गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०११

रात्र झाली फार आता चला गड्यांनो जाऊ या

शब्दाविना वाच सखे
भाव माझ्या मनातले
ओढ तुझी ,साथ तुझी
अर्थ जाण स्पर्शातले



पुन्हा नव्याने भेटायाला ताजेतवाने होऊ या
रात्र झाली फार आता चला गड्यांनो जाऊ या

आज पुन्हा रात्र आपली होती झकास रंगलेली
मैफिलीची उर्जा अशी नसानसात भिनलेली
जाऊनी आता निद्रेच्या जरा अधीन होऊ या
रात्र झाली फार आता चला गड्यांनो जाऊ या

आयुष्याच्या सायंकाळी रात्रीच्या या कातरवेळी
घालविण्या वेळ असा सवंगड्यांची जमली मेळी
उदयास पाहण्या पुन्हा नव्याने आपण जागे होऊ या
रात्र झाली फार आता चला गड्यांनो जाऊ या



आभाळ जेव्हा भरून येत
पावसाने तेव्हा थांबायचं नसत
होईल मोकळ आकाश
म्हणून विजेने गर्जायच नसत
तेव्हा करायची फक्त साथ
मातीने पावलांची आणि
भिजल्या क्षणांनी ......
तुझ्या आठवणींची.......!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा