे
निसर्गास अश्या तळवे लाभले हिरवे
सरी गिळूनी तडे ते जमिनीवरी वावरे
घे लपेटून येथे जेवढे जेथे मिळाले
लाजाळूच तो स्पर्शता त्याला पसारा आवारे
आमोल घायाळ
पापण्याचे उठतील ओले पहारे
हे सांग वणवे कुण्या मालकीचे
आकाश तू झाकले नागडेच तारे
का जाणता मोडले नदीस त्या
का रेखिले तू बंध मोडके किनारे
तळास त्या जीव तगमगता असा
स्पर्शता नीर ते जागतील शहारे
मोजता दिशांना चुकशील जरासा
धरता मुठीत त्यांना पळतील वारे
तेज पुंज ते विझले शितीजा वरती
प्रकाशास ठाव दिसेना पुसे अंधारे
निसर्गास अश्या तळवे लाभले हिरवे
सरी गिळूनी तडे ते जमिनीवरी वावरे
घे लपेटून येथे जेवढे जेथे मिळाले
लाजाळूच तो स्पर्शता त्याला पसारा आवारे
आमोल घायाळ
प्रेमपत्र पहिले लिहिताना
प्रेमपत्र पहिले लिहिताना वेळ लागतो
नवीन पक्ष्याला उडताना वेळ लागतो...
'मिठीत' नव्हते, 'मनात' होते शिरायचे मज
अंतर मधले ओळखताना वेळ लागतो...
धागा अथवा नाते जर गाठीत अडकले;
प्रयत्न केले तरी सुटताना वेळ लागतो...
उपाय आता सापडला या जखमांवर पण
घाव खोलवरचे भरताना वेळ लागतो...
आमोल घायाळ
नवीन पक्ष्याला उडताना वेळ लागतो...
'मिठीत' नव्हते, 'मनात' होते शिरायचे मज
अंतर मधले ओळखताना वेळ लागतो...
धागा अथवा नाते जर गाठीत अडकले;
प्रयत्न केले तरी सुटताना वेळ लागतो...
उपाय आता सापडला या जखमांवर पण
घाव खोलवरचे भरताना वेळ लागतो...
आमोल घायाळ
ती एक वेडी होती ...
ती एक वेडी होती.............
दोघ एकत्र बसायचे अन् खुप बोलायाचे ...
शणात रुसयाचे अन् शणात हसायचे ....
एकमेकाशी बोलायाचे नाही ठरवायचे अन पटकन बोलुन ही जायचे ....
ती त्याच्यात गुंतलेली अन तो अनेकात् गुंतलेला ...
तरीही तिला तो आवडायचा ...... का???
कारण ......
ती एक वेडी होती ......
ती खुदकन हसे अन हलूवार डोळे त्याच्यासाठी ओलेही करे .....
पापण्यांच्या आडून चोरून ती बघे अन स्वतःच्या वेडेपनावर खालालुन हसे ......
ती त्याचाच तासनतास विचार करी अन तो तो तिलाच वेडी म्हणुन जाई ....
तिच्यासाठी तो बराच कही जाला अन ती मात्र त्याच्यासाठी फक्त टाइमपास होई ....
तरीही तिला तो आवडायचा ...... का???
कारण ......
ती एक वेडी होती ......
ती शांत सागर लाट अन तो एक उफलालेला सागर ....
ती एकनिष्ट पतंग अन तो एक बेफाम भ्रमर ....
ती स्वतः अधि त्याचा विचार करायची अन् तो फक्त त्याचाच विचार करायचा ....
ती त्याच्याकडे कधीच अपेक्षा नहीं करणार अन् तो तिची कुठलीच अपेक्षा पूर्ण नाही करणार ...
तरीही तिला तो आवडायचा ...... का???
कारण ......
ती एक वेडी होती ...
दोघ एकत्र बसायचे अन् खुप बोलायाचे ...
शणात रुसयाचे अन् शणात हसायचे ....
एकमेकाशी बोलायाचे नाही ठरवायचे अन पटकन बोलुन ही जायचे ....
ती त्याच्यात गुंतलेली अन तो अनेकात् गुंतलेला ...
तरीही तिला तो आवडायचा ...... का???
कारण ......
ती एक वेडी होती ......
ती खुदकन हसे अन हलूवार डोळे त्याच्यासाठी ओलेही करे .....
पापण्यांच्या आडून चोरून ती बघे अन स्वतःच्या वेडेपनावर खालालुन हसे ......
ती त्याचाच तासनतास विचार करी अन तो तो तिलाच वेडी म्हणुन जाई ....
तिच्यासाठी तो बराच कही जाला अन ती मात्र त्याच्यासाठी फक्त टाइमपास होई ....
तरीही तिला तो आवडायचा ...... का???
कारण ......
ती एक वेडी होती ......
ती शांत सागर लाट अन तो एक उफलालेला सागर ....
ती एकनिष्ट पतंग अन तो एक बेफाम भ्रमर ....
ती स्वतः अधि त्याचा विचार करायची अन् तो फक्त त्याचाच विचार करायचा ....
ती त्याच्याकडे कधीच अपेक्षा नहीं करणार अन् तो तिची कुठलीच अपेक्षा पूर्ण नाही करणार ...
तरीही तिला तो आवडायचा ...... का???
कारण ......
ती एक वेडी होती ...
ते दोन सुखद क्षण
हात माझा हातात घेऊन सख्या
तू सांगतो म्हणालास भविष्य
अरे वेड्या ,पण हात हातात गुंफून
बघ चाललाय आपलच आयुष्य !!!!!!!!!!
तुला पाहताच मनी
खेळ भावनांचा दाटला,
तुझ्या एकाच कटाक्षाने
प्रेमाग्नी हा पेटला..!!
अजून सोडली नाही आशा..
तू परत येण्याची..
अजूनही तिथे वाट पाहतो तुझी..
जिथे सुरवात झाली आपल्या प्रेमाची..
तुझ्याचं साठी सखे
नभी हे शरदाचं चांदण,
ताऱ्यांमध्ये चंद्र जणू
कपाळीचं गोंदण..!!
आज ची रात्र,
मला खुपच छळतेय,
पुन्हा तुझी आठवणीत,
मन माझे जाळतेय...
अधिर मन झाले माझे,
अधिर झाल्या चांदण्या,
वाट पाहूनी तुझी,
किती भिजूनी गेल्या पापण्या..
ते दोन सुखद क्षण
काळजात रुतुन आहेत..
ते हि वेडे तुझी,
वाट पाहत गपचुप बसुन आहेत..
असतात काही प्रश्न,
कधीच न सुटण्या साठी,
त्यांना तिथेच सोडून द्यावे,
प्रश्नालाही प्रश्नात गुंतण्यासाठी..
तू सांगतो म्हणालास भविष्य
अरे वेड्या ,पण हात हातात गुंफून
बघ चाललाय आपलच आयुष्य !!!!!!!!!!
तुला पाहताच मनी
खेळ भावनांचा दाटला,
तुझ्या एकाच कटाक्षाने
प्रेमाग्नी हा पेटला..!!
अजून सोडली नाही आशा..
तू परत येण्याची..
अजूनही तिथे वाट पाहतो तुझी..
जिथे सुरवात झाली आपल्या प्रेमाची..
तुझ्याचं साठी सखे
नभी हे शरदाचं चांदण,
ताऱ्यांमध्ये चंद्र जणू
कपाळीचं गोंदण..!!
आज ची रात्र,
मला खुपच छळतेय,
पुन्हा तुझी आठवणीत,
मन माझे जाळतेय...
अधिर मन झाले माझे,
अधिर झाल्या चांदण्या,
वाट पाहूनी तुझी,
किती भिजूनी गेल्या पापण्या..
ते दोन सुखद क्षण
काळजात रुतुन आहेत..
ते हि वेडे तुझी,
वाट पाहत गपचुप बसुन आहेत..
असतात काही प्रश्न,
कधीच न सुटण्या साठी,
त्यांना तिथेच सोडून द्यावे,
प्रश्नालाही प्रश्नात गुंतण्यासाठी..
काय तरी मिळत प्रेमात पडून
काय तरी मिळत प्रेमात पडून दुख वेदना आणि पश्चातापाचा आहेर,
तरुण मन म्हणे हेच दिवस आहेत कधीतरी पडा रे यातून बाहेर..!!
उबग येत नाही का रे तुम्हाला तेच तेच नखरे नि हट्ट झेलण,
जीव ओवाळून टाकण आणि खोट वाटावं इतक गोड बोलण..!!
सरळ सरळ प्रक्टिकल वागावं का भाव द्यावा फुकटचा मनाला,
त्याला अक्कल नसते तेच तर भाग पाडत प्रेमात पडायला..!!
खूपचं उत्तम जर जमलं ठेवायला रंगात रंगुंनी रंग आपला वेगळा,
मला तर वाटत सुखी होण्यासाठी बिनधास्त वापरावा हाच फॉर्म्युला..!!
आधार मिळतो म्हणे जीवाला भावनिक संकटांच्या वेळी सावरायला,
लहान का असता तुम्ही येत नाही का स्वतःच्या गोष्टी स्वतः आवरायला..!!
खरंच असत का प्रेम मैलाचा दगड आणि टिकणार शाश्वत चिरकाल,
गेलेत ते दिवस कायमसाठी राहिल्यात त्या फक्त आठवणी आजकाल..!!
एकचं तर जीव असतो आपल्याकडे का तो कुणाला लावून फसायचं,
घरचंच का कमी असतं त्यात दुसऱ्याचं घोड फुकटच पोसायचं..!!
धन्यवाद देतो बाप्पाला त्याने ठेवलंय मला "पुन्हा" प्रेमात पडण्यापासून दूर,
पण बघून दोन चिमण्या जीवांना आजही मनात का बर उठतो काहूर..!!
आमोल घायाळ
तरुण मन म्हणे हेच दिवस आहेत कधीतरी पडा रे यातून बाहेर..!!
उबग येत नाही का रे तुम्हाला तेच तेच नखरे नि हट्ट झेलण,
जीव ओवाळून टाकण आणि खोट वाटावं इतक गोड बोलण..!!
सरळ सरळ प्रक्टिकल वागावं का भाव द्यावा फुकटचा मनाला,
त्याला अक्कल नसते तेच तर भाग पाडत प्रेमात पडायला..!!
खूपचं उत्तम जर जमलं ठेवायला रंगात रंगुंनी रंग आपला वेगळा,
मला तर वाटत सुखी होण्यासाठी बिनधास्त वापरावा हाच फॉर्म्युला..!!
आधार मिळतो म्हणे जीवाला भावनिक संकटांच्या वेळी सावरायला,
लहान का असता तुम्ही येत नाही का स्वतःच्या गोष्टी स्वतः आवरायला..!!
खरंच असत का प्रेम मैलाचा दगड आणि टिकणार शाश्वत चिरकाल,
गेलेत ते दिवस कायमसाठी राहिल्यात त्या फक्त आठवणी आजकाल..!!
एकचं तर जीव असतो आपल्याकडे का तो कुणाला लावून फसायचं,
घरचंच का कमी असतं त्यात दुसऱ्याचं घोड फुकटच पोसायचं..!!
धन्यवाद देतो बाप्पाला त्याने ठेवलंय मला "पुन्हा" प्रेमात पडण्यापासून दूर,
पण बघून दोन चिमण्या जीवांना आजही मनात का बर उठतो काहूर..!!
आमोल घायाळ
जीव घेवून गेले ते घारे डोळे
जीव घेवून गेले ते घारे डोळे
एक अनपेक्षित भेटीसाठी चालले होते सर्व चाळे
भेट होती नेरुल स्टेशनला ठरलेली
कोण पोहोचेल अगोदर त्यासाठी शर्यत चाललेली
मी होतो पनवेल स्टेशनावर
पकडायची होती ११.४२ ची सि एस टी
मेगा ब्लोक असल्यामुळे झाली ती रद्द
पण मी मात्र होतो भेटीसाठी पूर्णपणे सज्ज
१२.०५ ची सि एस टी पकडून पोहोचलो मी ४ नंबर फलाटावर
ती माझ्या आधीच पोहोचलेली होती दोन नंबरवर
तिने हाय केले न हेल्लो अस वाटलाच नाही कि आहे पहिली भेट
म्हणाली मला लगेच पोहोचायचं आहे घरी थेट
तिला थांबवण्यासाठी काही वेळ सोबत घालवण्यासाठी मी केला प्रयत्न खूप
ब्यागेतील सामान दाखवून , चोकलेट देवून , नको नको ते करून थांबवू पहिले खूप
१२.३५ ची ठाणे लागली होती घाई घाईत गेली तिच्यात बसून
हीच होती ती माझी अनपेक्षित भेट जिचे होते घारे डोळे
जीव घेवून गेले ते घारे डोळे
एक अनपेक्षित भेटीसाठी चालले होते सर्व चाळे
आमोल घायाळ
एक अनपेक्षित भेटीसाठी चालले होते सर्व चाळे
भेट होती नेरुल स्टेशनला ठरलेली
कोण पोहोचेल अगोदर त्यासाठी शर्यत चाललेली
मी होतो पनवेल स्टेशनावर
पकडायची होती ११.४२ ची सि एस टी
मेगा ब्लोक असल्यामुळे झाली ती रद्द
पण मी मात्र होतो भेटीसाठी पूर्णपणे सज्ज
१२.०५ ची सि एस टी पकडून पोहोचलो मी ४ नंबर फलाटावर
ती माझ्या आधीच पोहोचलेली होती दोन नंबरवर
तिने हाय केले न हेल्लो अस वाटलाच नाही कि आहे पहिली भेट
म्हणाली मला लगेच पोहोचायचं आहे घरी थेट
तिला थांबवण्यासाठी काही वेळ सोबत घालवण्यासाठी मी केला प्रयत्न खूप
ब्यागेतील सामान दाखवून , चोकलेट देवून , नको नको ते करून थांबवू पहिले खूप
१२.३५ ची ठाणे लागली होती घाई घाईत गेली तिच्यात बसून
हीच होती ती माझी अनपेक्षित भेट जिचे होते घारे डोळे
जीव घेवून गेले ते घारे डोळे
एक अनपेक्षित भेटीसाठी चालले होते सर्व चाळे
आमोल घायाळ
ती एक नाजूक परी.
त्या पहिल्याच भेटीच्या रिमझिम पावसात
तुझे हात माझ्या हातात गुरफटले होते ...
आपल्या त्या निर्णयावर त्या पावसानेही
जणू फुलांचे टपोरे थेंब सोडले होते ...
मनात माझ्या तुझ्याच तर ,
प्रेमाची छाया ''प्रतिबिंब'' आहे....
मग मी तुला विसरेन तरी कसा,
माझे अस्तित्वच तुझ्यात ''वसले''आहे ....!!
मनाच्या नाजूक तारा झेडणारी,
ती एक नाजूक परी........
चूक तिची न माझी पण,
मनाला "जखम" झाली खरी..
तुझे हात माझ्या हातात गुरफटले होते ...
आपल्या त्या निर्णयावर त्या पावसानेही
जणू फुलांचे टपोरे थेंब सोडले होते ...
मनात माझ्या तुझ्याच तर ,
प्रेमाची छाया ''प्रतिबिंब'' आहे....
मग मी तुला विसरेन तरी कसा,
माझे अस्तित्वच तुझ्यात ''वसले''आहे ....!!
मनाच्या नाजूक तारा झेडणारी,
ती एक नाजूक परी........
चूक तिची न माझी पण,
मनाला "जखम" झाली खरी..
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)