मोबाईलची लावणी----- ----
सिमकार्ड नवे,ड्युएल हवे
राया जरा तुमीच इचार करा
माझा मोबाईल रिचार्ज करा!!धृ.!!
त्यात फोटूची सोय तर हवी
ब्याटरी बी पावरबाज नवी
लई गाणी रिकार्ड व्हावी
कानी कर्णे लावून ऐकावी
हातात घेऊन ऐटीत त्याला झोकबाज कव्हर करा !!१!!
कुठलेबी कार्ड चालेल
प्रीपेडची सुविधा असेल
राती मेसेज तुमचा येईल
माझा रिप्लाय लगी जाईल
रंग तांबडा,फोन देखणा न्यारा त्याचा नखरा !!२!!
त्याला कव्हर मी घालीन
नित हृदयाशी ठेवीन
तुम्हासंगे रोज बोलीन
असा फुलावानी झेलीन
हातात माझ्या देऊन त्याला हात हाती धरा!!३!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा