सोमवार, १९ सप्टेंबर, २०११

आनंदाला आता जास्त.. हृदयात जपता नाही येणार.

कडू गोड आठवणी तुझ्या...
मनात अजून हि फुलत आहेत..
तिथे त्यांना बहर येऊन...
हृदयात अजूनही झोका झुलत आहेत.


तू नाक मुरडायचे..
अन मी स्मित हास्याने स्वागत केलेले..
असे नाते आपले...
दोघांनी हृदयात जतन केलेले..


आनंदाला आता जास्त..
हृदयात जपता नाही येणार.....
कारण दु:ख कधी आघात करेल...
सांगता नाही येणार..


आता सतावतील काही...
माझ्या सोबतचे क्षण तुला..
जसे जागवत असतात ते..
रात्र भर मला..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा