झाडा सारखे बहरून
तिचे हसणे
वारा येऊन गेल्यावर
माझे पाला पाचोळा वेचणे...
हसतो का आज तू माझ्या वर
उद्या तुझी हि वेळ येईल
जरी आज मी तुटले तरी
उदया परत झेप घेई
दिव्याला असते का अंधाराची भीती
सूर्याला सालीलाची
चंद्राला प्रखर तेजाची
मग का या मनाला भीत पराजयाची
डोळ्यात भावनांचे ,बीज काळजाने पेरले
अंकुरल्या त्या रोपा,तुज नाकारता ना आले |
शिंपले तारुण्य माझे,र्हद्यास तुझ्या कळाले
बरसले जे सूर त्यातून ,तुज रोकता ना आले |
आकाश म्हणू कि तुजला ,ती वाहणारी सरिता
सर येता पावसाची ,तुज भिजता परी न आले |
माझ्याकडे असावी ,तुझी बहरलेली प्रीती
न्हाता आठवात डोळे ,तुज पाहता ना आले |
जाता रुसुनी सखे तू,मना समजावता ना आले
नजरेस माझ्या परंतु ,तुज हुलाकावता ना आले ||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा