सोबत जगण्यास जेव्हा
विचारांची अडगळ ठरली
बहारेली प्रीत ती तयांची
अवेळी पानगळ ठरली
वेड्या त्या मनासाठी ,सख्या मी गाव शोधला होता
तू होतास सोबतीला ,म्हणून डावही मांडला होता
रंगात येता डाव मी, हात आशेचा धरिला होता
घालण्या सडा प्रीतीचा ,तेंव्हा प्राजक्तहि आला होता
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा