गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०११

डोळस प्रेम - एक कथा....

डोळस प्रेम - एक कथा....

त्याच्या आयुश्यातला सर्वात मोठा धक्का दायक क्षण नुकताच घडून गेला होता, तसा तो खुप आनंदी मुलगा पण त्याला शांत अन एकटे राहायलाच जास्त आवडायचे. पण त्या घटनेने तो खुप हेळाऊन गेला होता य आधी जे पाहीले नाही त्या सर्वाला अचानक सामोरे गेला पण काय करणार नियतिच्या मनात तेच होते..

नियतीच्या मनात अजूनही खुप काही होते, म्हणूनच तर तिची अन त्याची भेट झाली. म्हणतात ना ज्याचे दु:ख त्यालाच कळते, पण येथे दोघांची दु:खे सारखीच होती. म्हणून त्यांनी एकमेकांना साथ देण्याचे ठरवले.. एक मेकाला दु:खात साथ देता देता ते एकमेकांच्या सुखाचे हि साथी झाले. त्यांनी एकमेका समोर कधी कबूल नाही केले पण एकमेकावर खुप प्रेम करु लागले होते.

कबूल हि कसे करतील आपला हा निर्दयी समाजाने त्यांना सुखाने जगू नसते दिले... पोथि पुराणात म्हटले आहे प्रेमाला कोणतीहि सीमा मर्यादा नसते.. आणि त्या दोघांनीही समाजाच्या पाठमोरे आपल्या प्रेमाचे अंकूर उमलवू लागले.. तो थोडा लाजाळू होता या आधी मुलीशी बोलायचे म्हटले तर हनूमानाच्या पाया पडून जाणारा, मात्र तिच्या सोबत असताना तो सारं जग तिच्यातच सामावले आहे असे भासून तिच्यातच रमून जायचा, अन ती पण त्याच्या बरोबर खुप खुश असायची तो सोबत असला की सारी दु:ख विसरुन रमून जायची..

तासन तास फोन वर बोलणे, वैगरे तसे रोज ते शरीराने दुर असले तरी मनाने सतत एकमेकांसोबत असायचे. एखाद्या वेळी त्याने फोन केला नाही की ती खुप अस्वस्थ होऊन जाई. त्यांनी एकमेकाच्या दु:खाला एकमेकाचा सहारा बनविला अन प्रत्येक दिवस नव्याने जगू लागले.. असे एक वर्ष कधी उलटून गेले त्यांना कळलेच नाही, ते एकमेकांसोबत असताना वेळेचे भानच राहायचे नाही त्यांना.

एक दिवस एक बातमी तिने त्याला सांगीतली अन त्याच्या पायाखालची जमीन निसट्ली, त्याला काय करावे कळेना. ती बातमी तिच्या लग्नाची होती नुकलेच पाहूणे तिला पाहून गेले होते. तिलाही काही सुचेना अश्या वेळी काय करावे. तो तर स्तब्ध झाला होता. तो तिला विचारणार माझ्याशी लग्न करशील..? पण त्याचे शब्द ओठीच अडले, त्याला माहीत होते या नात्याला ह निष्ठूर समाज कटू नजरेने पाहणार अन त्याच्या पेक्षा तिलाच जास्त त्रास देणारं... नियतीने त्या दोघांना काही कारणस्तव एकत्र आणले खरे पण आयुष्य भरासाठी एकमेकाची सोबत घडवून द्यायची राहून गेली. नी या प्रसंगाला एकत्र समोरे जायचे ठरवले होते या नियतीचे नियम तोडून...

काही दिवसात लग्न झाले, दोघेही आधी सारखेच आनंदी एकमेकांसोबत गप्पा गोष्टी एकमेकांच्या सुख दु:खात सहभागी होऊन प्रत्येक दिवस घालवू लागले.. फ़रक इतकाच की लग्ना नंतर ते कधीही भेटले नाहीत.. पण प्रेमा नंतर मैत्री या अशक्य वाक्याला त्यांनी शक्य करून दाखविले, ती तिच्या नवरया सोबत खुश होती. अन तीला खुश पाहून तो पण आनंदी होता..

प्रेम म्हणजे शरिराने एक होणे नाही तर, प्रेम म्हणजे मने एकरूप होणे... जर मनात ठाम विश्वास असेल मग कोणत्याही प्रसंगाला तुम्ही आनंदाने सामोरे जाऊ शकता... नाते तोडण्या पेक्षा ते जास्तीत जास्त कसे टीकवता येईल या कडे लक्ष द्या..


अंतरजाल साभार- कवी- लेखक.. (गुपित)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा