मी गूंफली माळ...
माझ्या स्तब्द शब्दांची..
तुला ती कळली नाही...
विखूरळी ती माळ भावनांची..
आज वेळ माझ्या हाती असती,
कुंकू माझ्या नावाचे तुझ्या माथी असते..
का कुणास ठाऊक वेळेने हा दगा केला..
माझ्या जन्मा आधीच तुला जन्म दिला...
काल पुस्तक वाचताना...
त्या तुझं नाव वाचनात आलं...
थोडा वेळ स्तब्द होऊन त्याला पाहीलं..
हळूच ते पापण्यांनी भिजून गेलं..
झालं गेलं विसरुन जा..
प्रत्येक जण सांगत असतो..
तुझ्या पासून दुर जाण्याचा..
सल्ला प्रत्येक जण देत असतो..
माझ्या नावातचं सामावला..
तुझ्या नावाचा पसारा...
आपलं नात म्हणजे..
तो अथांग सागर अन किनारा..
मी तिथेन असेन..
त्या सागराच्या किनारयाशी..
तु मात्र जपुन ये..
नजर आहे तूझ्यावर सर्वांची..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा