पहाऱ्यास त्या नभाच्या ठेवुनी चंद्र चांदणीला
दिव्यास त्या राहू दे जागे.. आहे अंधार सोबतीला
हा काजवा कुणाचा कि नयनी स्वप्न ते लुकलुकते
हळूच फुलत्या रातराणीस मिळे वारा तो जोडीला
हि नदी का वेडी चालते वाकडी.. कळे ना कुणाला
तो गंध तुझा दिवाना मोगारयास सोडून पळाला
ते दव जमले पहा तिथे पानावरती तुला भेटण्या
पाहून प्रतिबिंब चंद्राचे म्हणे मज मोती मिळाला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा