गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०११

विसरलो मी कालचे माझे किती श्वास होते

अपेक्षा
प्रेमात नसावा आकस
प्रेमात नसावी इर्षा
एकमेकांवरील विश्वास
हीच असते प्रेमाची अपेक्षा


तुमच्या आमच्या प्रेमात त्या गुलाबाचे काय कोडे,

पण प्रत्येक प्रोपोजल नंतर त्याचीच मान मुरडे..


विसरलो मी कालचे
माझे किती श्वास होते
हात तुझा हाती अन
सारे तुझे भास होते

पुन्हा पुन्हा आठवतो
मंद हळव्या क्षणांना
माझ्यासाठी जसे काही
जगण्याची आस होते

लाविलेस वेड मला
परी आता शोधू कुठे
चोहीकडे पाहीले मी
तुझ्याविना ओस होते

आठवाने जेव्हा तुझ्या
झंकारते काळीज हे
एकेक ती आठवण
माझ्यासाठी खास होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा