सोमवार, १५ ऑगस्ट, २०११

माझी आई... माझ्या सुखातच..

माझी आई...

माझ्या सुखातच..
असते तिचे सुख...
मी दुखी असताना..
ती ही होते दुखी..

चुलीवरच्या तव्यावर..
पोळलेले तिचे हात..
शब्बाशी देताना..
ती थोपटलेली पाठ..

चूक होताच..
रागाने मारलेले फटके..
चुकीचे कधी बोललो..
कि गालावर दिलेले चटके..

कितीही रागावली तरी..
प्रेमाने घेतलेली पापी
उशीर झाला यायला.
तर कधिच गेली नाही झोपी.

सारया चुकांना माझ्या..
स्वत:च्या पदरात घेई..
अशी ममतेचा सागर..
ती माझी आई...

ओठात तेच लपवावे जे बोलता येत नाही..

तो श्रावणातला पाऊस..
अजूनही आठवतो मला..
तुझ्या संगे चाललेल्या त्या क्षणांनी..
पुन्हा भिजवून जातो मला..



ओठात तेच लपवावे जे बोलता येत नाही..
डोळ्यात तेच जपावे जे दाखवता येत नाही..
तुझ्या माझ्या नात्याला जप असे की..
दुर जरी असलो तरी दुर पाठवता येत नाही..




सारया चुकांना माझ्या..
स्वत:च्या पदरात घेई..
अशी ममतेचा सागर..
ती माझी आई...




तुझा आवाज कानी पडता..
पाय त्या दिशेने वळतात..
तू समोर दिसताच मग..
हात तुला मिठीत घ्यायला सरावतात..


तिला आवडतो पाऊस, मला आवडते पावसात भीजणारी ती.

तिला आवडतो पाऊस, मला आवडते पावसात भीजणारी ती.
तिला आवडते बोलायला, मला आवडते बोलताना ती.
मला आवडते ती, पण तीला आवडत नाही मी.
मग खड्यात गेला पाऊस, अन् खड्यात गेली ती.


प्रत्येकाच्या हृदयात आठवणीचं सये
हमखास एक मोरपिसं लपलेलं असतं
ती नजरेआड होते तेव्हा समोर अन
ती सामोरी आल्यावर ते लपलेलं असतं

कविता कुणाची ती माहिती नाही .

वाचलंय कुठे तरी,
कविता कुणाची ती माहिती नाही ...
पण कवितेत बरच काहीस स्पष्ट केलय
तेच स्वतःशी थोड जुळवून बघितलंय ....

"कोणावरती प्रेम करण हा वेडेपणा ..."
वेडेपणा हा मी करून पाहिलाय ....

"कोणीतरी आपल्यावर प्रेम करण ही भेट ....."
सुंदरशी ही भेट सुद्धा मी स्वीकारलीये ....

"जो आपल्यावर प्रेम करतो त्याच्यावर प्रेम करण हे कर्तव्य ....."
जमेल तेवढ कर्तव्य मनापासून पार पाडण्याचा प्रयत्न सुद्धा केलाय ....

"तर आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याने आपल्यावर प्रेम करण म्हणजे **आयुष्य**"
आणि बस .....
इथेच ... आणि हेच गमावून बसलो .... काय ... तर ...# आयुष्य #...

आज पावसाने... उन्हावरही मात केली..

तू पाहतोस चेहऱ्याकडे सख्या ,पण नजर रे आरपार होते

तुझ्या भेटीपायी मग ,काळीज बघ पेटून उठते.

गर्दी असते रे भावनांची ,पण मन येऊन तुला बिलगते

तेंव्हाच सख्या एकांत मिळाया..लज्जेची ओढणी मी ओढून घेते !!!!!!!!!!!!




आज पावसाने...
उन्हावरही मात केली..
उन्हात पाऊस पावसात उन,
अशी लपंडावची खेळी..

तुला पुन्हा भेटलो तर..

तुला पुन्हा भेटलो तर..
माझ्या मनाला आवरने कठीन जाईल..
अन तूझ्या भिजलेल्या डोळ्यांना..
सावरने कठीन जाईल..

मनापासून प्रेम करणा-याच आसाच होत असत
डोळ्यातल्या भावना तोंडापर्यंत येऊनही बोलण्याच धाडस होत नसत

न जुळलेल्या नात्याला एवढे जपायचे असते
न जुळतच तुटेल म्हणून सांभाळायचे असते

आशा सांभाळण्याचे काय बरे साधणार
डोळ्यातले भाव तुमच्या कधी तिला सांगणार

साद तुमच्या प्रेमाला मिळेल किवा मिळणार नाही
किमान गप्प बसण्याची खंत तरी राहणार नाही

आग आहे प्रेम दुसरी काय उपमा द्यायची
जाळूनही यात नसते राख होऊ द्यायची

कडाडणारया ढगांना.. कुणीतरी समजवा..

रातराणीला का रे सख्या

अत्तराची गरज असते?

कस्तुरी असता तिच्याच नभी

का ती सुगंधात न्हाऊन येते ?

युं तो बहोत ऐतबार किया उसपर मगर
सोचता हु क्या हासील किया अब तक ?
किये थे वादे कभी साथ जिने के कभी उसने
कत्ल हो गये हम उन्हे ये खबर नही अब तक............



शब्दांच्या जगात..
मनसोक्त उडून घ्या..
जिवनातील हे सुखद क्षण..
पुन्हा एकदा जगून घ्या..


मला एकदा थेंब व्हायचंय...
आभाळातून झर झर कोसळायचयं..
जमिनीवर बरसून मग..
तिच्यातचं विरुन जायचयं...

कुसं बदलेलं आता निसर्ग सारा
बरसतील प्रेमाच्या बेधुंद धारा
नखशिखांत भिजेल ती धरा अन
सुगंध त्या मातीचा पसरवेल वारा


आभाळ सारं आज..
गेलयं तारयांनी सजून..
चंद्र मात्र एकटा..
चांदणीची वाट पाहतोय दुरुन..


तुझ्या माझ्या प्रेमाने..
बहरेल सारं अंगणं..
भर दिवसा सजेल..
चंद्र चांदण्यांच चांदणं..

कडाडणारया ढगांना..
कुणीतरी समजवा..
कडाडण्या पेक्षा बरसने बरे..
हे त्याला उमजवा..

पाहतो तुला मी चहुकडे चहुकडे

पाहतो तुला मी चहुकडे चहुकडे

गडे ...पाहतो तुला मी चहुकडे चहुकडे
आज रातराणीचा सुगंध दरवळे...

तु मला भेटता स्वप्न वाटे खरे
तु मला स्पर्शिता अन् वाटे बरे
भेटलीस... तु जरि, आहेत अडखडे...

प्रीत माझी खरी हा विसावा खरा
येथल्या धुंद राती राहती घरा
पावले ..का चालती तुझ्या कडे...

सैल होता तुझी ही मिठी जरा जराशी
चंद्र जातो निजेला
आभाळी उशाशी
सांगना ..स्वप्न माझे तुला कसे आवडे....

तु येण्याचा होता आभास हा
तु असण्याचा होता जरि भास हा
प्रेम हे ..ना समझे ना कधी उलगडे...

मजा आहे खरंच छोट्या छोट्या गोष्टीवरून तिच्याशी भांडण्यात

सोनियाच्या पावलांनी होतं माप ओलांडलं लाल महाली
भोसल्यांची स्नुषा सखी राज्ञी म्हणून दरबारी मिरवली,
शिवाच्या छाव्याची जी कर्तव्यदक्ष लाडकी "येसू" जाहली,
मराठ्यांच्या इतिहासात आणखी एक सोशिक कट्यार निपजली..!!


मजा आहे खरंच छोट्या छोट्या गोष्टीवरून तिच्याशी भांडण्यात
मजा आहे तिच्या रागावलेल्या चेहऱ्याकडे एक सारखे बघण्यात
तसं रोजच्याच पठडीतल आयुष्य जगत असतात इथे सारे....
मजा आहे चाकोरीबाहेरच आयुष्य तिच्यासमवेत जगण्यात ......


दैव शंभूचं दुरावलं सईबाई मासाहेबांना लेकरू,
राणीवशाचा पदर छोटा जोडली भाग्याने धाराऊ,
रुद्राचा कमनशिबीपणा मुकत गेला आप्तस्वकीयांना,
आभाळ फाटलं जेव्हा निवर्तल्या थोरल्या आऊसाहेब जिजाऊ..!!

*काय म्हणालात तुम्ही कधीच प्रेम केलं नाही?

काय म्हणालात तुम्ही कधीच प्रेम केलं नाही?

प्रेम केलं नाही?
*काय म्हणालात तुम्ही
कधीच प्रेम केलं नाही?

अहो कशावर प्रेम कराव?
विचारता कोणी प्रेम कराव?
अस का घाबरता राव?
ते म्हणतात प्रेम कुठेही कराव!

कशासाठी प्रेम कराव?
सांगा प्रेमाशिवाय कस जगाव?
मी तर म्हणतो प्रेम केलं नाही ?
फार काही बिघडल नाही!

केल्या नाही चार कविता!
मारल्या नाहीत गुलुगुलु
गप्पा?
घेतला नाही तिचा हातात हात
केला नाही धडधडणाऱ्या हृदयाने कधी घात?

प्रेम केल नाही म्हणून काही सुचलं नाही?
अहो लय नाही म्हणून काही लिहीलं नाही!
प्रेम केल नाही म्हणून काही अडल नाही!
आयुष्यात विशेष काही घडल नाही?

आता म्हणाल, वाचुनही काही समजल नाही!
खरच सांगतो प्रेम केलं नाही म्हणून काही बिघडलं नाही
काय म्हणता माझे लेखन आवडल नाही?
आता मान्य कराल का तुम्ही
कधीच प्रेम केल नाही?

मराठी माणसाच्या नादाला लागू नका...

अरे शांत बसलेल्या वाघाला दुबळा समजू नका.
फाडुन टाकेल तूम्हाला तो त्यांच्या वाटेला जाऊ नका.
आम्ही दिसतो साधे भोळे आमच्या चेहऱ्‍यावरती जाऊ नका.
करुन टाकेन तुकडे तुकडे मराठी माणसाच्या नादाला लागू नका...

उत्तुंग भरारी घेऊ या !मी मराठी ..... मी मराठी .....

उत्तुंग भरारी घेऊ या !

उज्ज्वल भविष्यासाठी
एकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी
दरिखोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी ..... मी मराठी .....

शिवबाची तलवार तळपली
महाराष्ट्र अस्मिता फडकली
संतांच्या अमृतवाणीने जीवन केले वैभवशाली
ऋषिमुनी अन् थोर तपस्वी कल्याणास्तव इथे जन्मले
आदर्शांचे अमोल लेणे या भूमीला देऊन गेले
युक्ती आणि शक्तीची पुण्याई येथे मोठी
एकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी
दरिखोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी ..... मी मराठी .....

गणाधीश नाचतो रंगुनी
नवरात्रीची अंबा भवानी
यळकोटाचा भंडार उधळी खंडोबाची आण घेउनी
वारकऱ्यांची सुरेल दिंडी
विठुरायाचे नाम गर्जते
समृद्धीची पावनगंगा भरून येथे नित्य वाहते
मनगटात यश अमुच्या आहे आणि किर्ती ललाटी
मी मराठी ..... मी मराठी .....

अभंग, ओवी, फटका, गवळण, धुंद पवाडा, धुंद लावणी
माय मराठी भाषा अमुची नक्षीदार भरजरी पैठणी
ज्ञान-कला-भक्ती-विद्येचे वैभव येथे सदा नांदते
जे जे अनुपम अभिनव आहे ते ते सारे येथे घडते
शिकवू आम्ही भारताला देऊन आव्हाने मोठी
एकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी
दरिखोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी ..... मी मराठी .....

घोर संकटे झेलून घेतील अमुचे अजिंक्य बाहू
काळाशीही झुंज देउनी सदैव विजयी राहू
जरी रांगडा बाणा अमुचा जीवास जीवही देऊ
अंगावर कोणी आले शिंगावरती घेऊ
साधे भोळी दिसतो परी गुण अमुच्या ठायी कोटी
एकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी
दरिखोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी ..... मी मराठी .....

महाराष्ट्र भू तुला मानतो सकळ जनांची आई
तुझ्या कुशीतुन सकळांसाठी अंकुरते अंगाई
संघर्षाचे शौर्य दिले तू धैर्य दिले जगण्याचे
तुझ्याच ठायी कृतार्थ व्हावे अवघे जीवन अमुचे
तुझाच जयजयकार असावा सदैव अमुच्या ओठी
दरिखोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी ..... मी मराठी .....

एक रस्ता.. तुझे माझे पावलांचे ठसे उमटलेला..

विदुषकाने हसवतच रहावे..
हिच लोकांची इच्छा..
तो ही मग पणाला लावतो..
आपल्या ह्र्द्यातील सारया इच्छा..

आयुष्य हे मजेशीर_

एकट्याचेच का बरं नसते_

न भेटणारी व्यक्तीच_

आयुष्यात का बरं येते_



एक रस्ता.. तुझे माझे पावलांचे ठसे उमटलेला..
एक वाट.. आपल्या सोबत चाललेली..
एक ढग... आपल्यावर बरसणारा..
एक वादळ.. तुला माझ्या मिठीत लोटणारं..
एक दु:ख.. तु सोबत नसल्याचे..
एक अश्रु.. पापण्यांमधून पाझरणारा..
एक शब्द.. तुझ्यासाठी पुटपुटलेला..
एक हाक.. तुझी तुझ्या जवळ आणणारी..
एक आरोळी.. तुझ्या प्रेमाला घातलेली..
एक मी... तुझ्यासाठी बनलेला..
अन
एक तू... माझ्यासाठी नसलेली.. :(

सगळ्या प्रेमकथांची सुरुवात

सगळ्या प्रेमकथांची सुरुवात
गोड बोलण्यानंच होते
सगळ्या प्रेमकथांची अखेर
मटार सोलण्यानंच होते!

प्रेमात दोघं असतात तेंव्हा
सगळं गुलाबी वाटत असतं
एकमेकांना प्रेमानं दिलेलं
पाणीही शराबी वाटत असतं
प्रेमकथांची सुरुवात अशीच
पाण्यानंही झिंगून जाण्यानं होते
प्रेमकथांची अखेर मात्र
(तळमजल्यावरून) बादल्या भरून आणण्यानं होते!

प्रेमाचा डाव रंगतो तेंव्हा
'हात' एकमेकांसाठी धरले असतात
दोघंजणं एकमेकांसाठी
राजा-राणी बनले असतात
प्रेमकथांची सुरुवात अशीच
एकमेकांसाठी 'हात' धरण्यानं होते
प्रेमकथांची अखेर मात्र
एकमेकांना झब्बू देण्यानं होते!

प्रेमामधे एकमेकांबद्दल
जे जे काही कळलं असतं
संसारात त्याच गोष्टींवरून
एकमेकांना छळलं जातं
प्रेमकथांची सुरुवात अशीच
कळूनही न कळण्यानं होते
प्रेमकथांची अखेर मात्र
छळून छळून छळण्यानं होते!

एकमेकांच्या वागण्यामधे
आपल्याला फक्त चुका दिसतात
एकमेकांच्या शब्दांमधे
चाबूक आणि बंदुका दिसतात
जे जे होणार नाही वाटतं
ते ते सारं घडत जातं
प्रेमकथेच्या शेवटी शेवटी
सारं सारं बिघडत जातं!

एकमेकांशी बोलत होत्या..

काल माझ्याच आठवणी..
एकमेकांशी बोलत होत्या..
काही गप्प होत्या..
तर काही छळत होत्या..

चारोळ्यांच्या जगात...
एक चारोळी रुसली..
मोठ व्हायचं होत तिला..
अन कवितेत जाऊन फसली.


चिंब या पावसात,
पहावे भिजून कधी.
धुंद या गारव्यात,
पहावे विरून कधी.
असे नभ झरताना,
पुन्हा धरा भिजताना.

आपल्या आयुष्याची गणिते सये
आठवणीने जुळवावी लागतात ...
सरते शेवटी हेच आयुष्य मग
आठवणीचा हिशोब मागतात

आता आठवणीं वरही .

आता आठवणीं वरही ..

आता आठवणीं वरही ..
मंदी चे सावट पसरले आहे..
रोज येणारी तुझी आठवण आता..
कधी कमी तर कधी जास्त येत आहे..

तुझी ती आठवण आहे.....

चंद्राकडे बोट दाखवून ती मला म्हणाली
तुझी ती आठवण आहे.....
तिचे बोट चांदण्यांकडे करून मी म्हणालो
हीं बघ तुझ्या आठवणींची साठवण आहे..

मी मलाच विसरून जातो..

प्रश्नांच्या या गुंतागुंतीत..
मी मलाच विसरून जातो..
उत्तरे तर पळत असतात माझ्यापासून दूर..
पण मी त्यात भारावून जातो..

"देवाचे आभार आहेत,

"देवाचे आभार आहेत,
कारण त्याने आश्रुंना रंग नाही दिले .............
नाहीतर रात्री भिजणारी माझी उशी,
सकाळी सगळकाही सांगून गेली असती !!"

तुम्हाला माहितीये का??

तुम्हाला माहितीये का??
जगात केवळ सातच आच्छर्य का आहेत
कारण 7 अक्षरे जेव्हा एकत्र येतात तेव्हा तयार होतात
FRIENDS....!!!!
FRIENDS....!!!!

तुला भेटायला येताना..

तुला भेटायला येताना.. मुद्दाम उशिरा येतो..

तुला भेटायला येताना..
मुद्दाम उशिरा येतो..
तेव्हाच तर तुझ्या नाकावरचा..
खोटा राग मनभरुन पाहत येतो..

कोण येत असेल झाडांना भेटायला ?

भरून आलास रे आभाळा तू
आज कर प्रेमाच्या सरींची बरसात,
धुंद चिंब होऊन जाईल हि धरती
जेव्हा लाभेल पावसात प्रियेची साथ..!!


चांदण्यांची साथ कधी अंधाराचा खेळ
झाडं विसावतात चंद्राच्या कुशीत,
पहाटेच्या सोनेरी बरसातीत न्हाऊन
दवाचे आनंदाश्रूही येतात बघ खुशीत..!!


अंधाऱ्या रात्री सख्या

कोण येत असेल झाडांना भेटायला ?

ज्याचा निरोप घेतल्यावर

दवाच्या रुपात पाने लागतात रडायला !!!!!!!!!!!!!!!!!!!!

पहाटवारा सांगत होता

पहाटवारा सांगत होता

गुज ते कळ्यांचे तिला
पहाटवारा सांगत होता
गंध मोगर्याचा उधळीत
केसात तिच्या रांगत होता

गुंतले सहज उकलून धागे
सोनेरी त्या प्रभात किरणांचे
उजळण्या रूप तिचे सूर्यास
त्या माथ्यावर बांधत होता

दारात वासुदेव बनून गात होता
छपरावरून अल्लड घसरत होता
फुलात कधी... तर बनात कधी
तो मोर पीसारा फुलवित होता

स्परशून त्या पापण्या अलगद
साखर झोपेस त्या जागवत होता
फुला पाणानवर दव बनून कधी
सदा फुलीला त्या लाजवत होता

नव्या दिसाचे नव्या उषेचे
नव नवे तोरण लावत होता
मी पुन्हा वाहणार असाच मना मनातून
रोजचाच-निराळा "पहाटवारा सांगत होता"

त्या वाटेवरच्या वळणावर...

त्या वाटेवरच्या वळणावर...
एकदा उभे राहून वाट पहा..
मी येणारया त्या रस्त्यावर..
एकदा डोळे रोखून उभी राहा..

असतील माझ्या डोळे..
अश्रुंनी भरलेले..
तुला पाहण्यासाठी..
नम्र अन आसूसलेले..

तुझ्या हाकेला..
कान माझे आतूर झाले..
तूला प्रेमाने पुकारायला..
ओठ माझे पुटपुटले..

पुन्हा त्या वळणावर..
येशील ना सखे..
पुन्हा तुझ्या बाहूत..
जकडून घेशील ना सखे..

तुझ्या भेटीची आता..
लागलीय मला आस..
तू खरचं आलीस..
की होत आहेत मला भास..