गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०११

मत होना उदास कभी ऐ प्यारे खुदा के बन्दे

माझ्या प्रेमाची अबोल भाषा सखे
सांग कधी ग होणार तुला अवगत,
का राहणार तू नेहमीचं अनभिज्ञ
आणि होणार माझी वेडी फसगत..!



तुझ्या मनातले समजले म्हणून पडलो तुझ्या प्रेमात
तू नसती फिरवली नजर माझ्या मनात सखे
तर राहिलो असतो तुझ्या प्रेमाविना?????


निपजले मोती काही सये
आठवांच्या शिंपल्यातून
हास्य काहींचे पाहीले मी
भिजलेल्या पापण्यांतून



मत होना उदास कभी ऐ प्यारे खुदा के बन्दे
रेहेम तेरे इश्क पर उसका ज़माने तक रहेगा,
पूरी कायनात शामिल तेरी चाहत की वफ़ा में
सफ़र अनजाने दर्द का बेशक दीवाने तक रहेगा..!!




केव्हातरी जागेन मी
साधासुधा वागेन मी

आधार ही माझाच ना ?
बोलास त्या जागेन मी

मी का धरू शंका मनी ?
जाहीर हे बोलेन मी

वादास ना थारा इथे
साऱ्या जगा सांगेन मी

आहे जणू दीपावली
नेत्र दिवा लावेन मी

काव्यात का मी रंगतो
केव्हातरी सांगेन मी

जीवास या गोडी तूझी
केव्हातरी सांगेन मी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा