मंगळवार, २३ ऑगस्ट, २०११

आयुष्य सार बेरंग असताना

कडक उन्हात दिवसा उजेडी
अचानक पडावं जस चांदण,सख्या
तसं वाटल तू dear म्हंटल्यावर!!!!!!

निरभ्र आकाशात ढग नसताना
अचानक यावी सर एखादी ,सख्या
तसं वाटल,तू dear म्हंटल्यावर !!!!!!!!!

आयुष्य सार बेरंग असताना
अचानक उमटावा इंद्रधनू जसा ,सख्या
तसं वाटल तू dear म्हंटल्यावर !!!!!!!!!!!

उगवतीला अचानक चंद्राने याव
आणि सूर्याने याव रात्री सख्या
तसं वाटल तू dear म्हंटल्यावर !!!!!!!!!!!!!

चातकाला लागावी तहान सख्या
अन वलीवाने याव अवेळी अचानक
तसं वाटल तू dear म्हंटल्यावर!!!!!!!!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा