जगजीत सिंग यांची एक गझल नक्की ऐका
(ठूकरावो के अब के प्यार करो.. मै नशे मे हु)}
"दारू" ....(कधी ब्याड कधी वायीट असते :))
मोरू,दारू कधी चागली कधी वायीट असते
चढणारी,झोंबणारी तर कधी लायीट असते
ती वाट पाहत कोरड्या गळ्यांची, गर्द होते
कधी ब्याड मोरनिग तर कधी गुड नायीट असते
नसातला प्रवास तिचा गार वार्याने वेग धरतो
आपल्याच सुताने कापलेली आपली कायीट असते
संत्रा,मोसंबी,कधी विलायती,नावात काय आहे
ज्याच्या त्याच्या परीने झेपलेली फायीट असते
परवाना प्राप्त जिभेला ते कुणी कायदे काय सांगावे
थेंब थेंब शोषनार्यांना सागराचे खुले परमिट असते
बंद भिंतीत,मंद प्रकाशात सुख-दुख साजरे होतात
निर्व्यसनी मताने 'ब्याड',पिणाऱ्याना ते रायीट असते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा