मंगळवार, २३ ऑगस्ट, २०११

फुलाने राहावे फुलत.. झोक्याने राहावे झुलत..

माझा प्रत्येक श्वास...
तुझीच गाणी गात आहे..
माझा प्रत्येक शब्द...
तुझीच कहाणी सांगत आहे..


प्रत्येक शब्द हा असा असावा..
कि समोरच्याने वाचताच काळजात घुसावं..
त्याला धार असावी...
पण.. काळीज घायाल न व्हावं..


जागतो हा थेंब रात्र रात्र..
सकाळ प्रहरची वाट पाहात..
सकाळ होताच हा मग..
दवबिंदू होण्याच्या नादात..

फुलाने राहावे फुलत..
झोक्याने राहावे झुलत..
मौल्यवान हे आयुष्य गड्या..
त्याला जागावं हसतं खेळतं

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा