गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०११

मी तो नव्हे... जो नाते तोडून जाईन...

आकाशातून निखळला तारा..
धरतीच्या कुशीत येऊन विसावला...
धरतीने दिले त्याला प्रेम आईचे..
धरती पासून विळग होऊन शुभ्र चंद्र उगवला...



तुझ्या हूंकाराची वाट पाहून...
मन माझे व्याकूळते...
तु मात्र मुक धारण करतेस...
अन हृदय माझे काकूळते




तु आलीस भेटायला..
की पाऊसही रिम झिम बरसायचा..
तुझी माझी भेट जणू..
तो ही लपून बघायचा



तू होतीस परकी...
तरी आपली वाटली...
परक्यांवर असे हे आपलेपण..
म्हणूनच मनात भीती दाटली..



संध्याकाळ चा उनाड वारा...
हळूच चाहूल तुझी देऊन जातो...
असाच आता रोज तो...
मला फ़सवून जातो..



आज ही नभात या....
एक पक्षी विहारतो...
जायचे त्यास कोणत्या दिशा..
असे का विचारतो...


मी तो नव्हे...
जो नाते तोडून जाईन...
मी मात्र जाता जाता..
नवे नाते जोडून जाईन..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा