बुधवार, २ नोव्हेंबर, २०११

सहनशिलतेचा येथे संग्राम आहे

सहनशिलतेचा येथे संग्राम आहे
समाजात माथेफिरुंचा सरंजाम आहे


गवताची पाती सजली भयाण राती
काजव्यांचा सूर्यास जणू शाप आहे


शुरतेचे निशान फडकते रणांगणी
पाठीत खंजीर खुपसणार्‍यांचा धाक आहे


यल्गाराचा दबला आवाज येथे
उगाच खोट्यांचाच चित्कार आहे


जरी आज भयाण शांतता इथे
येणार उद्या मोठ वादळ आहे

शहारलो मी बरसल्यावर

शहारलो मी बरसल्यावर
पाहुन तुझे ओले ते अंग
ढगांच्या धुसर राज्यातून
स्वप्न परीचाच तो मोहक संग

नाते आपुले वेगळे
सभोवताली ऊधळले होते
सृष्टिचे ते मोहक रंग
मात्र मी बरसण्यात अन तू
मला झेलण्यातच आपण दंग

म्हणायची कायम तू
बरस रे मेघा.. आता बरस तू
कर ओलेचिंब मजला
तुझ्याच मिठीत कर मज दंग

कवयत्रीच तू, मी काय बोलणार
बरसताना मात्र, ओलाव्यात मी
तुझ्या ओठांचाच वेध घेणार
ओलावा देवून त्यास मी हि चिंब होणार

रात्र तुझी , माझे सर्वस्व ही तुझेच

उशीरा येण्याची आता तुझ्या,
सख्या सवय झाली आहे
तरी टेबलावर जेवण
अन दारावर डोळे ठेवून
मी पुन्हा तुझीच वाट पहात आहे

अश्यातच ... आयुष्याच्या पानावरती
नव्यानेच लिहिलेले काही क्षण
मन पटलावर पुन्हा एकदा
थैमान घालू लागले..

अन विचारांच्या वादळात
अनेक अनुत्तरीत प्रश्न
पुन्हा एकदा ह्रदयाच्या दारावर
अस्त व्यस्त पणे धडकू लागले

का रे सख्या असा करतोस ?
माझाच असताना तू
प्रेम विसरुन फ़क्त क्षणीक सुखांसाठी
मज अवेळी बिलगतोस

रात्र तुझी , माझे सर्वस्व ही तुझेच
पण फ़क्त शरीरा साठीच
तुझे काही क्षण मजपाशी असणे
मला आता बोचते रे

तरी या स्त्रीचे हे विडंबन
सहन करीत मी
तोंडावर ताबा अन
दारावर डोळे ठेवून
पुन्हा तुझीच वाट पहात आहे
पुन्हा तुझीच वाट पहात आहे

दीपावलीच्या मनःपूर्वक लाख लाख हार्दिक शुभेच्छा ......!!

समृध्दीच्या कणाकणात सजावी, नटावी दीपावली......!!
हासत, नाचत, गात यावी दीपावली......!!
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,....!!
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे......!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे.......!!
शुभेच्छांच्या समृद्धीने अवघे अंगण तुमचे भरावे........!!
!! शुभ दीपावली !!
तुम्हाला व तुमच्या परिवाराला दीपावलीच्या मनःपूर्वक लाख लाख हार्दिक शुभेच्छा ......!!

काही काळ भेटलो आपण...

काही काळ भेटलो आपण...
एक नवीन नातं जोडायला...
आपण तूटलो तरी...
ते कधीच जमलं नाही तोडायला..



भेटायचंय तुला एकदा...
अन खुप भांडायचं आहे...
खांद्यावर तुझ्या डोके ठेऊन...
मला थोडं रडायचं आहे



तू पण आठवतेस का ग मला.....
मी जसा आठवतो तुला वेड्या सारखा....
सोबत तू नसलीस तरी हि....
मी सोबत असतो तुझ्या सारखा......