सोमवार, १८ जुलै, २०११

हवं असतं कुणीतरी .........

हवं असतं कुणीतरी तुमच्याशी भांडणारं
भांडल्यावर देखील तुमच्या
वाट्यात वाटा मागणारं
हवं असतं कुणीतरी
तुमची वाट पाहणारं
तुम्ही रागावुन गेल्यावर
ओले डोळे टीपणारं
खरंच असावं कुणीतरी…
खरंच असावं कुणीतरी
कडाडुन भांडणारं
सारं भांडुन झाल्यावर
मायेनं बिलगणारं

आला आला श्रावण आला..

बहरेल माझे आयुष्य..
माझ्या हातात तुझा हात दे..
करू प्रत्येक स्वप्न पूर्ण जीवनात..
प्रत्येक वळणावर तू अशीच साथ दे..

आला आला श्रावण आला...
घेऊन पुन्हा हर्ष नवा..
पक्षी गाती गीत नवे ..
झाडांवरती फुलती थवे...
 .


पावसाचे धरणीशी नाते,
आहे किती विसंगत...
एकमेकांशी दूर राहून हि...
फुलून येते एका थेंबात...


आज पावसाने खरच,
एक गम्मत केली...
स्वतःच्या थेंबानी भरलेली नदी...
स्वतःच वाहून नेली..



घन आभाळीचा तडकावा..
मातीस मिळावा शिडकावा..
झाडावरती पुन्हा नव्याने..
हिरवा रंग फडकावा..



विसरू नको रे आई बापाला..
झीझवली ज्यांनी काया...
मिळणार नाही वेड्या..
आई बापाची माया..

श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे

प्रत्येक झाड डोलू लागले..
नव्या या पालवीने..
हे सुंदर सुख आणले आहे.
बरसणाऱ्या पावसाने...




श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे

वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे

झालासा सूर्यास्त वाटतो, सांज -अहाहा तो उघडे
तरुशिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते

फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजूळ पावा गाई तयांचा श्रावण महिमा एकसुरे

सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला

सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती

देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत

जळत रहातो पाऊस

आता आत बाहेर जळत रहातो पाऊस
पुन्हा जखमा ओल्या करत रहातो पाऊस

तुझ्या आठवात कधी तुझ्या विचारात
गाणं तेच तेच म्हणत रहातो पाऊस

चाहूल न लागे , जोवर तुझ्या पावलांची
कसा नभातच झुरत रहातो पाऊस

किती तुज स्पर्शिल्या, अन किती पळ हुकल्या
हिशेब धाराधारांचा करत रहातो पाऊस

तुला न्यायचे पार त्या ढगांचा गावी
कल्पनेत आतल्या आत भिजत रहातो पाऊस

पण पाहुन तव हात , हातात माझ्या
कसा डोंगरा आडूनच परत जातो पाऊस

सोडून तू गेलीस मज, त्या दिवसापासून
मृगातच हस्तासारखा पडत रहातो पाऊस

तुला निभवता नाही आले प्रेम त्या फुलाचे
चिखल चेहर्यावर उडवत रहातो पाऊस

अरे आता बरसणे नाही रे पूर्विसारखे
पांपण्यांवर मेघ ठेवून रडत रहातो पाऊस

हे नाते मैत्रीचे

माझ्या पासून दूर जाताना..
एक वचन देऊन जा...
माझे डोळे बंद होतील तेव्हा तरी...
मला शेवटचे पाहून जा.


तू होकार दिला असतास तर...
आयुष्य नक्कीच वाढले असते...
पण तुझ्या नकाराने...
ते तिथेच संपून गेले.


मुसळधार पावसात..
ती सोबत असावी...
दोन हृदये एक होऊन...
पावसासोबत बरसावी...


पहिल्याच भेटीत तुझे डोळे,
माझ्या डोळ्यांशी बोलत होते...
शेवटच्या भेटीत मात्र...
ते लपंडाव खेळत होते...



आकाशातील इंद्रधनुष्य,
असते सप्त रंगात रंगलेले ..
माझ्या प्रियेचे जीवन असू दे..
त्या इंद्रधनुच्या रंगात रंगलेले..



काहीसे वेगळेच असते,
काहीसे वेगळेच असते,
हे नाते मैत्रीचे ..
अनोळखी अशी मने...
एकमेकांना वाटतात आपलेसे..
अनोळखी अशी मने...
एकमेकांना वाटतात आपलेसे..