सोमवार, २६ सप्टेंबर, २०११

एक क्षण पुरे तुझे रूप मनात साठवायला,

तुझ्या सोबत मला भिजायचयं..
या मुसळधार पावसात..
मिठीत माझ्या आलीस की..
मिसळून जातील श्वासात श्वास...


मिठीतली तू माझ्या..
नकळत माझी होऊन जातेस..
तो क्षण होतो धुंद...
अन हृदय एकमेकाला बिलगून जाते..



हृदयाला भिडले हृदय..
दोघे होतात गुंग...
मन मात्र एकटे...
पुढील विचारात दंग...



एक क्षण पुरे तुझे रूप मनात साठवायला,
मनातल्या मनात आठवून गालातल्या गालात हसायला.......
एक क्षण पुरे तुझा आवाज ऐकायला ,
कानातल्या कानात त्याची धून वाजायला......
एक क्षण पुरे तुझ्या डोळ्यांमध्ये पाहायला,
... त्यांच्यातला प्रेम माझ्या डोळ्यांत साठवायला.....
एक क्षण पुरे तुझ्यावर भरभरून प्रेम कराय्ला,
तुझ्या प्रेमासाठी क्षण क्षण तरसायला....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा