सोमवार, २२ ऑगस्ट, २०११

पाउस आला धो धो धो

पाउस आला धो धो धो
पाणी वाहील सो सो सो
पाण्यात बोट सोडली सोडली
दुबकन जाऊन बुडली बुडली
बोटीवर बसला बेडूक
तो म्हणाला
डराव डूक डराव डूक

आरशात दिसणारं माझं प्रतिबिंब..

शरीराच्या नकाशात
मनालाही तिथकेच स्थान..
हृद्यात जे साठविले आहे..
त्यावर आधी त्याचाच मान..


मला कधीच जमले नाही..
माझ्या भावना ओठावर आणायला..
अन तुला हि खुप उशिर लागला..
त्यांना ओळखायला.

तुझ्या नाजुक ओठांवर..
तो पावसाचा थेंब तरळणारा..
मला तुझी ओढ लावतो..
तुझा स्पर्श मोहुन टाकणारा.


तुला भिजलेली पाहीले..
की पाऊसही गालात हसतो..
तु त्याला प्रतिसाद दिलास..
कि ढगांचा कडकडात होतो..


आज माझंच मन..
मला काही इशारा करतयं..
तुझ्या आठवणीत मला छळतंय़..
की तुला माझ्या जवळ ओढतयं..

आरशात दिसणारं माझं प्रतिबिंब..
आता तुझ्यात एक होऊन दिसते..
त्या निर्जिव आरशालाही प्रेम कळ्ते..
की तिथेही माझं मन फसते..


तुझे खळखळून हसणे..
अन त्यात माझं मन फसणे..
रोजचेच झाले हे..
खेळ तुझे जिवघेणे..

हॄद्यात माझ्या झाकून...

आरतीच्या ज्योतीत प्रेमाच्या औक्षणात सखे
कधी येतो मायेचा ह्या धाग्याच्या अतूट बंधनात
बहिणीच जतन ,भावाचं रक्षण अवीट गोडीचा सोहळा
उभा श्रावणही सामील भावा-बहिणीच्या आनंदात


रातरानीच्या सुगंधाने..
रात्र सारी मोहरुन गेली.
पौर्णिमेच्या चांदण्याने..
सृष्टी सारी सजून आली..

तुझा निरोप घेतला तरी..
पाऊले तिथुन हलत नाहीत..
तुझीच वाट पाहत असतात ते..
पण तू आता पुन्हा मागे वळत नाहीस..

मैत्री म्हणजे फुल प्राजक्ताचे..
फुलले की जिवन सुगंधी करणारे..
मैत्री म्हणजे काटे गुलाबाचे..
कितीही टोचले तरी सदा संरक्षण करणारे..


हॄद्यात माझ्या झाकून...
मनात तरंग उठवतेस..
होणारी ती चलबिचल पाहून..
गालात खुदकन हसतेस..

हे नात प्रेमच हे नात विश्वासच

रिम झिम पावसात भिजल्यावर..
मन चिंब चिंब होऊन जाते..
मनाला ही मग पंख फुटुन..
आकाश विहार करावे वाटते..



हे नात प्रेमच हे नात विश्वासच
नाजूक धाग्याला बांधलेल्या मजबूत गाठीचं

हे नात पूजेच तेल आणि पणतीच
मांगल्याच प्रकाश देताना जळणा-या वातीच

हे नात फुलंच माती आणि पाण्याच
काट्यांना मागे सारून उमलना-या काळीच

हे नात प्रकाशाच उजळणा-या दिशाच
बाहेर पडणा-या किरणांना वाट दाखवणा-या समईच

हे नात आकाशच आकाशातल्या ढगांच
पाऊस होऊन मिसळणा-या मातीमधल्या सुगंधाच

हे नात मनाच ओवाळणा-या हातांच
ओवाळताना ताईच्या डोळ्यात जपलेल्या भावनांचं

डोळ्यात डोळे घालून माझ्यात

हे मला हि कळतंय,

तुझ्या बोलन्यातला राग दुखावतोय

आणि उफासाने मन जळतंय.

एक दिवस असा होता

जेव्हा तू माझ्या मागू फिरायचिस,

माझा प्रत्येक शब्द

फुलासारखा झेलायचिस.

मला एकदा बघण्यासाठी

तासन तास वाट बघायचीस,

डोळ्यात डोळे घालून माझ्यात

स्वतःला त्याल बघायचीस,

पण आज का कोण जाणे

हे साराच बदलय,

माझ आस काय चुकल कि

तुझ माझ्यावरच प्रेमच संपलय,

मला जे समजायचं

ते मला समजलंय

आज तुला मी नकोय

हे तुझ्या वाग्न्यातच जाणवलंय,

तरी त्यातच तुझ सुख असेल

तर माझी काहीच तक्रार नाह.

पण तरी मनात कुठे तरी वाटतय

तुलाही कधीतरी माझी आठवण नक्की येईल.

मला एकदा बघण्यासाठी

तुझ मन आतुर होईल,

पण तेव्हा तुला सावरायला,

मी तुला दिसणार नाही

कारण तुझ्या पासून दूर होऊन

मी जास्त दिवस जगणार नाही.

आठवते आपली ती पहीली

आठवते आपली ती पहीली
भेटएकमेकांकडे बघण्यासही लाजलो होतो
हळूहळू नजर एकमेकांकडे वळताच
आपण जागेपणीच निजलो होतो
आठवते आपली ती पहीली
भेटतुझं ते पावलोपावली अडखळणं
तेवढचं एक निमित्त पाहून
तुजपाशीमाझं आधार देण्यासाठी वळणं
आठवते आपली ती पहीली
भेटपुन्हा भेटण्यासाठी किती आतूर झालेलो
तेव्हा म्हणालीस तुझ्या जिवनातमी
एक खास भेट म्हणून आलेलो
आठवते आपली ती पहीली
भेटमन कसं चंदना सारखं दरवळलं होतं
स्वप्नांचे कोवळे दव झेलतमनात
प्रेम कसं हिरवळलं होतं
आजही ती पहीली भेट
माझं मन गच्च धरुन आहे
जरी नसलो तुझ्या कपाळावर
तरीतुझ्या अंतरी ऊरून आहे...

सांगायचे होते तुला काही... राहूनच गेले.

पाऊस असतोच भिजायला
सख्या छत्रीशिवाय हिंडायला .
हात हातात आला कि
...ओल्या मिठीत शिरायला !!!!


सांगायचे होते तुला काही...
राहूनच गेले.
मनातले गुपित ओठांवर आणायचे ..
राहूनच गेले.
तुझ्या सहवासात असतांना,
तुला एकटक न्याहाळतांना,
तुझ्याच विचारांत स्वतःला विसारतांना,
तुझ्या सोबत जगायचे..
राहूनच गेले.
तू रागावशील, सोडून जाशील,
मैत्रीचा धागा तोडून जाशील.
माझे जीवापाड प्रेम व्यक्त करायचे..
राहूनच गेले.

तुझ्या आठवणीत रोजचं जळून सखे

तुझ्या आठवणीत रोजचं जळून सखे
एक दिवस चिता मला जवळ घेईल,
तुझ्यासाठी रंगवलेल्या प्रेमाची स्वप्ने
अतृप्त मनाने माझ्यासोबत नेईल..!!

का नाही ग समजत तुला कधी
माझ्या अंतरीची निशब्द तळमळ,
असलो वरून जरी शांत संयमी
तरी मनमंदिरी सदा खळखळ..!!

डावलून सखे मला तू कायमसाठी गेलीस
सांग माझा अपराध वागलीस अशी परखड
विचार करून आता विचारही हा शिणला
निववू कसे ह्या धुपणाऱ्या मनाचे कढ..!!

तुझा तळवा माप ओलांडेल माझ्या घरचं
असं धूसरही नाही भासत आता हे प्राक्तन,
घाव जरी घातलास तू हा जिव्हारी माझ्या
भळभळनाऱ्या जखमेचं करीलं मरणांती जतन..!!

तू माझ्या जवळ नसतेस

माझ्या डोळ्यांची नझर तुला,
कधी कळलीच नाही..
कितीही प्रेम केले तरी
तुला ते उमगलेच नाही..!

नाते तुझेन माझे साताजन्मीचे,
जसे आकाशाशी इंद्र धनुश्यांचे..
समुद्राशी जसे किनाऱ्याचे,
अन तारयांशी जसे चंद्राचे..!


तू माझ्या जवळ नसतेस
असे कधी होतच नाही...
तुझ्या स्वप्ना शिवाय तर
माझे डोळे काही बगतच नाही..!!


माझे डोळे बघतात नेहमी
तुझ्याच सहवासाचे स्वप्न...
ह्या मनाला तरी काय सांगू
ते असते तुझ्यातच मग्न...!!

भाऊ बहिणीच्या नात्याला..

नसोत कधी बंध या आमच्या..
भाऊ बहिणीच्या नात्याला..
फुलो वसंत सतत तिच्या दारी..
असे सुख लाभो माझ्या लाडक्या ताईला..

तुझ्यावर कविता करावी तर

तुझ्यावर कविता करावी तर
योग्य शब्द सापडत नाहीत.
आणि जे कांही सापडतात ,
ते तुझ्यासाठी पुरत नाहीत.

तुझ माझ्यावरच प्रेम शब्दात सांगाव
तर शब्दही मुके होतात.
पण तुझ्यासमवेत तेच शब्द
स्पर्शातून बोलू लागतात.

माझ्यावरचा तुझा विश्वास
माझ्या प्रत्येक श्वासात आहे .
विश्वासाशिवाय जगण म्हणजे
श्वास कोंडून मरण आहे .

तुझ्याशिवाय माझ जगण
आत्म्याशिवाय शरीर आहे.
समजून घेतलस मला तू
म्हणून तर माझ जगण आहे.!!!!!!!

तुझे नी माझे नाते काय? …

तुझे नी माझे नाते काय? …
तु देणारी मी … मी घेणारा
तु घेणारी … मी देणारा
कधी न कळते रुप बदलते
चकाचे आवर्तन घडते
आपुल्यामधले फरक कोणते?
अन आपुल्यातुन समान काय ?….
तुझे नी माझे नाते काय? …
सुखदु: खाची होता व्रुष्टी
कधी हसलो, कधी झालो कष्टी
सायासाविन सहजची घडते
समेस येत टाळी पडते!
कुठल्या जन्माची लय जुळते?
य मात्रान्चे गणित काय?
तुझे नी माझे नाते काय

प्रेम जर एकीवर असेल तर

प्रेम जर एकीवर असेल तर रक्षाबंधानला घाबरू नका
खुशाल फिरा रस्त्यावर राखीला नाही म्हणू नका

बांधून घ्या राख्या कितीही तुम्ही हातात
एक नाही बांधणार जी आहे तुमचा मनात

का घाबरता तुम्ही इतरांच्या राखीला
धोका तर देत नाही ना प्रियसीच्या प्रेमाला

हीच खरी परीक्षा असते आपल्या प्रेमाची
जर नाही निघाला घर बाहेर ती हि नाही राहणार तुमची

पुढच्या वर्षी मग तीच बांधील तुम्हाला राखी
जास्तीच्या मोहामुळे एकही नाही राहणार सखी

मी तुझ्या मागे वेडा नव्हतो

मी तुझ्या मागे वेडा नव्हतो
पण मला तुझ्याशी बोलयला आवडायचे
मी तुला आपलुकीने सर्व विचारायचे
पण तुला ते बंधन वाटयचे
तुझ्या स्पर्शाने मला कधी मजा नाही आली
पण तुझ्या स्पर्शाने मला सुख जाणवायचे
तुझ्या मनात काय होते ते मला नाही कळायचे
पण तुझे वागणे तीरस्कारासारखे वाटायचे
मी शांत राहिलो कि तुझे सारखे बोल बोल करायचे
पण त्यात हि गप्प राहणे मला शहाण्यासारखे वाटायचे

साथ योग्य असेल साथीला

वसंताची कोकीळा का ग हि शरमिंदा
भुलली जणू ती जेव्हा छेडलीस तू तान,
मंजुळ सुरावटी सखे तिलाही पाडतात कोड
गर्वहरण जिथे कोकिळेचं................
राहिलं कसं बर ह्या सख्याला भान..??

मनाने घेतलं मनावर एकदा
नाही जायचं तिच्या आठवणींच्या गावा,
पण मनंच ते मनमानीचं वागणार
धाडलाचं फिरून त्याने आठवणींचा थवा..!!


साथ योग्य असेल साथीला

तर मैफिलीला रंग येतो.

शब्दही छान असतील जोडीला

तर गाण्याला छान सूर लागतो !!!!!!!!!