सोमवार, २६ सप्टेंबर, २०११

भूतकाळाचा पडदा वर्तमानाच्या डोळ्यांवर

खुललेली प्रीत सख्या
मना वेड लाऊनि जाते
रूप मेहंदीच घेऊन मग ती
......तुलाही रंगवून जाते !


भूतकाळाचा पडदा
वर्तमानाच्या डोळ्यांवर
भविष्य धडकले
आंधळ्या वर्तमानावर...



संध्याकाळ ती उतरली
तिन्हीसांजेच्या तळी
तळ्याकाठच्या झाडावरती
हुरहुरणारी एक कळी....
फुलू पाहते ती वेडी
नाजूक स्पर्शास आसुसली
खुडू नका हा जन्म माझा
फुल होण्यास तरसली...
उगवेल सकाळ ती
गंध फुलांचा दरवळेल
कोमेजलेल्या कळीला
जेव्हा जगण्याचे वरदान मिळेल..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा