एक थकलेलं शरीर ....
एका उंच ठिकाणी ध्यानास्थ बसलेलं......
असंख्य स्वप्नांना टीप पडलेल्या डोळ्यात जिवंत ठेवत.....
काही तरुण देहं उदयाच्या स्वप्नान साठी त्यासमोर जागी होवून उभी.....
सळ सळत्या रक्ताला आज दिशा मिळावी वाहण्यासाठी,रसत्यावर सांडण्या पेकषा....
आकाशालाही हेवा वाटत असवा आज उडणार्या जिवंत तीन रंगांचा ...
त्या महात्म्याच्या पांढऱ्या टोपीत जादू असावी बहुदा....
त्या पोटानसाठी पोटाची लढाई छेडली......
सुरकुत्या पडलेल्या देहाने .....
पापाला ओरबाडून काढावं आणि ओढत न्यावं....
दाग नसलेल्या मनुश्यांच्या वसतीत पुण्य बघण्यासाठी....
कातलेल्या सुताने उधळलेला पैशाचा माज,विचारांनी बांधण्यासाठी...
आपल्याच हक्काच्या घरातील अंधार कोरून त्यावर शुभ्र प्रकाश गोन्दन्यासाठी ...
सामान्य मनाच्या गाभाऱ्यात कधीची तेवत असलेली ती पणती...
आज लखः उजळतेय चहू दिशानी बिनधास्त बेधडक..
त्या तलवारी जंगून पडल्यात म्यानीत....
त्या लाठ्या मोडून पडल्यात....
हा "चमत्कार"नाही ...
......हे हत्यार आहे नवे... तुमच्या आमच्यासाठी ..............
......नको त्या अन्यायाला न्यायाने चिरडण्यासाठी ..........
.....एका महात्म्याचे स्वप्न पुन्हा साकारण्यासाठी .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा