मीच मिचत्या डोळ्यांनी
हवासा तू वाघोबा करायची
मुरडलेल्या नाकाला तुझ्याच
तू छानस मुंगुस म्हणायची
छोटासा तो फ्रॉक नेसवून
त्या बाहुल्यांना वेणी करायची
इवल्या हातभर बांगड्या घालून
पडत-उठत घरभर फिरायची
माझी सुट्टी.. ती धमाल तुझी
पाठी बसून माझ्या मला घोडा म्हणायची
दमून दमून इवलासा जीव
बिलगून मला,तिथेच निजायची
आजी-आजोबांची लाडकी तू
ती अख्या चाळभर फिरायची
मंदिरातल्या बाप्पाला साखर देऊन
प्रार्थनेत आईस स्क्रीम मागायची
कार्टून बघायला वेळच वेळ तुला
अभ्यासाच्या नावाने दूर पळायची
जेवायचा तुला कंटाळा फार..
घाई ती आजीच्या तोंडून गोष्टी ऐकायची
घर म्हणजे आमचे तीच जणू ...
दिवसाची करंगळी ती हळूच सोडायची
इवल्याश्या श्वासांचा आराम तो
नाजूक पापण्यात आम्हाला घेऊन निजायची
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा