मंगळवार, २३ ऑगस्ट, २०११

कधी तरी आठवणींचा पट खुलतो ,

बासूरीच्या सुरांनी..
भान राधेचे हरपले..
कृष्णाच्या प्रेमासाठी..
मीराने स्वत:ला झोकून दिले..



मला ही वाटले होते..
तुझ्या सवे मरावे..
मरणे तर सोड ग..
तुला जगताही नाही आले..


तूला कधीच कळले नाही..
मन माझे असा तुझा आरोप..
तु मला काहीच कळू दिले नाहीस..
असा माझा ही प्रत्यारोप..



कधी तरी आठवणींचा पट खुलतो ,
तुझा माझ्या प्रेमाचा मग डाव रंगतो
विसर मनाला कितीदा मी सांगतो
ते ही हट्टी सारे सोडून त्यामागेच धावतो...

माझ्या मनाच माझ्या मेंदुशी
छत्तीसचा आकडा आहे
माझं मन तसं सरळ आहे
या मेंदुचाच रस्ता वाकडा आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा