आजची संध्याकाळ...
काही वेगळीच वाटतेय...
तुला पुन्हा भेटायची...
आशा मनात दाटतेय...
शब्दाच्या या जाळ्यामध्ये...
गुरफटून गेलो असा...
समुद्रातील मासा..
जाळ्यात अडकतो जसा...
आज कुणास ठाऊक का ..?
माझे शब्दच हरवून गेलेत..
भूतकाळातले काही क्षण..
पुन्हा परतून आलेत..
पुन्हा एकदा जगण्याची...
आस देऊन गेले कुणी तरी...
पुन्हा एकदा जाता जाता..
"मृगजळ" दाखवून गेले कुणी तरी..
तू आठवण काढताच माझी..
मला उचकी लागते...
दोघांना हि आठवण आली कि..
आपली भेट होते..
जीवनाची श्री गणेशाने होते सुरुवात..
हे राम ने होतो शेवट,
परंतु मध्यंतरीच्या काळात असते..
कृष्ण कृत्याचं सावट...
कवितेच्या प्रत्येक ओळीत..
तुझ्या सोबतचे क्षण गिरवतो..
तुझ्या रोजच्या बोलण्यातही..
कवितेच्या ओळी जुळवतो..
प्रत्येकाचे अक्षर वळणदार नसते.
प्रत्येक जन सुंदर लिहितोच असे नाही..
तुम्ही लिहिताना काय लिहिता या पेक्षा...
तुम्ही लिहिलेले किती समजते हे महत्वाचे...
रात्रीचे चांदणे लुकलुकतय आभाळी..
सुंदर अशी चंद्रकोर हसतेय गाली..
थंड गार वाऱ्याची येतेय हळूच झुळूक..
एक पावसाची सर येऊन वाऱ्याला देतेय चुणूक.
जीवनातील प्रत्येक आठवण..
एका भरोश्यावर स्थिर असते..
म्हणून प्रत्येक क्षण मनापासून जगवा ....
त्यावर जास्त दडपण येताच आठवणींना चीर जाते.
चराग जलता तो जलने दो..
कोई याद आता हें तो आने दो..
गम के साये तो परछाई बने फिरते है..
अभी ईन गमो के ही हम ज्यादा पास राहते है.. ..
आज आकाशातील चंद्र.
काहीसा रुसलेला वाटतोय,
नभा आड दडून तो...
कुणासाठी रडतोय...
शब्दांच्या पावसात..
मन चिंब भिजून जाते...
उमगलेले सर्व काही...
शब्दांमध्ये वाहून जाते..
आमोल घायाळ