जाणून घे आज चारीत्र्यास माझ्या
फक्त दे हात तू या हातात माझ्या
छोट्याशा आयुष्याचा जमवू मेळ
एकमेका देऊ आता उरलेला वेळ
फुलवीन प्रेममळा संगतीने तुझ्या
फक्त दे हात तू या हातात माझ्या
मिठीमध्ये तुझ्या विसरलो भान
रात्रंदिन गातो मी तुझे गुणगान
देई आता साद तु हाकेला माझ्या
फक्त दे हात तू या हातात माझ्या
संगतीने तुझ्या नवी शिखरे गाठीन
ओंजळीत तुझ्या सारी स्वप्नेही वाहीन
देई बळ सखे आता पंखास माझ्या
फक्त दे हात तू या हातात माझ्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा