खट्याळ अदा अन सोनमुखडा भरीचा बावनकशी भासते
अधीर लोण्याला आपसूक सुलगलेल्या निखाऱ्याकडे खेचत नेते,
माझ्यावरची भिरभिरती नजर मग का ग जमिनीवर खिळते,
अंगार इष्काचा भडकवून सजणे अशी कशी लाज आडवी येते..!!
म्हणे सखी लिही शब्दात प्रेमाला
मी क्षणात पुढे तिच्या ठेवले मनाला
भांबावली थोडी म्हणे वाचू कशी मी ?
जीव तो अजाण विचारे ह्या जीवाला
स्तब्ध होवुनी गाळले तिने आसवाला
जे न कळले कुणा,कळले त्या डोळ्याला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा