बुधवार, १९ ऑक्टोबर, २०११

पुन्हा .........मीच असेल ...

खूप वाट पहिली
अजून तो आलाच नाही
जगत होते खरी मी
पण श्वास काही चालला नाही ......




पुन्हा .........मीच असेल .........

पुन्हा तुझ्या विचारात .... मीच असेल
पाहशील जेव्हा स्वताला.... मीच दिसेल

दाटतील हुंदके,तू मोकळी रडशील कशी
डोळे जागतील माझ्यासाठी,रात्र घेयील कुशी
तू शोधशील स्वप्नात मला ,मी तिथे नसेल
रिकाम्या डोळ्यात मग पाणीच पाणी साचेल

कविता माझ्या तू पुन्हा पुन्हा वाचून काढशील
शब्द भरशील डोळ्यात आणि स्तब्ध रडशील
मग हळूच आठवणींच्या गर्दीत तुला एकट वाटेल
ऐन कोरड्या मनात तुझ्या . भेटीचं एक ढग दाटेल

एकटी असशील जेव्हा जेव्हा ..सोबत मीच असेल
दूर जाणाऱ्या वाटेवर ठेव पाऊल ...पलीकडे
...........................वाट पाहणारा हि मीच असेल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा