कोसळणारा पाऊस असावा
अन संगतीला असावी तू,
हिरव्यागार साथीसोबत
जाईल आपली प्रीतीही उतू..!!
मैत्री म्हणजे प्रेम..
मैत्री म्हणजे विश्वास...
मैत्री म्हणजे तुझा अन माझा..
मिसळलेला एक श्वास..
तू माझी मैत्रीण..
अन मी तुझा मित्र..
असेच चालत राहो..
आपल्या नात्याचे हे सूत्र..
तुझ्या माझ्या नात्याचे..
हे रेशमी बंध..
येऊ दे ना या नात्याला..
मैत्रीचा सुगंध..
दरवरल्या दाही दिशा..
आपल्या प्रेमाच्या सुगंधात..
आपण दोघेही अडकलोय..
या सुंदर अश्या बंधनात..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा