सोमवार, २६ सप्टेंबर, २०११

तुझ माझ्यावर अन माझ तुझ्यावर प्रेम जडत आहे..

माझ्यातला ईश्वर कदाचित
पंगु झालेला दिसतोय
नाहीतर मी कशाला उगा
दगडांचे पाय धरतोय..?




तुला दूरून पाहताना....
डोळ्यातील अश्रूही मोहून जायचे...
त्यारात्री मग आकाशात..
चंद्र ऐवजी तुझेच रूप दिसायचे..




मनी भाव आज
अश्रू वाटे वाहतायत
होठ जरी असेल अबोल
डोळ्यांनी डाव साधलाय


खरच सांगतो त्या पाण्यामधे
माझ काळीज बुडत आहे
तुझ माझ्यावर अन
माझ तुझ्यावर प्रेम जडत आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा