सोमवार, २६ सप्टेंबर, २०११

जय जिजाऊ ....

नको अता विझता दिवा,मज ज्योत पाहिजे
नभी छेदणारा वादळी असा झोत पाहिजे

माझ्याच पोटी मला एकदा माझी लेक होऊ दे
जगेन नीर्भई ,कशा सोबती गणगोत पाहिजे

अत्याचार ,अन्याय का म्हणून नशिबी घेऊ
नराधमी जगलात या,वाघिणीची जात पाहिजे

नवी उशा तूच हो तुझ्यातुनी,दाहीदिशा उजळूनी
जुन्यावरी कर मात तू,नवी कोरी बात पाहिजे

हो जिजाऊ,कधी झाशीची राणी,पाठी आई भवानी
दुष्ट मनसुब्याना जाळण्या,धग धगती वात पाहिजे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा