मंगळवार, २३ ऑगस्ट, २०११

कधी आपलेच शब्द.. आपली थट्टा करतात..

कधी आपलेच शब्द..
आपली थट्टा करतात..
तर कधी भावना विवश होऊन..
ते आपले मन घट्ट करतात..



विस्कटलेल्या नात्याला..
आता जकडतोय बंधनात..
पुन्हा एकदा येईल का..?
नाद त्याचा या स्पंदनात..



मी तुला तुझ्या नावाने पुकारावे,
तुला खुप वाटायचे.
अन तुझं नाव माझ्या कडून ऎकून..
तुझ्या ओठावर हसू दाटायचे..



कधी आपलेच शब्द..
आपली थट्टा करतात..
तर कधी भावना विवश होऊन..
ते आपले मन घट्ट करतात..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा