सोमवार, २६ सप्टेंबर, २०११

प्रत्येक आठवणीत तूला स्थान पहीले..

तुझ्या मिलनाची..
साक्ष देतोय हा किनारा.
त्याच्या प्रत्येक लाटेवर..
आपल्या प्रितीचा शहारा..


तुझ्या त्या गोड आठवणी
मला स्वप्नातून तुझ्या जवळ आणतात....
तू माझ्या हृदयात अशी काही रुझली आहेस की
तो देव ही आपल्या प्रेमाचा साक्षी बनला आहे.


होऊनी वाळू मी किनारी असावे
स्पर्श करण्यास मला तू फेसाळून उठावे
कधी अंबरात मी कधी क्षितिजात राहावे
संध्येच्या रंगत तू मला पूर्णपणे रंगवावे..


प्रत्येक क्षणाला आठवण तूझी..
शांत मनात या लहर तुझी..
तरी का नाही झाली तू माझी..

प्रत्येक आठवणीत तूला स्थान पहीले..
का कुणास ठाऊक हे असे का घडले..
शहाण्या सारखा वागलो तरी तुझ्या वरच सारं अडले..

परक्या सारखं तुझ्याशी नाही वागता येत मला..
वारयासंगे उनाड त्या नाही वाहता येत मला..
रणांगनात या प्रेमाच्या नाही जिंकता आलं मला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा