सोमवार, २६ सप्टेंबर, २०११

येईल मी परतून तुझ्यासाठी सखे

तुज ते मिठीत येण
अन मज स्वतःलाच विसरून जाण
जणू परिमलचा सुवास तो सख्ये
हवेत दरवळून जाण



वळवाचा पाऊस हि
भिजवतो मनाला
तरी सख्ये दोष
तुज श्रावणसरीना



येईल मी परतून तुझ्यासाठी सखे
वाट बघ माझी पौर्णिमेच्या चांदण्यांत,
अवचित उभा राहील तुझ्या समोर
मग्न असशील जेव्हा प्राजक्ताच्या अंगणात..!!


काजळी भरलेलं डोळ्याची ती किनार
मखमली होटाची ती हुनर
मदमस्त तो तिचा बांधा
त्यांनीच केला आहे जगणायचा वांदा



आवडेल मला जाणून घ्यायला...
काय दडलंय तुझ्या मनात..
नाहीच जाणता आले तर..
सांगशील ना हक्काने कानात..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा