सोमवार, २६ सप्टेंबर, २०११

तुझ्या साठी आणलेला गजरा..

तुझ्या माझ्या प्रेमाचा..
बघ चोहीकडे पसरला सुगंध...
तू हसलीस गालात अन...
फुलून आला निशिगंध...



लगेल कधी अंगाला तुझ्या..
हळद माझ्या नावाची....
येता जाता हसत असते...
ती वाट तुझ्या गावाची..



तुझ्या साठी आणलेला गजरा..
फ़ुलला होता पाहून तुझा चेहरा हसरा...
तुझ्या येण्याची वाट पाहून जो...
सोडत होता जो प्राण बिचारा...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा